हे पृष्ठ 16 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही १६ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 16 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- आंतरराष्ट्रीय ओझोन दिन
- मेक्सिकोचा स्वातंत्र्यदिन
महत्त्वाच्या घटना:
१६२०: ’मेफ्लॉवर’ जहाजाने साउदॅम्पटन बंदरातुन उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले.
१८२१: मैक्सिकोच्या स्वातंत्रतेला मान्यता देण्यात आली होती.
१८६१: ब्रिटन देशांतील पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाता उघडण्यास सुरुवात झाली.
१९०८: ’जनरल मोटर्स कॉर्पोरेशन’ या कंपनीची स्थापना झाली.
१९३५: इंडियन कंपनीज अॅक्ट अन्वये ’बँक ऑफ महाराष्ट्र’ची नोंदणी करण्यात आली.
१९४५: दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याने रॉयल नेव्हीसमोर शरणागती पत्करली
१९६३: झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.
१९६७: सोव्हियत संघाने पूर्व कजाख मध्ये आण्विक चाचणी केली.
१९७५: पापुआ न्यू गिनी या देशाला (ऑस्ट्रेलियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९८७: ओझोनच्या थराच्या कमीत कमी संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे.
१९९७: आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत राजीव बालकृष्णन याने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत १०.५० सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम केला.
१९९७: संस्कृत भाषेसंदर्भात प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल मुंबई येथील मराठा मंदिर संस्थेच्या वरळी हायस्कूलमधील संस्कृतचे निवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बासअली बिराजदार यांना ’राष्ट्रीय संस्कृत पंडित’ हा राष्ट्रपतींकडून दिला जाणारा पुरस्कार जाहीर
२००८: भारतीय हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) च्या कर्मचाऱ्यांना विश्वकर्मा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१३८०: चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: २१ आक्टोबर १४२२)
१३८६: हेन्री (पाचवा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: ३१ ऑगस्ट १४२२)
१८५३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन डॉक्टर आल्ब्रेख्त कॉसेल यांचा जन्म.
१८८८: बेंटले मोटर्स लिमिटेड चे डब्ल्यू ओ. बेंटले यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९७१)
१९०७: वामनराव सडोलीकर – भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या जयपूर-अत्रोली घराण्यातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक (मृत्यू: २५ मार्च १९९१)
१९१३: कमलाबाई कृष्णाजी ओगले – ’रुचिरा’ या पाकशास्त्रावरील प्रचंड खपाच्या पुस्तकाच्या लेखिका (मृत्यू: २० एप्रिल १९९९)
१९१६: एम. एस. सुब्बुलक्ष्मी – भारतरत्न, पद्मभूषण, पद्म विभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय कर्नाटकी गायक (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)
१९२३: सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यी यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१५)
१९२५: आयर्लंडचे पंतप्रधान चार्ल्स हॉगे यांचा जन्म.
१९३१: भारतीय क्रिकेट पंच आर. रामचंद्र राव यांचा जन्मदिन.
१९४२: नामदेव धोंडो तथा ’ना. धों’ महानोर – निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी, त्यांना ’पानझड’ या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. १९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
१९५४: संजय बंदोपाध्याय – भारतातील बंगाली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रख्यात सितार वादक
१९५६: डेव्हिड कॉपरफिल्ड – अमेरिकन जादूगार
१९७१: भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गीतकार, पटकथा लेखक व कवी प्रसून जोशी यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१६८१: मुघल शासक दारा शिकोह आणि सम्राट औरंगजेब यांची मोठी बहीण जहाँनारा बेग़म यांचे निधन.
१७३६: डॅनियल फॅरनहाइट – जर्मन शास्त्रज्ञ (जन्म: २४ मे १६८६)
१८२४: लुई (अठरावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: १७ नोव्हेंबर १७५५)
१९३२: सर रोनाल्ड रॉस – हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९०२) ब्रिटिश डॉक्टर (जन्म: १३ मे १८५७ – आल्मोडा, उत्तराखंड)
१९४४: भारतीय अभियंता व काशी हिंदू महाविद्यालयाचे माजी उप कुलगुरू ज्वालाप्रसाद यांचे निधन.
१९६५: फ्रेड क्विम्बी – अमेरिकन अॅनिमेशनपट निर्माते (जन्म: ३१ जुलै १८८६)
१९६५: परमवीर चक्र पुरस्कार विजेता भारतीय सैन्य अधिकारी लेफ्टनंट कर्नल ए.बी. तारापोर यांचे निधन.
१९७३: पुण्यातील जुन्या पिढीतील सरदार, पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचे निधन. त्यांचे मूळ नाव श्रीधर पांडुरंग प्रभुणे होते. मुजुमदारांकडे ते दत्तक गेले. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते चोवीस वर्षे चिटणीस होते.
१९७७: केसरबाई केरकर – साहित्य नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित जयपूर-अतरौली घराण्याच्या भारतीय शास्त्रीय गायिका (जन्म: १३ जुलै १८९२)
१९८४: बिकीनि चे निर्माते लुई रायर्ड यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९८४)
१९९४: जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार व पत्रकार. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. ते ’ठणठणपाळ’ या टोपणनावाने विनोदी व मार्मिक लेखन करीत. (जन्म: १४ ऑगस्ट १९२५)
२००५: लेसर चे शोधक गॉर्डन गूल्ड यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९२०)
२०१२: आयमॅक्स चे सहसंस्थापक रोमन कोरियटर यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९२६)
२०१७: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय वायुदलाचे वरिष्ठ अधिकारी मार्शल अर्जन सिंह यांचे निधन.