हे पृष्ठ 1 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that occurred on 1st May. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
महाराष्ट्र दिन : महाराष्ट्र.
गुजरात दिन : गुजरात.
कामगार दिन : अमेरिका व अमेरिकाप्रभावित देश वगळता जगभर.
लेइ दिन : हवाई.
बेल्टेन : आयर्लंड.
राष्ट्रीय प्रेम दिन : चेक प्रजासत्ताक.
कायदा दिन : अमेरिकेची संयुक्त संस्थाने.
महत्त्वाच्या घटना:
१७०७: किंगडम ऑफ इंग्लंड व किंगडम ऑफ स्कॉटलंड मिळून किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन बनवण्यात आले.
१७३९: चिमाजीअप्पांनी सैन्यासह वसईवर हल्ला केला.
१८४०: द पेनी ब्लॅक हे पहीले अधिकृत पोस्टेज स्टॅम्प युनायटेड किंगडममध्ये जारी केले गेले.
१८४४: हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल स्थापन झाले.
१८६२: मुंबई विद्यापिठाचा पहिला पदवीदान समारंभ.
१८८२: आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे स्थापना झाली.
१८८४: अमेरिकेत कामगारांना एका दिवसात ८ तास कामकाज असावे ह्या मागणीची घोषणा.
१८८६: या दिवशी अमेरिकेत आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी संप सुरू झाला. हा दिवस जगभर (अमेरिका सोडून) कामगार दिन म्हणून पाळला जातो.
१८९०: जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
१८९७: स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना
१९२७: जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
१९३०: सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
१९४०: युद्ध सुरू असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या.
१९५६: पोलियोची लस जनतेस उपलब्ध.
१९६०: द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.
१९६०: गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१९६१: क्युबाचे पंतप्रधान फिदेल कॅस्ट्रो यांनी क्यूबा देश समाजवादी राष्ट्र घोषित करून निवडणुका रद्द केल्या.
१९६२: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.
१९७२: कोळसा खाणीचे राष्ट्रीतीकरण करण्यात आले.
१९७८: जपान चे नामी उमुरा हे एकटे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत.
१९८१: सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती
१९८३: अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.
१९९८: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.
१९९९: नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.
२००९: स्वीडन मध्ये समलिंगी विवाह अधिकृत करण्यात आला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१२१८: जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुलै १२९१)
१९१०: आय.सी.एस चे वरिष्ठ अधिकारी तसचं, भारतातील केरळ आणि मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल निरंजन नाथ वांचू यांचा जन्मदिन.
१९१३: अभिनेता बलराज साहनी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९७३)
१९१५: ‘अंचल’ रामेश्वर शुक्ल, आधुनिक हिंदी कवी
१९१९: भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक मन्ना डे यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर २०१३)
१९२०: मन्ना डे, हिंदी आणि वंग चित्रपटसृष्टीतील गायक
१९२२: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते मधु लिमये यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९९५)
१९३२: कर्नाटकचे १६ वे मुख्यमंत्री आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचा जन्म.
१९४३: नृत्यांगना सोनल मानसिंह यांचा जन्म.
१९४४: सुरेश कलमाडी, भारतीय राजकारणी.
१९७१: भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर अजित कुमार यांचा जन्म.
१९८८: साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्या व हिंदी चित्रपट निर्माता अनुष्का शर्मा यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८८८: ब्रिटीश कालीन भारतातील स्वातंत्र्य सेनानी प्रफुलचंद्र चाकी यांचे निधन.
१९४५: जर्मनीचा चॅन्सेलर नाझी नेता जोसेफ गोबेल्स यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १८९७)
१९५८: नाटककार गणेश शिवराम उर्फ नाना जोग यांचे नागपुर येथे निधन.
१९७२: कमलनयन बजाज, भारतीय उद्योगपती.
१९९३: नानासाहेब गोरे उर्फ ना. ग. गोरे, समाजवादी विचारवंत.
१९९८: गंगुताई पटवर्धन, शिक्षणतज्ञ.
२००२: पंडित आवळीकर, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक.
२००४: भारतीय जनता पार्टी तसेच पूर्ववर्ती पक्ष भारतीय जनता संघाचे नेते तसचं, उत्तर प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि मध्यप्रदेश राज्याचे माजी राज्यपाल यांचे निधन.
२००८: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानी निर्मला देशपांडे यांचे निधन.
२०१३: निखील एकनाथ खडसे यांचे निधन.