dinvishesh-mpsc-14-april
dinvishesh-mpsc-14-april

हे पृष्ठ 14 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 14th April. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१७३६: चिमाजीअप्पांनी मोघल बादशहाचा हस्तक जंजिरा येथील सिद्दीसाताचा पराभव करुन मराठी सत्तेचा दरारा बसविला.

१८६५: जॉन विल्कस बूथने अब्राहम लिंकनवर गोळी झाडली. लिंकन दुसर्‍या दिवशी मृत्यू पावला.

१९१२: आर.एम.एस. टायटॅनिकची हिमनगाशी टक्कर. बोटीला भगदाड पडून बुडु लागली.

१९४४: मुंबईच्या बंदरात उभ्या असलेल्या बोटीवर महाभयानक विस्फोट. ३०० ठार. त्याकाळच्या २ कोटी पाउंडचे नुकसान.

१९८६: बांगलादेशमध्ये १ किलो वजनाच्या अतिप्रचंड गारांचा वर्षाव. ९२ ठार. गारांच्या वजनाचा हा विक्रम अजुन अबाधित आहे.

१९९५: टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.

१९४४: मुंबई गोदीत उभ्या असलेल्या ’फोर्ट स्टिकिन’ या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटि पौंडा इतके आर्थिक नुकसान झाले.

१७३६: [वैशाख व. ५ शके १६५८] चिमाजीअप्पाने अद्वितीय पराक्रम करुन जंजिर्‍याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.

१६६५: सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.

१६६१: प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार

१८९१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार.

१९४३: रामदास फुटाणे – वात्रटिकाकार

१९४२: मार्गारेट अल्वा – केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल

१९२७: द. मा. मिरासदार – विनोदी लेखक (मृत्यू: ????)

१९२२: उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्‌मविभूषण (१९६९), मॅकआर्थर फेलोशिप, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, नॅशनल हेरिटेज फेलोशिप (मृत्यू: १८ जून २००९ – सॅन अन्सेल्मो, कॅलिफोर्निया, यू. एस. ए.)

१९१९: शमशाद बेगम – पार्श्वगायिका (मृत्यू: २३ एप्रिल २०१३)

१९१४: शांता हुबळीकर – अभिनेत्री (मृत्यू: १७ जुलै १९९२)

१८९१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. (मृत्यू: ६ डिसेंबर १९५६)

१६२९: क्रिस्टियन हायगेन्स – डच गणितज्ञ, खगोलविद्‌ आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध (मृत्यू: ८ जुलै १६९५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९५०: श्री रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञ.

१९६२: सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.

२०१३: राम प्रसाद गोएंका – उद्योगपती (जन्म: १ मार्च १९३०)

१९९७: चंदू पारखी – चित्रपट आणि नाट्य अभिनेते (जन्म: ? ? ????)

१९६३: केदारनाथ पांडे तथा राहूल सांकृतायन – इतिहासकार (जन्म: ९ एप्रिल १८९३)

१९६२: भारतरत्‍न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या – अभियंते, विद्वान, मुत्सद्दी आणि मैसूर संस्थानचे दिवाण

१९५०: भारतीय तत्त्ववेत्ते योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर समाधिस्थ झाले. [चैत्र व. १२ शके १७८३] (जन्म: ३० डिसेंबर १८७९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.