हे पृष्ठ 25 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
On this page, we will list all historical events that have occurred on 25th May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- मे क्रांती दिन : आर्जेन्टिना, लिब्या.
- राष्ट्र दिन : जॉर्डन, सुदान, आर्जेन्टिना.
- आफ्रिका मुक्ती दिन : चाड, लायबेरिया, माली, मॉरिटानिया, नामिबिया, झांबिया, झिम्बाब्वे.
- मुक्ती दिन : लेबेनॉन.
- युवा दिन : युगोस्लाव्हिया.
महत्त्वाच्या घटना:
१०८५: कॅस्टिलचा राजा आल्फोन्सो सहाव्याने स्पेनमधील टोलेडो शहर मूरांकडून जिंकले.
१६११: मुघल शासक जहागीर यांनी महरुन्निसा यांच्याबरोबर विवाह केला. यानंतर त्यांचे नाव नूरजहाँ असे पडले.
१६५९: रिचर्ड क्रॉमवेलने इंग्लंडच्या रक्षकपदाचा राजीनामा दिला.
१६६६: शिवाजी महाराज आग्रा येथे नजरकैदेत.
१८१०: सेमाना दि मेयो – आर्जेन्टिनात नागरिकांनी बोयनोस एर्समधून स्पेनच्या व्हाइसरॉयला हाकलले.
१८६५: अमेरिकन यादवी युद्ध – अलाबामात मोबिल शहराजवळ शस्त्रसाठ्यात स्फोट. ३०० ठार.
१९७०: बोईंग संगणक सेवेची स्थापना करण्यात आली.
१८९५: फोर्मोसाच्या प्रजासत्ताक ची स्थापना.
१९२६: युक्रेनच्या परागंदा सरकारच्या अध्यक्ष सिमोन पेटलियुराची हत्या.
१९३५: जेसी ओवेन्सने ४५ मिनिटात वेगवेकळ्या शर्यतींमध्ये चार विश्वविक्रम नोंदवले.
१९३८: स्पॅनिश गृहयुद्ध – अलिकान्ते शहरावर बॉम्बफेक. ३१३ ठार.
१९४०: दुसरे महायुद्ध – डंकर्कची लढाई सुरू.
१९४६: अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी.
१९५३: अमेरिकेच्या सैन्याने परमाणुशस्त्रे असलेल्या तोफगोळ्यांची चाचणी केली.
१९५५: जगातील उंचीनुसार तिसरे शिखर कांचनगंगा जॉर्ज बॅंड आणि जो ब्राऊन यांनी प्रथमच सर केले.
१९६१: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीने “दशक संपायच्या आत चंद्रावर माणूस” पाठवण्याची घोषणा केली.
१९६३: इथियोपियाची राजधानी अदिस अबाबामध्ये आफ्रिकन एकता संघटनेची स्थापना.
१९७७: चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी उठवली. सुमारे १० वर्षे ही बंदी अमलात होती.
१९७९: अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १९१ हे डी.सी.१० जातीचे विमान शिकागोच्या ओहेर विमानतळावरून निघाल्यावर कोसळले. जमीनीवरील दोघांसह २७३ ठार.
१९८१: सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अखाती सहकार समितीची स्थापना.
१९८२: फॉकलंड युद्ध – आर्जेन्टिनाने युनायटेड किंग्डमची युद्धनौका एच.एम.एस. कोव्हेन्ट्री बुडवली.
१९८५: बांगलादेशमध्ये वादळ. १०,०००हून अधिक ठार.
१९९२: विख्यात बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना १९९१ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
१९९५: बॉस्नियाच्या सर्ब सैन्याने ७२ तरुणांना ठार मारले.
१९९७: सियेरा लिओनमध्ये उठाव. मेजर जॉन पॉली कोरोमाहने सत्ता बळकावली.
१९९९: सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणार्या लाखो वारकर्यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.
२००१: कॉलोराडोतील बोल्डर शहराचा एरिक वाइहेनमायर हा एव्हरेस्ट सर करणारा प्रथम अंध व्यक्ती ठरला. त्याच्या बरोबरचा न्यू कनान, कॉनेटिकटचा शेरमान बुल सगळ्यात वयस्कर व्यक्ती (६४ वर्षे) ठरला.
२००२: चायना एरलाइन्स फ्लाइट ६११ हे बोईंग ७४७ जातीचे विमान तैवानच्या सामुद्रधुनीत कोसळले. २२५ ठार.
२००२: मोझाम्बिकच्या तेंगा शहराजवळ रेल्वे गाडीला अपघात १९७ ठार.
२००३: नेस्टर कर्चनर आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
२००३: चिली देशाने पहिल्यांदा टेनिसचा विश्वकप जिंकला.
२०११: द ओपराह विन्फ्रे शो चा शेवट करण्यात आला. ओपराह विन्फ्रे यांनी हा शो पंचवीस वर्ष चालवला होता.
२०१२: स्पेसएक्स ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांसह यशस्वीरित्या एकत्र येणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले.
२०१३: जपानच्या 80० वर्षीय युशिरो मिड्रा नामक गिर्यारोहक व्यक्तीने जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट चढण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१०४८: शेन्झॉँग, चीनी सम्राट.
१३३४: सुको, जपानी सम्राट.
१४५८: महमुद बेगडा, गुजरातचा सुलतान.
१७१३: जॉन स्टुअर्ट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
१८०३: राल्फ वाल्डो एमर्सन, अमेरिकन लेखक व तत्त्वज्ञानी.
१८३१: ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ सर जॉन इलियट यांचा जन्म. (मृत्यू: १८ मार्च १९०८ – व्हार, फ्रान्स)
१८७८: ब्रिटीश कालीन भारतातील थोर राष्ट्रवादी लेखक, पत्रकार, संपादक आणि राजकीय कार्यकर्ते रामकृष्ण पिल्लई यांचा जन्मदिन.
१८८६: क्रांतिकारक रास बिहारी घोष यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९४५)
१८९५: इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६३)
१८९९: स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, बंगाली कवी काझी नझरुल इस्लाम यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९७६)
१९०७: उ नु, म्यानमारचा राजकारणी.
१९२६: गुजराती साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय कादंबरीकार, नाटककार आणि अनुवादक धीरुबेन गोरधनभाई पटेल यांचा जन्मदिन.
१९२७: अमेरिकन लेखक रॉबर्ट लुडलुम यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च २००१)
१९३३: त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे माजी पंतप्रधान बासदेव पांडे यांचा जन्मदिन.
१९३६: रुसी सुरती, भारतीय क्रिकेटपटू.
१९४६: सेवानिवृत्त भारतीय क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचा जन्मदिन.
१९५४: रतीय अभिनेता, निर्माता आणि राजकारणी मुरली यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑगस्ट २००९)
१९७०: मॉरिस क्रॉफ्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९७२: भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक करण जोहर यांचा जन्म.
१९७४: विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रांतील शांती स्वरूप भटनागर पुरस्कार तसचं, इन्फोसिस पुरस्कार सन्मानित प्रख्यात शिकागो विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाच्या प्राध्यापक मुळ भारतीय वंशीय यमुना कृष्णन यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
९६७: मुराकामी, जपानी सम्राट.
१०८५: पोप ग्रेगोरी सातवा.
१२६१: पोप अलेक्झांडर चौथा.
१५५५: हेन्री दुसरा, नव्हारेचा राजा.
१९२४: आशुतोष मुखर्जी, बंगाली शिक्षणतज्ञ.
१९५४: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, कन्या आरोग्य मंदिरा चे संस्थापक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १८७८)
१९७४: स्वतंत्र संयुक्त ओडिशा राज्याचे आर्किटेक्ट(रचनाकार) महाराजा सर कृष्णचंद्र गजपती नारायण देव यांचे निधन.
१९९८: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९३७)
१९९९: डॉ. बी. डी. टिळक, संचालक – पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा.
२००१: नीला घाणेकर, गायिका.
२००५: सुनील दत्त, भारतीय अभिनेता.
२०१२: प्रसिद्ध भारतीय निबंधकार व कवी भागवत रावत यांचे निधन.
२०१३: भारतीय राजकारणी महेंद्र कर्मा यांचे निधन. ( जन्म: ५ ऑगस्ट १९५०)