निळू फुले
निळू फुले

हे पृष्ठ 13 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १३ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 13 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

रुथ एलीस

२०११ : मुंबई शहरात झालेल्या ३ बॉम्बस्फोटात २६ जण ठार तर १३० जण जखमी झाले.

१९७७ : रोहित्रावर (transformer) वीज पडल्यामुळे न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित झाला.

१९५५ : २८ वर्षीय रुथ एलीसला (Ruth Ellis) प्रियकराचा खून केल्याबद्दल फासावर चढविण्यात आले. हॉलो वे तुरूंगातली ही फाशी ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.

जतिंद्रनाथ दास

१९२९ : जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरु केले. या उपोषणातच ६३ दिवसांनी (१३ सप्टेंबर १९२९) त्यांचा मृत्यू झाला.

१९०८ : लोकमान्य टिळकांवर दुसर्‍या राजद्रोहाच्या खटल्याचे काम सुरु झाले.

१८६३ : सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.

१८३७ : राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेसमध्ये (Buckingham Palace) राहायला गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.

१६६० : पावनखिंड झुंजवणार्‍या वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचल्याच्या खुणेच्या तोफांचे आवाज ऐकल्यावर ‘आता मी सुखाने मरतो’ असे म्हणून प्राण सोडला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

केसरबाई केरकर
हॅरिसन फोर्ड

१९४२ : हॅरिसन फोर्ड – अमेरिकन अभिनेता

१८९२ : केसरबाई केरकर – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

मनोहारी सिंग

२०१० : मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक (जन्म: ८ मार्च १९३१)

२००९ : निळू फुले – अभिनेते (जन्म: ? ? १९३०)

२००० : इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका (जन्म: ४ जानेवारी १९१४)

१९९४ : पं. कृष्णा गुंडोपंत तथा ’के. जी.’ गिंडे – शास्त्रीय (धृपद) गायक, संगीतकार व शिक्षक (जन्म: २६ डिसेंबर १९२५)

१९९० : अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ ’बॉबी’ तल्यारखान – क्रीडा समीक्षक व समालोचक (जन्म: ? ? १८९७)

१९६९ : महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक. (जन्म: १२ जानेवारी १९०२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *