शम्मी कपूर
शम्मी कपूर

हे पृष्ठ 14 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १४ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 14 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

स्वातंत्र्यवीर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर

२०१० : पहिल्या ’युवा ऑलिम्पिक स्पर्धा’ सिंगापूरमधे घेण्यात आल्या.

२००६ : श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.

१९७१ : बहारीनला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९५८ : ’एअर इंडिया’ची दिल्ली – मॉस्को विमानसेवा सुरू झाली.

१९४७ : भारताच्या घटनासमितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली.

१९४७ : पाकिस्तानला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९४३ : नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.

१८९३ : मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश बनला.

१८६२ : मुंबई उच्‍च न्यायालयाची स्थापना

१८६२ : कलकत्ता उच्‍च न्यायालयाची स्थापना

१६६० : मुघल फौजांनी संग्रामगड (चाकणचा किल्ला) ताब्यात घेतला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ ’जॉनी लीवर
जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ ’जॉनी लीवर

१९६८ : प्रवीण आम्रे – क्रिकेटपटू

१९६२ : रमीझ राजा – पाकिस्तानी क्रिकेटपटू व समालोचक

१९५७ : जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ ’जॉनी लीवर’ – विनोदी अभिनेता

१९२५ : जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार व पत्रकार. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. ते ’ठणठणपाळ’ या टोपणनावाने विनोदी व मार्मिक लेखन करीत. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९९४)

१९११ : वेदतिरी महाऋषी – भारतीय तत्त्वज्ञानी (मृत्यू: ? ? ????)

१९०७ : गोदावरी परुळेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून त्यांनी सनद मिळवली. तलासरी, डहाणू, शिरगाव या भागातील डोंगरदर्‍यांत फिरून वारल्यांच्या पिळवणुकीचे अनुभव त्यांनी ऐकले व आदिवासींमधे जागृतीचे कार्य केले. ’जेव्हा माणूस जागा होतो’ हे त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करुन देणारे आहे. (मृत्यू: ८ आक्टोबर १९९६)

१७७७ : हान्स क्रिस्टियन ओरस्टेड – डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ९ मार्च १८५१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

विलासराव देशमुख
विलासराव देशमुख

२०१२ : विलासराव देशमुख – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री (जन्म: २६ मे १९४५)

२०११ : शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता (जन्म: २१ आक्टोबर १९३१)

१९८८ : एन्झो फेरारी – रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर (जन्म: १८ फेब्रुवारी १८९८)

१९८४ : कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] (जन्म: १५ जानेवारी १९२६)

१९५८ : जीन फ्रेडरिक जोलिओट – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९३५) मिळवणारा फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (जन्म: १९ मार्च १९००)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.