हे पृष्ठ 23 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 23 November. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
–
महत्त्वाच्या घटना:
१९२४: एडविन हबल यांनी ’देवयानी’ (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.
१९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.
१९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.
१९७१: चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.
१९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
१९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल ’अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार’ प्रदान
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
८७०: बायझँटाईन सम्राट अलेक्झांडर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून ९१३)
१७५५: थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक (मृत्यू: १३ जानेवारी १८३२)
१८८२: वालचंद हिराचंद दोशी – उद्योगपती (मृत्यू: ८ एप्रिल १९५३)
१८९७: निराद सी. चौधरी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९७५) बंगाली/इंग्लिश लेखक. १९५१ मधे त्यांचे ’अॅन आटोबायोग्राफी ऑफ अॅन अननोन इंडियन’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्याच्या १४ आवृत्त्या निघाल्या. (मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)
१९२३: नागनाथ संतराम तथा ’ना. सं.’ इनामदार – लेखक (मृत्यू: १६ आक्टोबर २००२)
१९२६: सत्यनारायण राजू ऊर्फ ’सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू (मृत्यू: २४ एप्रिल २०११)
१९३०: गीता दत्त – अभिनेत्री आणि गायिका (मृत्यू: २० जुलै १९७२)
१९६१: पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.
१९६७: गॅरी कर्स्टन – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक
१९८४: अमृता खानविलकर – अभिनेत्री
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९३७: जगदीशचंद्र बोस – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन (जन्म: ३० नोव्हेंबर १८५८)
१९५९: ’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते (जन्म: १२ मार्च १८९१)
१९७०: सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१०)
१९८९: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)
१९९३: ब्रूनो रॉस्सी – पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणार्या वैश्विक किरणांच्या विकीरणा विषयी संशोधन करणारे इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: १३ एप्रिल १९०५ – व्हेनिस, ईटली)
१९९९: कुमुद सदाशिव पोरे – अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ? ? ????)
२०००: बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक (जन्म: २८ जून १९२८ – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र)
२००६: झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३६)