८ जानेवारी दिनविशेष - 8 January in History
८ जानेवारी दिनविशेष - 8 January in History

हे पृष्ठ 8 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ८ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 8 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१८३५: अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.

१८८०: सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्‍च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.

१८८९: संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले. अमेरिकेच्या जनगणनेत १८९० मध्ये या गणकयंत्राचा उपयोग करण्यात आला.

१९२९: नेदरलँड्स आणि वेस्ट इंडिज यांच्या मध्ये पहिल्यांदा टेलिफोन वर संपर्क झाला.

१९४०: दुसरे महायुद्ध – ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.

१९४७: राजस्थान विद्यापीठाची स्थापना झाली.

लता मंगेशकर
लता मंगेशकर

१९५७: गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात खितपत पडून होते. अखेर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री अण्णादुराई यांनी पोपकडे केलेल्या मध्यस्थीमुळे १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. त्यांना गोवा पुरस्कार (१९८६), पद्मश्री (२००१) व सांगली भूषण (२००६) इ. पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

१९५८: १४ व्या वर्षाच्या बॉबी फिशर ने अमेरिकेची चेस चॅम्पियनशिप जिंकली होती.

लिओनार्डो डा व्हिन्सि
लिओनार्डो डा व्हिन्सि

१९६३: लिओनार्डो डा व्हिन्सिच्या ’मोनालिसा’चे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.

१९७१: पाकिस्तान चे राष्ट्रपती झुल्फिकार अली भुट्टो यांनी नेता शेख मुजीबुर रहमान यांची जेल मधून सुटका करण्यात आली.

१९७३: रशियाने “मिशन ल्‍यूना २१” ला स्पेस मिशन चे प्रक्षेपण केले.

२०००: लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड

२००१: भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.

२००९: ४,३०० वर्षाआधीची रानी सेशेशेट ची इजिप्त येथे ममी सापडली.

गीता मुखर्जी
गीता मुखर्जी

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९०९: ला भारतीय कादंबरीकार आशापूर्णा देवी यांचा जन्म.

१९२४: गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य (मृत्यू: ४ मार्च २०००)

नंदा
नंदा

१९२५: राकेश मोहन – हिन्दी नाटककार (मृत्यू: ५ डिसेंबर १९७३)

१९२६: केलुचरण महापात्रा – प्रसिद्ध ओडिसी नर्तक (मृत्यू: ७ एप्रिल २००४)

१९२९: सईद जाफरी – अभिनेता

१९३५: एल्व्हिस प्रिस्टले – अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि ’किंग ऑफ द रॉक अँड रोल’ (मृत्यू: १६ ऑगस्ट १९७७)

स्टिफन हॉकिंग
स्टिफन हॉकिंग

१९३६: ज्योतिंद्रनाथ दिक्षीत – परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (मृत्यू: ३ जानेवारी २००५)

१९३९: नंदा – अभिनेत्री

१९४२: स्टिफन हॉकिंग – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक

१९८६: प्रसिद्ध अभिनेता नवीन कुमार गोवडा उर्फ यश यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६४२: गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १५ फेब्रुवारी १५६४)

१८२५: एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक (जन्म: ८ डिसेंबर १७६५)

१८८४: केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक (जन्म: १९ नोव्हेंबर १८३८)

मधू लिमये
मधू लिमये

१९४१: लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)

१९६६: बिमल रॉय – प्रथितयश दिग्दर्शक (जन्म: १२ जुलै १९०९)

१९६७: डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ, संस्कृत पंडित. अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. (जन्म: १० डिसेंबर १८८० – नरसोबाची वाडी, शिरोळ, कोल्हापूर)

१९७३: नारायण भिकाजी तथा ‘नानासाहेब’ परुळेकर – ’सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष व भारतीय पत्रकारितेचे पितामह, स्वच्छ समाजदृष्टी, उक्ती व कृ

ती यातील करडी शिस्त या असाधारण गुणांमुळे नानासाहेब परुळेकर हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी पत्रकारितेतील सदैव स्मरणात रहावे असे व्यक्तिमत्त्व ठरले. त्यांना पद्मभूषण सन्मानाने गौरविण्यात आले होते. ‘निरोप घेता‘ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: २० सप्टेंबर १८९८)

१९७६: चाऊ एन लाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ५ मार्च १८९८)

एली व्हिटनी
एली व्हिटनी

१९८४: पहिल्या भारतीय महिला वैमानिक सुषमा मुखोपाध्याय यांचे निधन.

१९८७: माजी भारतीय क्रिकेटर नाना जोशी यांचे निधन.

१९९२: आनंद मासिकाचे माजी संपादक दं. प्र. सहस्रबुद्धे यांचे निधन.

१९९४: ६८वे शंकराचार्य परमाचार्य श्री. चंद्रशेखर सरस्वती यांचे निधन.

१९९५: मधू लिमये – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी (जन्म: १ मे १९२२)

१९९६: फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २६ आक्टोबर १९१६)

२००३: भारतीय कीटकशास्त्रज्ञ महादेव सुब्रमण्यम मनी यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *