७ जून दिनविशेष- 7 June in History
७ जून दिनविशेष- 7 June in History

हे पृष्ठ 7 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 7th June. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

जागतिक अन्न सुरक्षा दिवस (World Food Safety Day): जागतिक अन्न सुरक्षा दिवस दरवर्षी 7 जून रोजी अन्नजन्य धोके टाळण्यासाठी, शोधणे आणि व्यवस्थापित करण्यासाठी आणि मानवी आरोग्य सुधारण्यासाठी लक्ष वेधण्यासाठी आणि कृती करण्यासाठी एकत्रितपणे साजरा केला जातो.

महत्त्वाच्या घटना:

१५३९: बक्सर च्या जवळ चौसा या ठिकाणी अफगाण शासक शेरशाह सुरी आणि मुघल शासक बादशाहा हुमायू यांच्यात झालेल्या लढाईत बादशाहा हुमायू यांचा पराभव झाला.

१८९३: महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.

महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली
महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली

१९३८: डी. सी. ४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.

१९६५: अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.

१९७५: क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्येे सुरुवात झाली.

१९७९: रशियातील कापुस्तिनयार येथून भास्कर-१ उपग्रहाचे प्रक्षेपण.

१९८१: इस्रायलने इराकची ओसिराक परमाणू भट्टी नष्ट केली.

१९८५: विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.

१९९१: फिलिपाइन्स मधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.

१९९३: महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.

१९९४:आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.

२००१: युनायटेड किंग्डम मधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.

२००४: शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.

२००६: अल कायदाचा इराकमधील म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी हा अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात ठार झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

महेश भूपती, भारतीय टेनिसपटू.
महेश भूपती, भारतीय टेनिसपटू.

१८३७: अलोइस हिटलर, एडॉल्फ हिटलरचे वडील. (मृत्यू: ३ जानेवारी १९०३)

१८३७: अलोइस हिटलर, एडॉल्फ हिटलरचे वडील.

१९१३: लेखक टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१०)

१९१४: दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १९८७)

१९१७: अमेरिकन गायक, संगीतकार निर्माते डीन मार्टिन यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९९५)

१९४२: लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर २०११)

१९४९: भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुरिंदरसिंग निज्जर यांचा जन्मदिन

१९५७: भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश व भारतीय सशस्त्र सैन्य न्यायाधिकरणाचे विद्यमान अध्यक्ष न्यायमूर्ती राजेंद्र मेनन यांचा जन्मदिन.

१९५९: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा जन्मदिन.

१९७४: महेश भूपती, भारतीय टेनिसपटू.

१९७५: पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट व टेलीव्हिजन मालिका निर्माता आणि दिग्दर्शिका एकता कपूर यांचा जन्मदिन.

रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड नॉरिश (चित्रित), ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड नॉरिश (चित्रित), ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.

१९८१: अमृता राव, मराठी चित्रपट अभिनेत्री.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८२१: रोमेनियाचे क्रांतिकारी ट्युडोर व्ह्लादिमिरेस्कु यांचे निधन.

१९५४: ब्रिटीश गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ ऍलन ट्युरिंग यांचे निधन. (जन्म: २३ जुन १९१२)

१९७०: ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८७९)

१९७८: रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड नॉरिश (चित्रित), ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.

बी. डी. जत्ती, भारतीय उपराष्ट्रपती.
बी. डी. जत्ती, भारतीय उपराष्ट्रपती.

१९९२: डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक.

१९९२: नासकार चे सहसंस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९०९)

१९९८: शशिकांत नार्वेकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष.

२०००: बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९०७)

२००२: बी. डी. जत्ती, भारतीय उपराष्ट्रपती.

२०२०: चिरंजीवी सर्जा (भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते, जन्म: १ ऑक्टोबर १९८४).

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *