४ जानेवारी दिनविशेष - 4 January in History
४ जानेवारी दिनविशेष - 4 January in History

हे पृष्ठ 4 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ४ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 4 January. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • ब्रम्हदेश (म्यानमार) चा मुक्तिदिन

महत्त्वाच्या घटना:

१४९३: क्रिस्तोफर कोलंबस त्यांच्या पहिल्या सफरीच्या शेवटी नव्या जगातून परत निघाले.

१६४१: कर भरायला नकार देणार्‍या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिरला. या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली. त्यात चार्ल्सचा पराभव होऊन मग त्याचा शिरच्छेद करण्यात आला.

१८४७: सॅम्युअल कॉल्टने अमेरिकन सरकारला पहिले रिव्हॉल्व्हर पिस्तुल विकले.

१८८१: लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे ’केसरी’ या वृत्तपत्राची सुरूवात केली.

१८८५: आंत्रपुच्छ (appendix) काढुन टाकण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. विल्यम डब्ल्यू. ग्रांट यांनी मेरी गार्टसाईड या रुग्णावर केली.

१९२६: क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.

१९३२: सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरूंना दोन वर्षांची शिक्षा

१९३२: जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांना इस्ट इंडिया कंपनी चे तेव्हाचे व्हाईस रॉय विलिंगडन यांनी अटक केली.

१९४४: १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.

१९४८: ब्रम्हदेश (म्यानमार) ला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९५२: ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.

मेहेरचंद महाजन
मेहेरचंद महाजन

१९५४: मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९५८: १९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले.

१९५८: स्पुटनिक-१ हा पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर परत उतरला.

१९५९: लूना – १ हे अंतराळयान चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले.

१९६२: न्यूयॉर्क अमेरिका येथे पहिली चालकरहित रेल्वे सुरु झाली.

१९७२: दिल्लीला क्रिमिनोलॉजी आणि फॉरेन्सिक विज्ञान संस्थेचे उद्घाटन.

१९९०: पाकिस्तान मध्ये दोन ट्रेन एकमेकांना धडकल्या मुळे ४०० लोक मारल्या गेले आणि ५०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.

१९९६: साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या ’बिंब प्रतिबिंब’ या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.

२००४: नासाची मानवरहित स्पिरीट ही गाडी मंगळ ग्रहावर उतरली.

२०१०: ’बुर्ज खलिफा’ या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्‍घाटन झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६४३: इंग्लिश शास्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म.

१८०९: लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (मृत्यू: ६ जानेवारी १८५२)

१८१३: सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक (मृत्यू: १२ जानेवारी १८९७)

१८८७: ला प्रसिद्ध लेखक लोचन प्रसाद पाण्डेय यांचा जन्म.

१८९२: ला भारतीय अर्थशास्त्रज्ञ जे.सी. कुमारप्पा यांचा जन्म.

१९००: अमेरिकन पक्षीय जेम्स बाँड यांचा जन्म.

१९०९: मराठी नवसाहित्यिकार प्रभाकर पाध्ये यांचा जन्म.

प्रदीप कुमार

१९१४: इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका (मृत्यू: १३ जुलै २०००)

१९२४: विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (मृत्यू: २६ सप्टेंबर १९९६)

१९२५: प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (मृत्यू: २७ आक्टोबर २००१)

१९३१: ला भारतीय चित्रपट अभिनेत्री निरुपा रॉय यांचा जन्म.

१९४०: मराठी कादंबरीकार श्रीकांत सिनकर यांचा जन्म.

कल्पनाथ राय – केन्द्रीय मंत्री
कल्पनाथ राय – केन्द्रीय मंत्री

१९४१: कल्पनाथ राय – केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९९ – नवी दिल्ली)

१९६५: भारतीय चित्रपट अभिनेते आदित्य पंचोली यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७५२: गॅब्रिअल क्रॅमर – स्विस गणिती (जन्म: ३१ जुलै १७०४)

१८५१: दुसरे बाजीराव पेशवे यांचे निधन.

१९०७: गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, ’सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (जन्म: २० आक्टोबर १८५५ – नडियाद, गुजराथ)

१९०८: राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दूधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते. (जन्म: ११ नोव्हेंबर १८५१ – कशेळी, राजापूर, रत्‍नागिरी)

१९३१: ला भारताचे प्रसिद्ध पत्रकार मुहम्मद अली यांचे निधन.

राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा
राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा

१९६१: आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १८८७)

१९६५: टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २६ सप्टेंबर १८८८)

१९९४: राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (जन्म: २७ जून १९३९)

२०१६: ला भारताचे ३८ वे न्यायाधीश एस. एच. कपाड़िया यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *