22 मे दिनविशेष - 22 May in History
22 मे दिनविशेष - 22 May in History

हे पृष्ठ 22 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 22nd May. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन : 22 मे

जागतिक जैवविविधता दिन.

  • राष्ट्र दिन – यमन.

महत्त्वाच्या घटना:

१३७७: पोप ग्रेगोरी अकराव्याने पाच पोपचे फतवे काढून इंग्लिश तत्त्वज्ञानी जॉन वायक्लिफची मते खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

१७६२: स्वीडन आणि प्रशियामधे हॅम्बुर्गचा तह झाला.

१९०६: अथेन्समध्ये तिसरे ऑलिंपिक खेळ सुरु. काही काळानंतर यांची अधिकृत खेळ म्हणून मान्याता काढून घेण्यात आली.

१९०६: राइट बंधूंना त्यांच्या उडणाऱ्या यंत्रासाठी पेटंट देण्यात आला.

१९१५: स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन गावात ३ रेल्वेगाड्यांची टक्कर होऊन २२७ जण ठार आणि २४६ जण जखमी झाले.

१९१५: प्रथम विश्व युद्धादरम्यान सोवियत राष्ट्र इटलीने मित्र राष्ट्र ऑस्ट्रिया, हंगेरी आणि जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.

१९२७: चीनच्या झिनिंग जवळ झालेल्या ८.३ तीव्रतेच्या भूकंपात २,००,००० लोक ठार झाले.

१९४२: दुसरे महायुद्ध – मेक्सिकोने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उडी घेतली.

१९६०: ग्रेट चिलीयन भूकंप हा ९.५ तीव्रतेचा जगातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.

१९६१: हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळून हुंडाबंदी कायदा अस्तित्त्वात आला.

१९७२: सिलोनने नवीन राज्यघटना स्वीकारुन ते प्रजासत्ताक बनले. त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्याने राष्ट्रकुल देशांत प्रवेश केला.

१९८७: मेरठ जिल्ह्यात हाशिमपूरा हत्याकांड झाले.

मनमोहन सिंग
मनमोहन सिंग

१९८९: अग्नी’ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे ओरिसातील मंडीपूर येथून यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले.

२००४: भारताचे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांचा शपथविधी.

२००९: भारताचे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांचा दुसऱ्यांदा शपथविधी.

२०१५: आयर्लंड देश सार्वजानिक जनमतदानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर ठरवण्यासाठी जगातील पहिला देश बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१४०८: हिंदू संत अन्नामचार्य यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १५०३)

१६८८: अलेक्झांडर पोप, इंग्लिश कवी.

राजा राममोहन रॉय
राजा राममोहन रॉय

१७७२: सतीची चाल कायदेशीरपणे बंद करणारे व अनेक भाषांतून प्रावीण्य मिळविलेले थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचा बंगालमध्ये जन्म झाला.

१७८३: विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक विल्यम स्टर्जन यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर १८५०)

१८१३: जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक रिचर्ड वॅग्‍नर यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १८८३)

१८५९: स्कॉटिश डॉक्टर व शेरलॉक होम्स या गुप्तहेरकथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉइल यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १९३०)

१८७१: संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९३३)

१९०५: इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक बोडो वॉन बोररी यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १९५६)

१९०७: ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता सर लॉरेन्स ऑलिव्हिये यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुलै १९८९)

१९२५: पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय कवी, व रशियन भाषेचे हिंदीत भाष्यांतर करणारे भारतीय भाष्यकार मदन लाल मधु यांचा जन्मदिन.

१९४०: इरापल्ली प्रसन्ना, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९४८: भारतीय अभिनेता आणि पटकथालेखक नेदुमुदी वेणू यांचा जन्म.

१९५९: भारतीय राजकारणी मेहबूबा मुफ्ती यांचा जन्म.


१९८४:
 फेसबुकचे सह-संस्थापक डस्टिन मॉस्कोविट्झ यांचा जन्म.

१९८७: सर्बियाचा टेनिस खेळाडू नोव्हान जोकोव्हिच यांचा जन्म.

श्रीपाद डांगे
श्रीपाद डांगे

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१५४५: भारतीय शासक शेरशाह सूरी यांचे निधन.

१८०२: अमेरिकेची पहिली फर्स्ट लेडी मार्था वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: २ जून १७३१)

१८८५: जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्यूगो यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८०२)

१९९१: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १८९९)

१९९५: चित्रकार व शिल्पकार रविंद्र बाबुराव मेस्त्री यांचे निधन.

१९९८: लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९२८)

२००३: डॉ. नित्यनाथ ऊर्फ नीतू मांडके भारतीय हृदयरोगतज्ञ.

२०११: वैदिक व बौद्ध काळातील सुप्रसिद्ध भारतीय इतिहासकार तसचं, अलाहाबाद विद्यापीठातील प्राचीन इतिहासाचे प्राध्यापक व कुलगुरू गोविंदचंद्र पांडे यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *