मजरुह सुलतानपुरी
मजरुह सुलतानपुरी

हे पृष्ठ 24 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 24th May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • राष्ट्रकुल दिन
  • जागतिक स्किझोफ्रेनिया जागरूकता दिन

महत्त्वाच्या घटना:

१६२६: पीटर मिन्युईटने स्थानिक लोकांकडून मॅनहटन बेट २४ डॉलरला विकत घेतले.

१८४४: तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत: विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.

१८८३: न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.

१९७६: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या काँकॉर्ड विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू झाली.

१९९१: एरिट्रियाला (इथिओपियाकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९९४: २६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार्‍या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

२०००: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला ’इन्सॅट-३बी’ हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६८६: डॅनियल फॅरनहाइट – जर्मन शास्त्रज्ञ (मृत्यू: १६ सप्टेंबर १७३६)

१८१९: व्हिक्टोरिया – इंग्लंडची राणी (मृत्यू: २२ जानेवारी १९०१)

१८४९: सुप्रसिध्द डॉ. शास्त्रज्ञ ले. खर्नल कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांचा जन्म.

१९२४: रघुवीर भोपळे ऊर्फ ’जादूगार रघुवीर’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार. त्यांनी ‘फिरता जादूगार‘ व ‘मी पाहिलेला रशिया‘ ही पुस्तके लिहिली आहेत. (मृत्यू: २० ऑगस्ट १९८४)

माधव गाडगीळ
माधव गाडगीळ

१९३३: हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक (मृत्यू: १९ डिसेंबर १९९९)

१९४२: माधव गाडगीळ – पर्यावरणतज्ञ

१९५५: राजेश रोशन – संगीतकार

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

के. ऎस. हेगडे
के. ऎस. हेगडे

१५४३: निकोलस कोपर्निकस – सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ (जन्म: १९ फेब्रुवारी १४७३)

निकोलस कोपर्निकस
निकोलस कोपर्निकस

१९९०: लोकसभेचे माजी अध्यक्ष के. ऎस. हेगडे यांचा मृत्यू.

१९९२: ज्येष्ठ पत्रकार दि.र आ. भहगवत यांचे निधन.

१९९३: बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी. रानी – जुन्या पिढीतील संगीतकार व गायक (जन्म: ६ मे १९२० – हैदराबाद)

१९९५: हॅरॉल्ड विल्सन – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म: ११ मार्च १९१६)

१९९९: विजयपाल लालाराम तथा ’गुरू हनुमान’ – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक (जन्म: १५ मार्च १९०१)

२०००: मजरुह सुलतानपुरी – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९९३) शायर, गीतकार आणि कवी (जन्म: १ आक्टोबर १९१९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *