२ मे दिनविशेष - 2 May in History
२ मे दिनविशेष - 2 May in History

हे पृष्ठ 2 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 2nd May. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

Flag Day (Poland)

ध्वज दिन : पोलंड.

शिक्षक दिन : ईराण.

शिक्षण दिन : ईंडोनेशिया.

महत्त्वाच्या घटना:

१९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.

१९१८: जनरल मोटर्सने शेवरले मोटर कंपनी विकत घेतली.

१९२१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातुन हिन्दुस्थानात पाठवणी

१९४५: दुसरे महायुद्ध – सोविएत सैन्याने बर्लिनचा पाडाव केला.

१९९४: ’बँक ऑफ कराड’चे ’बँक ऑफ इंडिया’मधे विलिनीकरण झाले.

१९९४: नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग ३७ तास ४५ मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

१९९७: टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान बनले.

१९९७: राष्ट्रीय ’अ’ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कुंटेने ’इंटरनॅशनल मास्टर’ किताबासाठीचे निकष पूर्ण केले.

१९९९: कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन ३ तास ५१ मिनिटांत पार केले.

१९९९: मीरा मोस्कोसो पनामा देशाच्या अध्यक्ष म्हणून निवडलेल्या पहिल्या महिला ठरल्या.

२००४: एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२०११: अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अ‍ॅबोटाबाद येथे हत्या केली.

२०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८९९: मराठी चित्रपटसृष्टी चे चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९९४)

१९२०: शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९८३)

१९२१: ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९२)

१९२२: भारतीय इंग्लिश बिलियर्डस व्यावसायिक खेळाडू विल्सन लिओनेल गार्टन-जोन्स यांचा जन्मदिन.

१९२९: भूतानचे राजे जिग्मे दोरजी वांगचुकयांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९७२)

१९६९: ब्रायन लारा, वेस्ट इंडिजचा डावखुरा फ़लंदाज.

१९७२: स्काईप सॉफ्टवेअर चे सहनिर्माते अहटी हेनला यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१५१९: लिओनार्डो दा व्हिन्ची, इटलीचा चित्रकार, संशोधक.

१६८६: शिवाजीमहाराजांचे दक्षिणेतील अतिशय महत्त्वाकांक्षीतडफ़दार स्वामीनिष्ठ कारभारी रघुनाथपंत हणमंते.

१९६३: महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य डॉ. के. बी. लेले यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८८२)

१९७३: दिनकर केशव बेडेकर, मराठी समीक्षक आणि विचारवंत.

१९७५: शांताराम आठवले, चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि लेखक.

१९८५: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी भाषिक लेखक, पत्रकार व साहित्यिक बनारसी चतुर्वेदी यांचे निधन.

१९९८: पुरूषोत्तम काकोडकर, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि कॉंग्रेस नेते.

१९९९: पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर, जयपूर घराण्याचे गायक.

२००१: मोहनलाल पिरामल, भारतीय उद्योगपती.

२०११: ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *