२६ मे दिनविशेष - 26 May in History
२६ मे दिनविशेष - 26 May in History

हे पृष्ठ 26 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 26th May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्धाची सुरुवात.
भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्धाची सुरुवात.

महत्त्वाच्या घटना:

१८९६: निकोलस (दुसरा) रशियाचा झार बनला.

१९५०: ब्रिटन देशाने पेट्रोलच्या खरेदीसाठी राशन कार्डच्या सक्तीचा कायदा रद्द केला.

१९८६: युरोपमधील देशांनी युरोपीय संघाचा झेंडा स्वीकारला.

१९७१: बांगलादेशातील सिल्हेट येथे पाकिस्तानी सैन्याने ७१ हिंदूंची कत्तल केली.

१९७३: बहारीन देशाने संविधान स्वीकारले.

१९८९: मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उद्‍घाटन झाले.

१९९१: लॉडा एर फ्लाइट ००४ हे बोईंग ७६७ प्रकारचे विमान हवेत असताना थ्रस्ट रिव्हर्सर लागल्याने थायलंडमध्ये पडले. २२३ ठार.

१९९९: भारत-पाकिस्तानमध्ये कारगिल युद्धाची सुरुवात.

१९९९: श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. – सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. – टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.

२००७: भारत आणि जर्मनी देशांतर्गत सुरक्षा संबंधी करार करण्यात आले.

२०१४: नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

बेंजामिन पिअरी पाल, भारतीय कृषी वैज्ञानिक व संशोधक.
बेंजामिन पिअरी पाल, भारतीय कृषी वैज्ञानिक व संशोधक.

१४७८: पोप क्लेमेंट सातवा.

१५६६: महमद तिसरा, ओट्टोमन सम्राट.

१६६७: फ्रेन्च गणिती अब्राहम डी. मुआव्हर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १७५४)

१७९९: अलेक्सांद्र पुश्किन, रशियन लेखक.

१८६७: टेकची मेरी, पंचम जॉर्जची राणी.

१८८५:  नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९१९)

१९०२: नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९६८)

राम गणेश गडकरी
राम गणेश गडकरी

१९०६: बेंजामिन पिअरी पाल, भारतीय कृषी वैज्ञानिक व संशोधक.

१९०७: जॉन वेन, अमेरिकन अभिनेता.

१९०८: न्विन न्गॉक थो, दक्षिण व्हियेतनामचा पंतप्रधान.

१९०९: आदोल्फो लोपेझ मटियोस, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.

१९१२: यानोस कादार, हंगेरीचा पंतप्रधान.

१९३०: भारतीय-ईराणी भाषेतील शब्दलेखक आणि समीक्षक करीम इमामी यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै २००५)

१९३७: भारतीय अभिनेत्री आणि गायक मनोरमा यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २०१५)

१९३८: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता बी. बिक्रम सिंग यांचा जन्म. (मृत्यू: १२ मे २०१३)

१९४५: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट २०१२)

१९४६: प्रख्यात भारतीय राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या तसचं, मजदूर किसान शक्ती संघटनेच्या संस्थापिका अरुणा रॉय यांचा जन्मदिन.

१९४९: हँक विल्यम्स जुनियर, अमेरिकन संगीतकार.

१९६१: भारतीय-अमेरिकन दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक तारसेम सिंग यांचा जन्म.

१९६६: झोला बड, दक्षिण आफ्रिकेची धावपटू.

१९६८: सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेते, तसचं, दूरदर्शन विनोदी मालिका तारक मेह्ता का उलटा चश्मा या विनोदी मालिकेतील प्रख्यात कलाकार दिलीप जोशी यांचा जन्मदिन.

१९८३: अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेल रत्न, पद्मश्री, सीएनएन-आयबीएन इंडियन ऑफ दी इयर स्पोर्ट्स तसचं, सन २००८ साली झालेल्या उन्हाळी ऑलिंपिकमधील कुस्ती – पुरुष फ्रीस्टाईल लाइटवेट पदक विजेता सुप्रसिद्ध भारतीय फ्री स्टाईल कुस्तीपटू सुशील कुमार सोलंकी यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७०३: विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक सॅम्युअल पेपिस यांचे निधन. (जन्म: २३ फेब्रुवारी १६३३)

१९०२: अमेरिकन संशोधक अल्मोन स्ट्राउजर यांचे निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १८३९)

१९०८: अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८३५)

१९७२: सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री राजलक्ष्मी यांचे निधन.

२०००: प्रभाकर शिरुर, चित्रकार.

२०००: अर्थतज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक श्रीपाद वामन काळे यांचे निधन.

२०१४: भारतीय राज्य केरळमधील पठाणमथिट्टा जिल्ह्यातील मालंकारा ऑर्थोडॉक्स सिरियन चर्च चे धर्मगुरू कॅथोलिक बेसीलिओस मार थोमा डिडिमॉस पहिले यांचे निधन.

२०१७: पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय पोलीस सेवा अधिकारी आणि पंजाब राज्याचे माजी पोलीस महासंचालक कंवर पाल सिंह गिल यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *