२७ सप्टेंबर दिनविशेष - 27 September in History
२७ सप्टेंबर दिनविशेष - 27 September in History

हे पृष्ठ 27 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २७ सप्टेंबर  रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 27 September. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • राष्ट्रीय ग्रंथालय दिन
  • जागतिक पर्यटन दिन

महत्त्वाच्या घटना:

१७७७: लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले.

१८२१: मेक्सिकोला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१८२५: द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.

१८५४: एस. एस. आर्क्टिक बोट अटलांटिक महासागरात बुडून ३०० लोक ठार झाले.

१९०५: आइन्स्टाइनने E=mc² हे समीकरण पहिल्यांदा मांडले.

१९०८: फोर्ड मॉडेल टी गाडीचे उत्पादन सुरु झाले.

१९२५: डॉ. केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना.

१९४०: दुसरे महायुद्ध – बर्लिन येथे जर्मनी, जपान व ईटली या देशांत त्रिपक्षीय तह झाला.

मिहीर सेन
मिहीर सेन

१९५८: मिहीर सेन हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू बनला.

१९६१: सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९८०: जागतिक पर्यटन दिन

१९९६: तालिबानने अफगाणिस्तानातील काबूल शहर जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुर्‍हानुद्दीन रब्बानी यांनी पलायन केले तर मोहम्मद नजीबुल्लाह यांना भर चौकात फाशी देण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१६०१: लुई (तेरावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १४ मे १६४३)

१७२२: अमेरीकन क्रांतिकारी सॅम्एल अॅडम्स यांचा जन्म.

यश चोप्रा

१९०७: भारतीय क्रांतिकारी भगत सिंग यांचा जन्म.

१९०७: वामनराव देशपांडे – संगीत समीक्षक (मृत्यू: ? ? १९९०)

१९३२: यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (मृत्यू: २१ आक्टोबर २०१२)

१९३३: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर २०१२)

गेव्हिन लार्सन
गेव्हिन लार्सन

१९५३: माता अमृतानंदमयी

१९६२: गेव्हिन लार्सन – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

१९७४: भारतीय क्रिकेट खेळाडू पंकज धर्माणी यांचा जन्म.

१९८१: लक्ष्मीपती बालाजी – क्रिकेटपटू

१९८१: ब्रॅन्डन मॅककलम – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१७२९: मराठेशाहीच्या आपत्‌प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन. दाभाडे घराण्याला सातशे गावांची देशमुखी असल्यामुळे त्यांना वतनदारांचे मुकुटमणी म्हणत.

१८३३: राजा राम मोहन रॉय – समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक, कन्याविक्रय, कन्याहत्या, बालविवाह इ. चालींमधून स्त्रीला मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले. (जन्म: २२ मे १७७२)

१९१७: फ्रेंच चित्रकार एदगा देगास यांचे निधन.

१९२९: शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार (जन्म: २७ जून १८६४)

१९७२: एस. आर. रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १८९२)

१९७५: तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ३ फेब्रुवारी १९००)

१९९२: अनुताई वाघ – समाजसेविका (जन्म: १७ मार्च १९१०)

१९९९: डॉ. मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका (जन्म: २६ डिसेंबर १९३५)

महेन्द्र कपूर
महेन्द्र कपूर

२००४: शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (जन्म: ८ फेब्रुवारी १९२५)

२००८: महेन्द्र कपूर – पार्श्वगायक (जन्म: ९ जानेवारी १९३४ – अमृतसर)

२०१२: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक संजय सूरकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९५९)

२०१५: भारतीय लेखक आणि राजकारणी सय्यद अहमद यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १९४५)

२०१५: भारतीय कार्यकर्ते आणि लेखक कॉलन पोकुकुडन यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *