dinvishesh-mpsc-13-april
dinvishesh-mpsc-13-april

हे पृष्ठ 13 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 13th April. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१७३१ : इतिहासप्रसिध्द वारणेचा तह होऊन शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याचे दोन भाग झाले

१७७२ : वॉरन हेस्टींग्ज यांची गव्हर्नर जनरल म्हणून कलकत्ता येथे नेमणूक

१९१९ : जालियानवाला बागची कत्तल – भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ही एक महत्त्वाची घटना होती.

१९३९ : भारतात हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना.

१९४८ : भुवनेश्वर ही ओरिसा राज्याची राजधानी करण्यात आली.

१९४२ : व्ही. शांताराम ’प्रभात फिल्म कंपनी’तून बाहेर पडले.

१८४९ : हंगेरी प्रजासत्ताक बनले.

१७३१ : छत्रपती शाहू (सातारा) आणि छत्रपती संभाजी (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरुन असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला. [चैत्र व. २]

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९१३ : दत्ताजी ताम्हाणे, स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी विचारवंत. मृत्यू

१९६३ : गॅरी कास्पारॉव्ह – रशियन बुद्धीबळपटू

१९५६ : सतीश कौशिक – अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक

१९०६ : सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक (मृत्यू: २२ डिसेंबर १९८९)

१९०५ : ब्रूनो रॉस्सी – पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणार्‍या वैश्विक किरणांच्या विकीरणा विषयी संशोधन करणारे इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९९३ – केम्ब्रिज, मॅसेच्युसेटस, यू. एस. ए.)

१९२२ : ज्यूलिअस न्येरेरे – टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ आक्टोबर १९९९)

१९४० : नजमा हेपतुल्ला – राज्यसभा सदस्य

१८९५ : वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे (मृत्यू: २९ आक्टोबर १९७८)

१७४३ : थॉमस जेफरसन – अमेरिकेचे ३ रे राष्ट्राध्यक्ष, २ रे उपाध्यक्ष आणि १ ले परराष्ट्रमंत्री. त्यांनी मांडलेल्या विचारांवर अमेरिकेची राज्यघटना आधारित असून तेथील लोकशाहीला ’जेफरसनची लोकशाही’ असे म्हणतात. (मृत्यू: ४ जुलै १८२६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

अनंत काकबा प्रियोळकर.

२००८ : दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.

२००० : विश्वास नरहर तथा ’बाळासाहेब’ सरपोतदार – चित्रपट निर्माते व वितरक, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष (जन्म: ? ? ????)

१९९९ : डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले – कृषीतज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: ? ? ????)

१९८८ : हिरामण बनकर – महाराष्ट्र केसरी

१९७३ : बलराज सहानी – अभिनेता व दिग्दर्शक (जन्म: १ मे १९१३)

१९५१ : भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते (जन्म: २४ आक्टोबर १८६८)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.