देव आनंद
देव आनंद

हे पृष्ठ 26 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २६ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on  26 September. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

रंगनाथ मिश्रा
रंगनाथ मिश्रा

१९९० : रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९८४ : युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.

१९७३ : ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या ’काँकॉर्ड’ या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.

१९६० : फिडेल कॅस्ट्रोने यु. एस. एस. आर. ला पाठिंबा जाहीर केला.

१९५० : इंडोनेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

सेरेना विल्यम्स
सेरेना विल्यम्स

१९८१ : सेरेना विल्यम्स – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू

१९४३ : इयान चॅपेल – ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट कप्तान

१९३२ : डॉ. मनमोहन सिंग – भारताचे १३ वे पंतप्रधान, अर्थतज्ञ?

१९३१ : विजय मांजरेकर – क्रिकेटपटू (मृत्यू: १८ आक्टोबर १९८३)

१९२३ : देव आनंद – चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: ३ डिसेंबर २०११)

डॉ. मनमोहन सिंग
डॉ. मनमोहन सिंग

१८९४ : आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक (मृत्यू: १० डिसेंबर १९५५)

१८८८ : टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ४ जानेवारी १९६५)

१८५८ : मणिलाल नथुभाई त्रिवेदी – गुजराथी साहित्याच्या पंडितयुगातील एक अष्टपैलू लेखक, आर्यसंस्कृतीचे व शंकराचार्यप्रणित अद्वैत वेदांताचे कडवे पुरस्कर्ते (मृत्यू: १० आक्टोबर १८९८)

१८४९ : इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) रशियन शास्त्रज्ञ (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३६)

१८२० : इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक. यांच्या प्रयत्‍नांमुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला. (मृत्यू: २९ जुलै १८९१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

हेमंतकुमार
हेमंतकुमार

२००८ : पॉल न्यूमन – अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर (जन्म: २६ जानेवारी १९२५)

२००२ : राम फाटक – गायक व संगीतकार (जन्म: २१ आक्टोबर १९१७)

१९९६ : विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (जन्म: ४ जानेवारी १९२४)

१९८९ : हेमंतकुमार – गायक, संगीतकार आणि निर्माता (जन्म: १६ जून १९२०)

१९८८ : पण्डित शिवरामबुवा दिवेकर – हिन्दगंधर्व (जन्म: १ एप्रिल १९१२)

१९७७ : उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२) व फेलोशिप विजेते. त्यांनी अल्मोडा येथे ’इंडिया कल्चरल सेंटर’ची स्थापना केली. (जन्म: ८ डिसेंबर १९००)

१९५६ : लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक (जन्म: २० जून १८६९)

१९०२ : लेव्ही स्ट्रॉस – अमेरिकन उद्योजक (जन्म: २६ फेब्रुवारी १८२९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.