आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार
आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार

हे पृष्ठ 4 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ४ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 4 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

कोरेझॉन अ‍ॅक्‍विनो
कोरेझॉन अ‍ॅक्‍विनो

२००१ : मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्‍यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.

१९९८ : फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा कोरेझॉन अ‍ॅक्‍विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर

१९९३ : राजेन्द्र खंडेलवाल या पुण्याच्या अपंग परंतु जिद्दी साहसवीराने समुद्रसपाटीपासून १८,३८३ फुटांवर असलेली ‘खारदुंग ला‘ ही खिंड आपल्या चार सहकार्‍यांसह स्कुटरवरुन (कायनेटिक होंडा) पार केली. त्याच्या या कामगिरीची ’गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ मधे नोंद झाली.

१९८४ : ‘अपर व्होल्टा’ या देशाचे नाव बदलुन ’बुर्किना फासो’ असे करण्यात आले.

१९५६ : भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ’अप्सरा’ ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.

१९४७ : जपानच्या सर्वोच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

१९२४ : सोविएत युनियन व मेक्सिकोमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९१४ : पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

नारायण सीताराम तथा ना. सी. फडके
नारायण सीताराम तथा ना. सी. फडके

१९६१ : बराक ओबामा – अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते

१९३१ : नरेन ताम्हाणे – यष्टीरक्षक आणि फलंदाज (मृत्यू: १९ मार्च २००२)

१९२९ : आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक, त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली. ‘चलती का नाम गाडी‘ सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच ’दूर गगन की छाँव में’ सारखे गंभीर चित्रपटही काढले. (मृत्यू: १३ आक्टोबर १९८७)

सर फिरोजशहा मेहता – कायदेपंडित
सर फिरोजशहा मेहता – कायदेपंडित

१८९४ : नारायण सीताराम तथा ना. सी. फडके – साहित्यिक व वक्ते (मृत्यू: २२ आक्टोबर १९७८)

१८६३ : महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर – पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान (मृत्यू: ? ? ????)

१८४५ : सर फिरोजशहा मेहता – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक. १९१३ मधे ’बॉम्बे क्रॉनिकल’ हे इंग्रजी भाषेतील पहिले राष्ट्रीय बाण्याचे वृत्तपत्र त्यांनी मुंबईत सुरू केले. (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९१५)

१८३४ : जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ (मृत्यू: ४ एप्रिल १९२३)

१७३० : सदाशिवराव भाऊ – पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९७ : जीन काल्मेंट – १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८७५)

१९३७ : डॉ. काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १८८१)

१८७५ : हान्स अँडरसन – डॅनिश परिकथालेखक (जन्म: २ एप्रिल १८०५)

१०६० : हेन्‍री (पहिला) – फ्रान्सचा राजा (जन्म: ४ मे १००८)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.