हे पृष्ठ 1 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही १ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 1 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- नववर्ष दिन
- जागतिक शांतता दिन
- जागतिक कौटुंबिक दिवस
महत्त्वाच्या घटना:
१७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना ’न्यू डेन्मार्क’ असे नाव देण्यात आले.
१७८५: डेली यूनिवर्सल रजिस्टर म्हणजेच टाईम्स ऑफ लंडन ने आजच्या दिवशी पहिला अंक प्रकाशित केला होता.
१८०८: यू. एस. ए. मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
१८१८: भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या २५,००० सैन्याचा पराभव केला.
१८४२: बाबा पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले. नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ. ना. भि. परूळेकर यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्र हे सुरू केले.
१८४८: महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.
१८६२: इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
१८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे ’न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.
१८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना
१८९९: क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.
१९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
१९०८: ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ’ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.
१९१२: याच दिवशी रिपब्लिक ऑफ चायना ची स्थापना झाली होती.
१९१५: ला महात्मा गांधी यांना केसर ये हिंद चा पुरस्कार व्हायसरॉय यांच्या हातून मिळाला.
१९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
१९२०: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांनी छापखान्याची स्थापना केली. त्यातुनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. ’शंवाकिय’ हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना आहे.
१९२३: ला चित्तरंजन दास आणि जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज पक्षाची स्थापना केली.
१९३२: डॉ. ना. भि. परूळेकर यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्र हे सुरू केले.
१९६४: मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत अभियानाला सुरुवात केली.
१९७२: वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून निवडल्या गेले.
१९७३: मानेकशॉ यांना फ़ील्ड मार्शल नियुक्त केल्या गेले.
१९९५: WTO ची स्थापना झाली.
२०००: ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.
२००१: कलकत्ता ला अधिकृत रित्या कोलकत्ता म्हणून ओळखल्या जाऊ लागले.
२००४: चेकोस्लोवाकिया चे राष्ट्रपती व्हॅकलाव हवेली यांना गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती /वाढदिवस:
१६६२: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा (मृत्यू: १२ एप्रिल १७२०)
१८७९: इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक (मृत्यू: ७ जून १९७०)
१८९२: महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२)
१८९४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४)
१९००: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४)
१९०२: कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१)
१९१८: शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२)
१९२३: उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००३)
१९२८: डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: २२ मे १९९८)
१९३५: ला भारतीय अभिनेत्री शकीला यांचा जन्म.
१९३६: राजा राजवाडे – साहित्यिक (मृत्यू: २१ जुलै १९९७)
१९४१: गोवर्धन असरानी ऊर्फ ’असरानी’ – चित्रपट कलाकार
१९४३: रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण
१९५०: दीपा मेहता – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका
१९५१: नाना पाटेकर – अभिनेता
१९५३: ला भारताचे माजी विदेश मंत्री सलमान खुर्शीद यांचा जन्म.
१९६१: ला मणिपूर चे माजी मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह यांचा जन्म.
१९७१: संसद चे माजी सदस्य ज्योतिरादित्य सिंधिया यांचा जन्म.
१९७५: भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचा जन्म.
१९७९: भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री विद्या बालन यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१५१५: लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २७ जून १४६२)
१७४८: योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म: २७ जुलै १६६७)
१८९४: हेन्रिच हर्ट्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)
१९४४: सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (जन्म: २९ मार्च १८६९)
१९५५: डॉ. शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (जन्म: २१ फेब्रुवारी १८९४)
१९७५: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. (जन्म: ८ आक्टोबर १८९१)
१९८३: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती डी.एन.खुरोदे यांचे निधन.
१९८९: दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार
२००८: ला भारताचे प्रसिद्ध लेखक प्रतापचंद्र चंदर यांचे निधन.
२००९: रामाश्रेय झा – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)