१५ जून दिनविशेष - 15 June in History
१५ जून दिनविशेष - 15 June in History

हे पृष्ठ 15 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही 15 जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 15th June. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिवस / जागतिक वृद्धजन अवमान विरोध दिन
  • जागतिक वारा दिन: पवन ऊर्जा आणि त्याच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 जून रोजी जागतिक पवन दिवस साजरा केला जातो. वायू दिवस पाळण्याची सुरुवात 2007 पासून झाली. 2009 साली त्याचे नामकरण जागतिक पवन दिवस असे झाले. विंडयुरोप आणि जागतिक पवन ऊर्जा परिषदे (GWEC) द्वारा हा दिवस पाळला जातो.

महत्त्वाच्या घटना:

१६६७: वैद्यकीय इतिहासात प्रथम रक्तदान करण्यात आले. जॉं बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरने १५ वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले. त्या मुलाला काहीही अपाय झाला नाही, पण नंतर सर्वच माणसांना असले रक्तदान सोसत नाही हे स्पष्ट झाले.

१७६२: ऑस्ट्रिया देशांत कागदी नोटाचे चलन सुरु करण्यात आले.

चार्ल्स गुडइयर
चार्ल्स गुडइयर

१७७५: अमेरिकन क्रांती – जॉर्ज वॉशिंग्टनची खंडीय सेनेच्या नेतेपदी नेमणूक.

१८४४: चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.

१८६९: महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला. श्री. पांडूरंग विनायक करमरकर यांनी वेणुताईच्या गळयात माळ घातली.

१९०८: साला कलत्ता शेअर बाजाराची माहिती देण्यात आली

१९१९: कॅप्टन जॉन अलकॉक व लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातुन सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.

१९४७: अखिल भारीय कॉंग्रेस दिल्ली येथे भारताचे विभाजन करण्यासाठी ब्रिटीश योजनेचा स्वीकार केला.

१९७०: बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.

१९९३: संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ’अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्त करण्यात आली.

ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यमने
ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यमने

१९९४: इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

१९९७: अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी होऊन आरोप चुकवत असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्‍च न्यायालयाने दिला.

२००१: प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळ पटू ग्रँडमास्टरविजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम यांनी नॅशनल ‘ए’ विस्डम स्पर्धा सलग पाचव्यांदा जिंकून विश्वविक्रम रचला.

२००२: नियर अर्थ ऍस्टेरॉइड २००२ एम.एन. पृथ्वीपासून फक्त १,२०,००० कि.मी. (७५,००० मैल) दूरून गेला.

२००८: ’लेहमन ब्रदर्स’ या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८७८: भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १९५५)

१८८४: स्वातंत्रपूर्व भारतातील ब्रिटीशविरोधी बंगाली भारतीय क्रांतिकारक आणि आंतरराष्ट्रीयतावादी विद्वान तारकनाथ दास यांचा जन्मदिन.

१८९८: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८६)

१८९९: भारतीय सैन्य दलाचे माजी सैन्य प्रमुख जनरल महाराज श्री राजेंद्रसिंह जडेजा यांचा जन्मदिन.

१८९९: साल पद्मभूषण पुरस्कार प्रसिद्ध भारतीय चित्रकार, शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष देवी प्रसाद राय चौधरी वाढदिवस.

किसन बाबूराव तथा ‘अण्णा‘ हजारे
किसन बाबूराव तथा ‘अण्णा‘ हजारे

१९०७: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे यांचा जन्म. (मृत्यू: १ मे १९९३)

१९१२: प्रसिद्ध उत्तर भारतीय साहित्यकार श्रीमन्नारायण अग्रवाल यांचा जन्मदिन.

१९१७: संगीतकार मेंडोलीनवादक सज्जाद हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९९५ – माहीम, मुंबई)

१९२३: साहित्यिक केशवजगन्नाथ पुरोहित ऊर्फ शांताराम यांचा जन्म.

१९२७: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक इब्न-ए-इनशा यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९७८)

सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या’ – गायिका व अभिनेत्री
सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या’ – गायिका व अभिनेत्री

१९२८: प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, समिक्षक, शिक्षक. ललित लेखक, उत्तम वक्ता व सूत्रसंचालक साहित्यकार शंकर वैद्य यांचा जन्मदिन.

१९२९: गायिका व अभिनेत्री सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)

१९३२: झिया फरिदुद्दीन डागर – धृपद गायक (मृत्यू: ८ मे २०१३)

१९३३: महाराष्ट्रीयन मराठी लेखिका, समिक्षक, ललितलेखन, चरित्रलेखन, समीक्षा साहित्याच्या साहित्यकार तसचं, महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या माजी संचालक सरोजिनी वैद्य यांचा जन्मदिन. (मृत्यू: ३ ऑगस्ट २००७)

१९३४: भारतीय राजकारणी व राज्यसभेचे सदस्य देवदास आपटे यांचा जन्मदिन.

१९३७: किसन बाबूराव तथा ‘अण्णा‘ हजारे – आदर्श ग्रामपरिवर्तन करुन देशाला व जगालाही समाजपरिवर्तनाची नवी दिशा दाखवणारे समाजवेवक

प्रेमानंद गज्वी
प्रेमानंद गज्वी

१९४३: माजी भारतीय क्रिकेटपटू तपन बॅनर्जी यांचा जन्मदिन.

१९४७: प्रेमानंद गज्वी – साहित्यिक व नाटककार. ‘किरवंत’ हे प्रसिद्ध नाटक, ११ एकांकिका, १३ नाटके, २ लघुकथासंग्रह, १ कादंबरी, १ कवितासंग्रह अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘घोटभर पाणी’ (1977) या त्यांच्या एकांकिकेचे ३००० हुन अधिक प्रयोग झाले आहेत. २००३ मध्ये त्यांनी ‘बोधी नाट्य परिषदेची’ स्थापना केली.

१९५०: भारतीय स्टील उद्योग सम्राट व जगातील सर्वात मोठ्या स्टीलमेकिंग कंपनी आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

वेंडेल मेरेडिथ स्टॅनले
वेंडेल मेरेडिथ स्टॅनले

१५३४: योगी चैतन्य महाप्रभू (जन्म: १८ फेब्रुवारी १४८६)

१८७८: भारतातील ‘राधा स्वामी सत्संग’ पंताचे संस्थापक शिव द्याल साहब यांचे निधन.

१९३१: अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे निधन.

१९७१: वेंडेल मेरेडिथ स्टॅनले, अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता (जन्म: १ ऑगस्ट १८७९)

१९७९: सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार (जन्म: २ एप्रिल १९२६)

निर्मलादेवी – पतियाळा घराण्याच्या ठुमरी व दादरा गायिका आणि चित्रपट अभिनेत्री.
निर्मलादेवी – पतियाळा घराण्याच्या ठुमरी व दादरा गायिका आणि चित्रपट अभिनेत्री.

१९८३: श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार (जन्म: ३० एप्रिल १९१०)

१९९६: निर्मलादेवी – पतियाळा घराण्याच्या ठुमरी व दादरा गायिका आणि चित्रपट अभिनेत्री. बॉम्बे सिनेटोन या कंपनीतून त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीस सुरुवात केली. सवेरा (१९४२), कानून (१९४३), गाली (१९४४), चालीस करोड (१९४६), अनमोल रतन (१९५०), चक्रम (१९६८), सती अनसूया (१९७४) हे त्यांचे काही चित्रपट आहेत. सवेरा, कानून, शमा परवाना, बावर्ची, राम तेरी गंगा मैली इत्यादी चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायनही केले आहे. ९० च्या दशकातील सुपरस्टार गोविंदा हा त्यांचा मुलगा आहे. (जन्म: ७ जून १९२७)

२००६: प्रसिद्ध भारतीय गायिका व गीतकार तसचं, पंजाबी लोकगीत गायक, व हिंदी चित्रपट पार्श्वगायिका सुरिंदर कौर यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *