dinvishesh-mpsc-4-may
dinvishesh-mpsc-4-may

हे पृष्ठ 4 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 4th May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • कोळसा कामगार दिन
  • जागतिक अस्थमा दिन.
  • स्मृती दिन : नेदरलँड्स.
  • युवा दिन : चीन.
  • स्वातंत्र्य दिन : लात्व्हिया.

महत्त्वाच्या घटना:

१७९९: श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.

१८५४: भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.

१९०४: अमेरिकेने पनामा कालव्याचे काम सुरू केले.

१९३०: ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले.

१९८९: सर्व पंचायत समित्यांमधे महिलांसाठी ३० टक्‍के जागा राखीव ठेवल्या जातील, अशी पंतप्रधान राजीव गांधी यांनी घोषणा केली.

१९९२: संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

१९९५: ‘बॉम्बे’ ऎवजी ‘मुंबई’ हेच मूळ नाव अधिकृत राहील, असा शिवसेना-भाजप युती यांच्या राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.

१९९५: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने ’बॉम्बे’ चे ’मुंबई’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.

१९९६: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला सहा पदके, एन. कुंजुरानीदेवीला दोन रौप्यपदके

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

श्रीनृसिंह जयंती

१००८: ख्वाजा अब्दूल्ला अन्सारी – पर्शियन सूफी संत (मृत्यू: ?? १०८८)

१००८: हेन्‍री (पहिला) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ४ ऑगस्ट १०६०)

१६४९: छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचा महाराजा (मृत्यू: २० डिसेंबर १७३१)

१७६७: त्यागराज – दाक्षिणात्य संगीतकार (मृत्यू: ६ जानेवारी १८४७)

१८२५: थॉमस हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक आणि डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा खरा समर्थक (मृत्यू: २९ जून १८९५ – इस्ट्बोर्न, इंग्लंड)

१८४७: महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन – धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्‍नेही (मृत्यू: २ फेब्रुवारी १९१७)

१८४९: ज्योतिरिंद्रनाथ टागोर – थोर बंगाली साहित्यिक, नाटककार, संगीतकार, चित्रकार व संपादक, रविंद्रनाथ टागोर यांचे वडील बंधू, त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचे बंगालीत भाषांतर केले (मृत्यू: ४ मार्च १९२५ – रांची, झारखंड)

१९२८: होस्‍नी मुबारक – इजिप्तचे चौथे राष्ट्राध्यक्ष

१९२९: ऑड्रे हेपबर्न – ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी, ’रोमन हॉलिडे’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. (मृत्यू: २० जानेवारी१९९३)

१९२९: वीरसेन आनंदराव तथा ’बाबा’ कदम – गुप्तहेरकथालेखक (मृत्यू: २० आक्टोबर २००९)

११३४: महात्मा बसवेश्वर.

१९३४: अरुण दाते – भावगीत गायक

१९४०: रॉबिन कूक – इंग्लिश कादंबरीकार

१९४२: सत्यनारायण गंगाराम तथा सॅम पित्रोडा – भारतातील दूरसंचारसेवांचा विस्तार करण्यास कारणीभूत असलेले शास्त्रज्ञ, पंतप्रधानांचे विज्ञान व तंत्रज्ञानविषयक सल्लागार

१९४५: एन. राम – ज्येष्ठ पत्रकार

१९८४: मंजुरूल इस्लाम – बांगला देशचा क्रिकेटपटू (मृत्यू: १६ मार्च २००७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७९९: टिपू सुलतान, म्हैसुरचा वाघ म्हणून ओळखला जाणारा पराक्रमी श्रीरंगपट्टणम येथे इंग्रजांशी लढताना मारला गेला.

१७९९: हैदरअलीचा थोरला मुलगा व मैसूरचा वाघ, शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान इंग्रजांबरोबर झालेल्या लढाईत ठार झाला. (जन्म: २० नोव्हेंबर १७५०)

१९८०: अनंत काणेकर – चतुरस्त्र साहित्यिक, कवी व पत्रकार, ’पद्मश्री’ व ’सोविएत लँड नेहरू पुरस्कार’ विजेते. मुंबईतील ’नाट्यमन्वंतर’ या प्रयोगशील नाट्यसंस्थेचे ते एक संस्थापक होते. (जन्म: २ डिसेंबर १९०५)

१९८०: जोसेफ टिटो – क्रांतिकारक आणि युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: ७ मे १८९२)

२००८: किशन महाराज – तबलावादक (जन्म: ३ सप्टेंबर १९२३)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *