Allergy
Allergy

ऍलर्जी (Allergy)

एखाद्या पदार्थाला एखादा व्यक्ती जास्त प्रमाणात संवेदनक्षम असणे म्हणजे एलर्जी होय. जेव्हा एखादा घातक नसलेला पदार्थ शरीरात गेल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा त्याला अनावश्यकरीत्या प्रतिक्रिया करीत असते, त्यालाच ऍलर्जी असे म्हणतात.

कोणताही अन्नपदार्थ, कपडे धूळ, परागकण, थंडी, उष्णता इत्यांदीची ऍलर्जी असू शकते.

उदा: दमा (Asthma), इसब (Eczema), हे फिव्हर (Hay Fever)

1) गुणसूत्री विकार (Chromosomal Disorders):- डाऊन संलक्षण, टर्नर सिंड्रोम, क्लाईनफेल्टर्स सिंड्रोमआनुवंशिक /जनुकीय रोग (Genetic Disorders)

2) एकोध्द्यवी विकार (Monogenic Disorders): सिकल सेल ऍनिमिया, अल्बिनिझम/ वर्णकहीनता

1) गुणसूत्री विकार (Chromosomal Disorders):- डाऊन संलक्षण, टर्नर सिंड्रोम, क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम

मानवामध्ये आतापर्यंत जवळपास 7000 हार गुणसूत्री विकारांचा शोध लागला आहे. गुणसूत्री विकारांमध्ये गुणसूत्रांची संख्या कमी किंवा जास्त होते. तसेच काही व्यक्तींमध्ये गुणसूत्रांचा ऱ्हास होतो.

1. डाऊन संलक्षण (Down’s Syndrome):

 • या रोगाचा शोध डॉ लॅग्डन डाउन यांनी लावला म्हणून यास डाउन संलक्षण असे म्हणतात.
 • हा मानवातील पहिला गुणसूत्री विकार आहे. यामध्ये पेशीतील गुणसूत्रांची संख्या वाढते.
 • या रोगामध्ये पेशीतील गुणसूत्राच्या 21 व्या जोडीला 1 जास्तीचे गुणसूत्र जोडलेले असते. त्यामुळे शरीरातील गुणसूत्रांची संख्या 46 च्या ऐवजी 47 असते. म्हणून यास एकाधिक द्विगूणिता -21 (Trisomy-21) असेही म्हटले जाते.

लक्षणे:

 1. मानसिक तसेच शारीरिक वाढ खुंटणे
 2. पापण्या नेहरी उघड्या असतात.
 3. उंची कमी आणि मान पसरट असते.
 4. चेहरा गोलाकार आणि डोके लहान असते. अशी बालके मंगोलियातील बालकांसारखी दिसतात. म्हणून या रोगाला मंगोलिता (Mangolism) असे म्हणतात.
 5. दात ओबड-धोबड तसेच तोंड नेहमी उघडे असते.
 6. नाकपुडया मोठया, केसांचे प्रमाण कमी असून ताठ असतात.
 7. या बालकांमध्ये प्रजनन क्षमता नसून सरासरी आयुष्यमान 16-20 वर्षे असतात.

     2. लिंगगुणसूत्रांशी संबंधित विकार  (टर्नर सिंड्रोम – Turner’s Syndrome) : 

 1. या विकारामध्ये दोन लिंग गुणसूत्रांपैकी (X & Y) केवळ एकच ‘X’ हे गुणसूत्र अस्तित्वात असते.
 2. हि गुणसूत्र रचना ‘XO’ अशी दर्शविली जाते. म्हणजेच या विकारात केवळ 45 गुणसूत्रे असतात.

लक्षणे: कमी उंची, पसरट मान, कमी केस, दुय्यम लैंगिंक वैशिष्ट्यांचा विकास होत नाही.

     3. लिंगगुणसूत्रांशी संबंधित विकार  (क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम – urner’s Syndrome) : 

या विकारामध्ये एक लिंग गुणसूत्र जास्त असते. त्यात एका ‘X’ गुणसूत्राऐवजी दोन ‘X’ गुणसूत्रे असतात.

ही गुणसूत्ररचना 44+ ‘XXY’ अशी दर्शविली जाते. म्हणजेच या विकारात एकूण 47 गुणसूत्रे असतात. अशा व्यक्तींना स्त्रियांचे गुणधर्म ‘Feminised Males’ असलेले पुरुष असा केला जातो.

लक्षणे: या व्यक्ती उंच सडपातळ त्यांच्या दुय्यम लैंगिक वैशिष्ट्यांचा विकास झालेला नसतो. त्यांची बुद्धिमत्ता मात्र सामान्य असते.

एकोध्द्यवी विकार (Monogenic Disorders): सिकल सेल ऍनिमिया, अल्बिनिझम/ वर्णकहीनता

उदा: हचिन्सन्स रोग, सिकल सेल ऍनिमिया, अल्बिनिझम, फिनाईलकीटोनुरिय, हिमोफिलिया, पुटी तंतुभवन (Cystic Fibrosis) इत्यादीएकोध्द्यवी विकार: या विकारामध्ये एकाच जीनच्या उत्परिवर्तनाचा (Genetic Mutation) अंतर्भाव असतो.

१) सिकल सेल ऍनिमिया (Sickle Cell Anaemia):

 • यास दात्र पेशी पांडूरोग असेही म्हणतात. हिमोग्लोबिन हे तांबड्या रक्तपेशींमधील प्रथिन आहे. जर ६ व्या अमायनो आम्लाची (ग्लुटामिक आम्लाची) जागा व्हॅलिन (Valin) ने घेतली तर हिमोग्लोबिनच्या कार्यात अडथळा निर्माण होतो.
 • त्यामुळे तांबडया रक्तपेशींचा आकार विळ्यासारखा होतो. म्हणून या विकारास सिकल सेल ऍनिमिया म्हणतात.
 • या रोगामध्ये हिमोग्लोबिनची रक्त वाहून नेण्याची क्षमता कमी होते. अनेकदा तांबडया रक्तपेशींच्या गुठळ्या होतात व त्या नाश पावता. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन रक्तभिसरण संस्था, मेंदू, फुप्फुसे, किडनी यांचा धोका पोहोचतो.  ही  स्थिती अनुवांशिक असते. ही विकार मुख्यतः आफ्रिकन लोकांमध्ये दिसून येतो.

२) अल्बिनिझम/ वर्णकहीनता (Albinism):

 • हा एक जनुकीय आजार आहे.
 • या रोगामध्ये शरीर मेलॅनिन हे वर्णक (Pigment) तयार करू शकत नाही.
 • त्यामुळे त्वचा निस्तेज आणि केस पांढरे दिसतात.
 • दृष्टिपटलात वर्णक नसल्याने डोळे सामान्यतः गुलाबी असतात.

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *