dinvishesh-mpsc-5-may
dinvishesh-mpsc-5-may

हे पृष्ठ 5 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 5th May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • भारतीय आगमन दिन : गुयाना, १८३८ पासून.
  • आंतरराष्ट्रीय सुईण दिन.
  • मुक्ति दिन : डेन्मार्क, नेदरलँड्स, इथियोपिया.
  • बाल दिन : जपान, दक्षिण कोरिया.
  • सिंको दे मायो : मेक्सिको, अमेरिका.
  • शहीद दिन : आल्बेनिया.

महत्त्वाच्या घटना:

१८९३ : न्यूयॉर्क शेरबाजाराचा निर्देशांक कोसळला. देशभर मंदीस सुरुवात.

१९०१ : विष्णू दिगंबर पलुस्करबुवा यांनी लाहोर येथे गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.

१९४४ : महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका.

१९९९ : दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.

१९९७ : जयदीप आमरे या साडेपाच वर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.

१९५५ : पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्त्व प्राप्त झाले.

१९३६ : इटालियन सैन्याने इथिओपियातील आदिसअबाबा शहराचा ताबा घेतला.

१९०१ : पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.

१२६० : कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८१८ : कार्ल मार्क्स, जर्मन तत्त्वज्ञानी.

१९१६ : ज्ञानी झैलसिंग, भारतीय राष्ट्रपती.

१९१६ : ग्यानी झैलसिंग – भारताचे ७ वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री (मृत्यू: २५ डिसेंबर १९९४)

१८१८ : कार्ल मार्क्स – जर्मन तत्त्वज्ञ व कम्युनिझमचे प्रणेते (मृत्यू: १४ मार्च १८८३)

१४७९ : गुरू अमर दास – शिखांचे तिसरे गुरू (मृत्यू: १ सप्टेंबर १५७४)

८६७ : उडा – जपानी सम्राट (मृत्यू: १९ जुलै ९३१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८२१ : नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.

१९१८ : त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ ‘बालकवी’, मराठीतील प्रसिध्द कवी.

२००६ : नौशाद अली – संगीतकार (जन्म: २५ डिसेंबर १९१९)

२००० : वि. मा. कुलकर्णी – मुलांच्या समस्यांचे अभ्यासक व समाजशास्त्रज्ञ (जन्म: ? ? ????)

१९८९ : नवल होर्मुसजी टाटा – उद्योगपती, पद्मभूषण [१९६९] (जन्म: ३० ऑगस्ट १९०४ – मुंबई)

१९४३ : रामकृष्णबुवा वझे – गायक नट, बलवंत संगीत मंडळी आणि ललित कलादर्श या नाटक कंपन्यांमधे त्यांनी गायनगुरु म्हणून काम केले. केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ, भालचंद्र पेंढारकर, हरिभाऊ घांग्रेकर हे त्यांचे काही नामांकित विद्यार्थी होत. (जन्म: २८ नोव्हेंबर १८७२)

१९१८ : त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ ’बालकवी’ यांना जळगावजवळील भादली स्टेशनपाशी रेल्वेचे रूळ ओलांडताना आगगाडीखाली सापडून मरण आले. (जन्म: १३ ऑगस्ट १८९०)

१८२१ : फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट याचे सेंट हेलेना बेटावर निधन (जन्म: १५ ऑगस्ट १७६९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *