हे पृष्ठ 21 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २१ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 21 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

२००२ : जगभर दूरसंचार सेवा पुरवणार्‍या ’वर्ल्ड कॉम’ या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.

१९८३ : अंटार्क्टिकावरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सिअस या पृथ्वीवरील आत्तापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.

१९७६ : आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या

१९६० : सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होत.

१९४४ : २० जुलै १९४४ रोजी अ‍ॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी देण्यात आले.

१८३१ : बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

चेतन चौहान

१९४७ : चेतन चौहान – सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य

१९३४ : चंदू बोर्डे – क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष

१९३० : डॉ. रा. चिं. ढेरे – सांस्कृतिक संशोधक

१९२० : आनंद बक्षी – गीतकार (मृत्यू: ३० मार्च २००२)

१९१० : वि. स. पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्‍मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक (मृत्यू: १६ मार्च १९९०)

१८९९ : अर्नेस्ट हेमिंग्वे – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक (मृत्यू: २ जुलै १९६१)

१८५३ : शंकर बाळकृष्ण दीक्षित – ज्योतिर्विद, पाश्चिमात्य व पौर्वात्य जोतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक (मृत्यू: २७ एप्रिल १८९८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००९ : गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: ५ मार्च १९१३)

२००१ : विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते (जन्म: १ आक्टोबर १९२८)

१९९५ : सज्जाद हुसेन – संगीतकार व मेंडोलीनवादक (जन्म: १५ जून १९१७ – सीतामहू, मंदसौर, मध्य प्रदेश)

१९९७ : राजा राजवाडे – साहित्यिक (जन्म: १ जानेवारी १९३६)

१९९४ : डॉ. र. वि. हेरवाडकर – इतिहास संशोधक, वाङ्‌मय समीक्षक, मराठी बखर वाङ्‌मयाचे व्यासंगी अभ्यासक (जन्म: ? ? ????)

१९७२ : जिग्मे दोरजी वांगचुक – भूतानचे राजे (जन्म: २ मे १९२९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *