२४ एप्रिल दिनविशेष - 24 April in History
२४ एप्रिल दिनविशेष - 24 April in History

हे पृष्ठ 24 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 24th April. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • प्रजासत्ताक दिन – गाम्बिया.
  • जागतिक श्वान दिन
राष्ट्रीय पंचायती राज दिवस

राष्ट्रीय पंचायती राज दिवस

महत्त्वाच्या घटना:

१६७४: भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करुन जिंकला.

१७१७: खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.

१८००: अमेरिकेतील महाप्रचंड अशा लायब्ररी ऑफ काँग्रेसची (Library of Congress) स्थापना झाली. हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालय आहे.

१९६७: वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमिर कोमारोव्ह हा मरण पावणारा पहिला अंतराळवीर ठरला.

१९६८: मॉरिशस संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) सदस्य बनला.

१९७०: गाम्बिया प्रजासत्ताक बनले.

१९९०: डिस्कव्हरी या अंतराळयानातुन हबल ही दुर्बिण सोडण्यात आली.

१९९३: इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणार्‍या विमानाचे ३ अतिरेक्यांनी अपहरण केले. ब्लॅक कॅट कमांडोजनी केलेल्या कारवाईत तिन्ही अतिरेकी ठार झाले व सर्व १४१ प्रवाशांची सुखरुप मुक्तता झाली.

२०१३: ढाका, बांगलादेश मध्ये इमारत कोसळून ११२९ जणांचा बळी गेला आणि २५०० जण जखमी झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८९६: रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार. ’पाणकळा’, ’सराई’, ’पड रे पाण्या’, ’आई आहे शेतात’, ’गानलुब्धा’, ’मृगनयना’ वगैरे त्यांच्या कादंबर्‍या अतिशय गाजल्या. (मृत्यू: ४ जुलै १९८०)

१८८९: सर स्टॅफोर्ड क्रिप्स – इंग्लिश राजकारणी (मृत्यू: २१ एप्रिल १९५२)

१९१०: राजा परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७९)

१९२९: राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक (मृत्यू: १२ एप्रिल २००६)

१९३४: पद्मभूषण व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय लेखक, पत्रकार, वक्ते, चित्रपट-निर्माता, समीक्षक आणि कार्यकर्ते डी. जयकांत यांचा जन्मदिन

१९४१: उर्दू अकादमीचे माजी अध्यक्ष अजीज कुरेशी यांचा जन्मदिन.

सचिन तेंडुलकर – महान क्रिकेटपटू, भारतर‍त्‍न
सचिन तेंडुलकर – महान क्रिकेटपटू, भारतर‍त्‍न

१९४२: बार्बारा स्ट्रायसँड – अमेरिकन अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका

???? : वसंतराव पटवर्धन – बँकिंग तज्ञ

१९५६: पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारताच्या छत्तीसगड राज्यातील पहिल्या महिला कलाकार आणि गायिका तीजनबाई यांचा जन्मदिन

१९७०: डॅमियन फ्लेमिंग – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९७३: सचिन तेंडुलकर – महान क्रिकेटपटू, भारतर‍त्‍न

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९४२: मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (जन्म: २९ डिसेंबर १९००)

१९४४: दूरदर्शी, परोपकारी, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेता आणि महात्मा गांधी काशी विद्यापीठाचे संस्थापक तसचं, ‘दैनिक आज’ या हिंदी वृत्तपत्राचे संस्थापक शिवप्रसाद गुप्त यांचे निधन.

१९६०: लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर – नामवंत वकील, महाराष्ट्र मंडळाचे एक संस्थापक, केसरीचे संपादक आणि हिंदू महासभेचे नेते (जन्म: ? ? १८६०)

१९७२: जामिनी रॉय – चित्रकार (जन्म: ११ एप्रिल १८८७)

१९७४: रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक (जन्म: २३ सप्टेंबर १९०८)

जामिनी रॉय – चित्रकार
जामिनी रॉय – चित्रकार

१९९४: शंतनुराव किर्लोस्कर – पद्मभुषण पुरस्कार विजेते उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ (जन्म: २८ मे १९०३)

१९९९: सुधेन्दू रॉय – चित्रपट व कला दिग्दर्शक (जन्म: ? ? १९२१ – पाबना, पश्चिम बंगाल)

२००९: प्रख्यात भारतीय लेखक, कवी व वक्ता तसचं, धार्मिक नेता महात्मा रामचंद्र वीर यांचे निधन.

२०११: सत्यनारायण राजू ऊर्फ ’सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू (जन्म: २३ नोव्हेंबर १९२६)

२०१४: भारतीय राजकारणी शोभा नेगी रेड्डी यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९६८)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *