Non Communicable Or Non Infectious Diseases
Non Communicable Or Non Infectious Diseases

असंसर्गजन्य रोग  (Non Communicable Or Non Infectious Diseases):

व्याख्या:  जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग (Non Infectious Disease) म्हणतात. असे रोग काही विशिष्ट कारणामुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात.

यामध्ये पुढील रोगांचा समावेश होतो.

अ. हृदय आणि रक्ताभिसरणाचे रोग :

1) उच्च रक्तदाब /उच्चताण (Hypertension):

 • व्यक्तीचे वय, आनुवंशिक कारणे, अतिलठ्ठपणा, क्षारांचे/ मिठाचे सेवन (५ग्रॅम/ दिन पेक्षा जास्त), संतुप्त मेद, मद्य, मधुमेह, वृकरोग यांसारख्या कारणांमुळे निर्माण होणाऱ्या स्थितीस उच्चताण म्हणतात. अशा स्थितीचे लक्षण म्हणजे रक्तदाबाची वाढलेली पातळी होय.
 • जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) व्याख्येनुसार १६०/९५ mm of Hg एवढा किंवा जास्त रक्तदाब म्हणजे उच्चंरक्तदाब होय. यांवरून प्रौढांमधील उच्चताण म्हणजे 160 mm of Hg एवढा किंवा जास्त प्रकुंचनी रक्तदाब (Systolic pressure) आणि /किंवा 95 mm of Hg एवढा किंवा जास्त हृदप्रसरणी रक्तदाब (diastolic pressure) होय. यालाच आपण High B.P. असे म्हणतो.

२) कमी रक्तदाब (Hypotension):

100/60 mm of Hg  पेक्षा कमी रक्तदाब म्हणजे कमी रक्तदाब होय. यालाच आपण Low B.P. असे म्हणतो.

३) हृदयविकार झटका/ परिहृद रोग (Heart Attack/Coronary Thrombosis):

 • हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची शरीराच्या सर्व भागांना रक्त पुरविण्याची कार्यक्षमता कमी होते. त्यासाठी हृदयास जास्त कार्य करावे लागल्याने हृदयास झटका येतो.
 • त्याचे निदान ECG (Electrocardiograph) च्या साहाय्याने केली जाते.
 • तसेच रक्तात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास ते रक्तवाहिन्यांच्या आतील बाजूंना साचून राहते. त्यामुळे रक्ताच्या प्रवाहास अडथळा झाल्याने हृदयास शरीरभर रक्ताभिसरणासाठी जास्त कार्य करावे लागते. त्यामुळे सुद्धा हृदयास झटका येऊ शकतो.
 • धूम्रपान, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलचे वाढते प्रमाण, मधुमेह, अतिलठ्ठपणा, बैठ्या कामाच्या सवयी यांसारखी कारणे त्यासाठी कारणीभूत ठरतात.

ब) सांगाडा व स्नायूंचे रोग :

१) सांधे दुखी (Arthritis) :

 • सांध्यांमध्ये वेदना
 • गुडघे, बोटाचे शेवटे सांधे, खांदे इत्यांदींमध्ये वेदना होते. मात्र, मनघट, कोपर, बोटांचे इतर सांधे इत्यांदीमध्ये वेदना होत नाही.

२) संधीवात (Rheumatism) :

 • सांध्यांचा दाह
 • बोटाचे मधले सांधे, हाताचे सांधे, मनगट, गुडघे, कोपर इत्यादींचा दाह

३) संधीरोग/ वातरक्ताचा रोग (Gout) :

 • रक्तात युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यास ते सांध्यांमध्ये जाऊन साचते. त्यामुळे  सांधे सुजतात व खूप वेदना

क) मधुमेह/ डायबेटिस (Diabetes Mellitus)

हा रोग कर्बोदकांच्या अनियमित चयापचयामुळे तसेच स्वादुपिंडाच्या अयोग्य कार्यामुळे निर्माण होतो.

१) कर्बोदकांच्या चयापचयामध्ये तयार झालेली साखर शरीरांच्या पेशींमध्ये योग्य प्रमाणात शोषली न गेल्यास तिचे रक्तातच प्रमाण वाढते.

२) रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य स्वादुपिंडातून स्रवणाऱ्या इन्सुलिनमार्फत केले जात असते. हे इन्सुलिन स्वादुपिंडातील islets of Langerhans नावाच्या ग्रंथीपैकी बीटा पेशींमधून स्त्रवत असते. या ग्रंथींच्या कार्यात बिघाड झाल्यास इन्सुलिन योग्य प्रमाणात तयार होत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

इन्सुलिनची कमतरता किंवा इन्सुलिनच्या क्रियेतील दोष निर्माण होण्याची विविध कारणे आहेत.

१) स्वादुपिंडाचे विकार, जसे इंफ्लेमेशं व सिस्टिक फायब्रासिस,

२) जैविकदृष्टया कमी परिणामकारक इन्सुलिनची निर्मिती

३) बीट पेशींचा नाश

४) आनुवंशिक दोष, जसे इन्सुलिन जनुकांचे उत्परिवर्तन इत्यादी

लक्षणे – 

3Ps म्हणजे पॉलियुरिया (Polyuria : बहुमूत्रता), पॉलिडिप्सिया (Polydipsia: खूप तहान लागणे) आणि पॉलिफेजिया (Polyphagia: वजन खूप कमी होणे)

तसेच जखमा लवकर न भरणे, अतिशय थकवा येणे, अचानक वजन कमी होणे, दृष्टी अंधुक होणे आणि वेसावधपणा अशी लक्षणे मधुमेहात जाणवतात.

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *