३ ऑगस्ट दिनविशेष - 3 August in History
३ ऑगस्ट दिनविशेष - 3 August in History

हे पृष्ठ 3 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ३ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 3 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१४९२: इटालियन खलाशी ख्रिस्तोफर कोलंबस(Christopher Columbus) हे आपल्या तीन जहाजांसह स्पेनहून भारताच्या शोधात निघाले.

१७८३: जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.

१८११: जंगफ्राऊ शिखर – या बर्नीज आल्प्स पर्वतरांगेतील तिसरे सर्वोच्च शिखराची जोहान रुडॉल्फ आणि हायरोनिमस मेयर यांनी पहिली चढाई केली.

१९००: ’द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी’ ची स्थापना झाली.

१९१४: बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्तीझाली.

संगीतकार अनिल विश्वास
संगीतकार अनिल विश्वास

१९३६: आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा आयोजित करणार्‍या ’महाराष्ट्रीय कलोपासक’ या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले.

१९४६: सांताक्लॉज लँड, थीम पार्क – जगातील पहिले थीम पार्क सांताक्लॉज, इंडियाना, अमेरिका येथे उघडले.

१९४८: भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.

१९६०: नायजरला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९७७: TRS-८० कॉम्पुटर – टँडी कॉर्पोरेशन कपंनीने जगातील पहिल्या मोठ्या प्रमाणात विकलेल्या वैयक्तिक संगणकांची घोषणा केली.

१९८५: प्रसिद्ध भारतीय समाजसेवक व सक्रीय कार्यकर्ते बाबा आमटे यांना सार्वजनिक सेवेसाठी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१९९४: सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.

राज्यपाल महंमद फझल
राज्यपाल महंमद फझल

१९९४: संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

१९९७: स्काय टॉवर, ऑकलंड, न्यूझीलंड – या दक्षिण गोलार्धातील सर्वात उंच फ्री-स्टँडिंगइमारतीचे उदघाटन.

२०००: मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने ’नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स’ पुरस्काराने सन्मानित केले.

२००४: राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्‍घाटन झाले. १ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाची स्थापनाझाली होती.

२००४: अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपला मैसेंजर हा उपग्रह बुध ग्रहाकडे प्रक्षेपित केला.

क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक
क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८८६: मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. (मृत्यू: १२ डिसेंबर १९६४)

१८९८: उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार. त्यांनी पंजाब विद्यापीठातून’शास्त्री’ आणि कलकत्ता विद्यापीठातून ’काव्यतीर्थ’ या उपाध्या मिळवल्या. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६६)

शकील बदायूँनी
शकील बदायूँनी

१९००: क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (मृत्यू: ६ डिसेंबर १९७६)

१९१६: शकील बदायूँनी – गीतकार आणि शायर (मृत्यू: २० एप्रिल १९७० – मुंबई)

१९२४: लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (मृत्यू: २१ जून २००३)

१९३६: पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसचं, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या घराण्यातील शास्त्रीय ठुमरी गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचा जन्मदिन.

१९३७: फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेता स्पॅनिश टेनिसपटू आंद्रेस गिमेनो टोलागिरा(Andrés Gimeno Tolaguera) यांचा जन्मदिन.

१९३९: भारतीय क्रिकेटपटू अपूर्व सेनगुप्ता यांचा जन्म.

बलविंदरसिंग संधू
बलविंदरसिंग संधू

१९५६: बलविंदरसिंग संधू – १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू

१९६०: भारतीय क्रिकेटपटू गोपाल शर्मा यांचा जन्म.

१९८४: सुनील छेत्री – पद्मश्री व अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय व्यावसायिक फुटबॉलपटू व कर्णधार

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७९२: औद्योगिक क्रांतीच्या काळातील अग्रणी इंग्रज शोधक व उद्योजक रिचर्ड आर्कराईट (Richard Arkwright) यांचे निधन.

१९०८: पटना येथील खुदाबक्श ग्रंथालयाचे संस्थापक मौलवी खुदाबक़्श खान यांचे निधन.

१९२९: फोनोग्राफ चे शोधक एमिल बर्लिनर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५१)

सरोजिनी वैद्य – लेखिका
सरोजिनी वैद्य – लेखिका

१९३०: व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद (जन्म: १२ जानेवारी १८५४)

१९५७: देवदास गांधी – पत्रकार, ‘हिन्दुस्तान टाइम्स‘चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव (जन्म: २ आक्टोबर? १९०० – दरबान, दक्षिण अफ्रिका)

१९९३: स्वामी चिन्मयानंद सरस्वती – भारतीय हिंदू अध्यात्म नेते आणि अद्वैत वेदांत, भगवद्गीता, उपनिषद प्रसारक (जन्म: ८ मे १९१६)

१९९३: उत्तरप्रदेश मधील हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे सक्रीय सदस्य व क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल यांचे निकटवर्तीय प्रेम किशन खन्ना यांचे निधन.

२००७: सरोजिनी वैद्य – लेखिका (जन्म: १५ जून १९३३)

२०२०: जॉन ह्यूम – आयरिश राजकारणी – नोबेल पुरस्कार (जन्म: १८ जानेवारी १९३७)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *