हे पृष्ठ 05 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that occurred on 5th March. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- समता दिन
महत्त्वाच्या घटना:
१५५८: फ्रॅन्सिस्को फर्नांडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला.
१६६६: शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले.
१८५१: ’जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ची (GSI) स्थापना
१९०४: निकोला टेसला यांनी बॉल लाइटनिंग ची व्याख्या जगासमोर ठेवली.
१९३१: दुसर्या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.
१९३१: महात्मा गांधीजीनी उभारलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीनंतर गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये करार झाला.
१९३३: भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.
१९४९: आजच्या दिवशी झारखंड पार्टी ची स्थापना झाली.
१९६६: मैसूरचे माजी संस्थानिक जयचामराजेन्द्र वडियार यांचा बंगळूर येथील राजवाडा व त्यासभोवतालची जागा राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याची परवानगी देणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत संमत
१९८२: आजच्या दिवशी “वेनेरा १४” या अवकाशयानाने बुध ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला.
१९९७: ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्या टपाल तिकिटाचे प्रकाशन
१९९७: धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना जाहीर करण्यार आला.
१९९८: नेहमीच्या अस्त्रांबरोबरच कमी पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणार्या, रशियाकडुन घेतलेल्या ’सिंधुरक्षक’ या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन
१९९९: ’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणार्या आर. डी. बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी डॉ. जयंत नारळीकर व प्रा. अशोक सेन यांची निवड
२०००: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट – २) राष्ट्राला अर्पण
२००१: सौदी अरेबिया च्या मक्का मदिना येथे झालेल्या चेंगराचेंगरीत ४० यात्रेकरू मारले गेले.
२००२: आजच्या दिवशी ऑस्ट्रेलिया येथे कॉमनवेल्थ समिट चा समारोप झाला.
२००७: राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अयोग्य स्थापना
२००९: इंडियन फार्मर्स फर्टिलाइजर को-ऑपरेटिव लिमिटेड (IFFCO) हि आजच्या दिवशी एका वर्षामध्ये एक करोड़ टन ची विक्री करणारी जगातील पहिली कंपनी ठरली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१५१२: भूगोलतज्ज्ञ, गणित आणि नकाशा शास्त्राचे जनक जेरार्डस मर्केटर. रामकृष्ण परमहंस.
१५१२: गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (मृत्यू: २ डिसेंबर १५९४)
१८९८: चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ८ जानेवारी १९७६)
१९०५: आजच्या दिवशी भगत सिंह यांची काही देशाहिता च्या कार्यांमध्ये मदत करणारी स्वातंत्र्य सैनिक सुशीला दीदी यांचा जन्म.
१९०८: सर रेक्स हॅरिसन – ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते (मृत्यू: २ जून १९९०)
१९१०: संपादक श्रीपाद वामन काळे यांचा जन्म.
१९१३: गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: २१ जुलै२००९)
१९१६: बिजू पटनायक – ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री (मृत्यू: १७ एप्रिल१९९७)
१९२५: माजी लोकसभा सदस्य वसंत साठे यांचा जन्म.
१९५८: भारतीय अभिनेता एम.नासार यांचा जन्म.
१९५९: मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा जन्म.
१९७४: अभिनेता हितेन तेजवानी यांचा जन्म.
१९८४: भारतीय दक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री आरती अग्रवाल यांचा जन्म.
१९९०: हिंदी तसेच ऑस्ट्रेलियन चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री पल्लवी शारदा यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१५३९: नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर.
१८२७: इटालीय भौतिकशास्त्रज्ञ अलासांड्रो व्होल्टा यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १७४५)
१९१४: नाटककार, समीक्षक आणि प्राध्यापक शांताराम अनंत देसाई यांचे निधन.
१९५३: सोव्हियत रशियाचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८७८)
१९६६: साम्यवादी विह्चारांचे व्यासंगी नेते शंकरराव मोरे यांचे निधन.
१९६८: मराठीचे संशोधक नारायण गोविंद चाफेकर.
१९८५: महाराष्ट्र संस्कृतीकार पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन.
१९८५: कोशागार, तत्वज्ञ तत्त्वज्ञान महाकोशाचे संपादक देविदास दत्तात्रय वाडेकर यांचे निधन.
१९८९: गदार पार्टीचे एक संस्थापक बाबा पृथ्वीसिंग आझाद यांचे निधन.
१९९५: हिंदी चित्रपट अभिनेते जलाल आगा यांचे निधन.
२०१३: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचे निधन. (जन्म: २८ जुलै १९५४)