२३ एप्रिल दिनविशेष - 23 April in History
२३ एप्रिल दिनविशेष - 23 April in History

हे पृष्ठ 23 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 23rd April. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

जागतिक ग्रंथ तथा रचनास्वायत्त दिन

महत्त्वाच्या घटना:

१६३५: अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.

१७७४: ब्रिटीश कमांडर कर्नल चेम्पमेन यांनी रोहिलखंड येथील रोहिला सेनेचा पराभव करून रोहिलखंड आपल्या ताब्यात घेतले.

१८१८: दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले. [चैत्र व. ३]

१८९१: रुस देशाची राजधानी मास्को येथिल यहुदी धार्मिक लोकांना देशाबाहेर काढून देण्यात आले.

१९३५: युरोपियन राष्ट्र पोल्लंड ने संविधान आमलात आणले.

१९८४: वैज्ञानिकांनी एड्स या विषाणूचा शोध लावला.

१९९०: नामिबिया संयुक्त राष्ट्रांत प्रवेश होऊन तो १६० वा सदस्य देश बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१५६४ (baptised): विल्यम शेक्सपियर, इंग्लिश साहित्यिक.

१५६४: विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता. युनेस्कोने घेतलेल्या पुढाकारामुळे विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ १९९५ पासून आजचा दिवस हा ’जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. (मृत्यू: २३ एप्रिल १६१६)

१७९१: जेम्स बुकॅनन – अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १ जून १८६८)

१८५८: मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ (मृत्यू: ४ आक्टोबर १९४७)

१८५८: पंडिता रमाबाई – विधवा, परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका, संस्कृत पंडित (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)

१८७३: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक (मृत्यू: २ जानेवारी १९४४)

१८९७: लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: २७ डिसेंबर १९७२)

१९२७: हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या गायिका व सर्बहार वादक अन्नपूर्णा देवी यांचा जन्मदिन.

१९३८: एस. जानकी – शास्त्रीय गायिका

२००५: मी अॅट द झू हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

सत्यजित रे, जगप्रसिद्ध सिने दिग्दर्शक

१६१६: विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता. युनेस्कोने घेतलेल्या पुढाकारामुळे विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ

१९९५: पासून आजचा दिवस हा ’जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. (जन्म: २३ एप्रिल १५६४)

१८५०: विल्यम वर्डस्वर्थ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी. त्यांची ’डॅफोडिल्स’ ही अतिशय गाजलेली कविता आहे. (जन्म: ७ एप्रिल १७७०)

१९२६: हेन्‍री बी. गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ (जन्म: २३ डिसेंबर १८५४)

१९५८: शंकर श्रीकृष्ण देव – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक (जन्म: १० आक्टोबर १८७१)

१९६८: संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय पटियाला घराण्यातील हिंदुस्थानी शास्त्रीय गायक उस्ताद बडे गुलाम अली खान यांचे निधन.

१९७३: हिंदी आणि ब्रजभाषेतील प्रख्यात कवी आणि लेखक धीरेंद्र वर्मा याचं निधन.

१९८६: जिम लेकर – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)

१९९२: सत्यजित रे – ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न. ’पथेर पांचाली’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला देशविदेशात अनेक गौरव मिळाले. त्यांना विशेष ऑस्कर पुरस्कारही देण्यात आला होता. (जन्म: २ मे १९२१)

१९९७: डेनिस कॉम्पटन – इंग्लिश क्रिकेटपटू, ’गोल्डन बॉय’ (जन्म: २३ मे १९१८)

२०००: मराठी चित्रपटांना आधार मिळावा या ध्येयाने प्रेरित होऊन गेली ४० वर्षे लालबागमधील ’भारतमाता’ चित्रपटगृह चालवणारे यशवंत सदाशिव ऊर्फ बाबासाहेब भोपटकर यांचे निधन (जन्म: ? ? ????)

२००१: जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, गोवा मुक्ती संग्रामातील एक झुंजार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, विज्ञान, निसर्ग आणि शिकार इ. विविध क्षेत्रांमधे दीर्घकाळ सक्रिय असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष व केसरीचे संपादक (जन्म: १२ आक्टोबर १९२१)

२००७: बोरिस येलत्सिन – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष (जन्म: १ फेब्रुवारी १९३१)

२०१३: शमशाद बेगम – पार्श्वगायिका (जन्म: १४ एप्रिल १९१९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *