राजेश खन्ना
राजेश खन्ना

हे पृष्ठ 29 डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २९ डिसेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 29 December. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

रिचर्ड फाइनमॅन
रिचर्ड फाइनमॅन

१९५९ : नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.

१९५९ : पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

रामानंद सागर
रामानंद सागर

१९४२ : राजेश खन्ना – चित्रपट अभिनेते, निर्माते आणि राज्यसभेचे सदस्य (मृत्यू: १८ जुलै २०१२)

१९१७ : रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते (मृत्यू: १२ डिसेंबर २००५)

१९०४ : कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी (मृत्यू: ११ नोव्हेंबर १९९४)

१९०० : मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (मृत्यू: २४ एप्रिल १९४२)

१८०८ : अँड्र्यू जॉन्सन – अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ३१ जुलै १८७५)

१८०० : चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक (मृत्यू: १ जुलै १८६०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

टोनी ग्रेग
टोनी ग्रेग

२०१२ : टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक (जन्म: ६ आक्टोबर १९४६)

१९८६ : हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म: १० फेब्रुवारी १८९४)

१९६७ : पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक, १९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: २४ जून १८९७)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.