हे पृष्ठ 8 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 8 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
भारतीय हवाईदल दिन: भारतीय हवाई दलाची स्थापना १९३२ मध्ये करण्यात आली (मुख्यालय : नवी दिल्ली येथे). हवाई दलाचे घोषवाक्य : Touch The Sky With Glory (भगवद्गीतेतून घेतले आहे). उत्तरप्रदेशातील हिंडोन हवाई दल स्टेशन हे आशियातील सर्वात मोठे एअरबेस आहे. अर्जन सिंह हे भारतीय हवाईदलाचे पहिले व एकमेव ०५ स्टार रॅंक असणारे अधिकारी
महत्त्वाच्या घटना:
१८६०: अमेरिकेतील लॉस एंजिल्स आणि सैनफ्रांसिस्को शहरादरम्यान प्रथम टेलिग्राफ लाईन स्थापित झाली होती.
१९३२: ’इंडियन एअर फोर्स अॅक्ट’ द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.
१९३९: दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.
१९५९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय ‘डी-लिट’ पदवी घरी येऊन दिली.
१९६२: अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश
१९६२: नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित ’तो मी नव्हेच’ या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.
१९७२: वन्यजीव सप्ताह
१९७८: ऑस्ट्रेलियाच्या केन वॉर्बीने पाण्यावर ३१७.६० तशी मैल वेगाचा विक्रम केला.
१९८२: पोलंडने ’सॉलिडॅरिटी’ व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.
२००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.
२००५: काश्मीर मध्ये झालेल्या ७.६ रिश्टर भूकंपा मुळे सुमारे ८६,००० – ८७,५०० लोक मृत्युमुखी पडले, ६९,०००- ७२,५०० जण जखमी झाले आणि २.८ दशलक्ष लोक बेघर झाले.
२००७: बांग्लादेशाचे पूर्व गृहमंत्री मोहम्मद नसीम यांना तेरा वर्षाच्या तुरुंग वासाची शिक्षा झाली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८५०: हेन्री लुईस ली चॅटॅलिअर – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: १७ सप्टेंबर १९३६)
१८८९: डेल्टा एअर लाईन्स चे सहसंस्थापक कॉलेट ई. वूल्मन यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९६६)
१८९१: शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. १९२० मधे त्यांनी किर्लोस्कर छापखान्याची स्थापना केली. त्यातुनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. ’शंवाकिय’ हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना आहे. (मृत्यू: १ जानेवारी १९७५)
१९२२: गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन – संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ (Biophysicist). वैज्ञानिकांना मिळणारे बहुतेक सर्व राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले. (मृत्यू: ७ एप्रिल २००१ – चेन्नई, तामिळनाडू)
१९२४: भारतीय कवि आणि स्कॉलर थिरूनलूर करुणाकरन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००६)
१९२६: कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ ऊर्फ ’जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता (मृत्यू: ३ जुलै १९९६)
१९२८: नील हार्वे – ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू
१९३०: भारतीय इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माता अलेसदैर मिल्ने यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी २०१३)
१९३५: मिल्खा सिंग – ’द फ्लाइंग सिख’
१९९३: पशुवैद्यक डॉ. काजल तांबे यांचा जन्म.
१९९७: अमेरिकन अभिनेत्री बेला थोर्न यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१३१७: फुशिमी – जपानचा सम्राट (जन्म: १० मे १२६५)
१८८८: महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व संस्कृतचे प्राध्यापक. ’राजा शिवाजी’ हे त्यांचे काव्य विशेष गाजले. (जन्म: १ ऑगस्ट १८३५ – माहुली, सांगली, महाराष्ट्र)
१९३६: धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद‘ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी १५ कादंबर्या व ३०० कथा लिहील्या. त्यांचे २४ कथासंग्रह प्रसिद्ध झाले. (जन्म: ३१ जुलै १८८०)
१९६७: क्लेमंट अॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म: ३ जानेवारी १८८३)
१९७९: ’लोकनायक’ जयप्रकाश नारायण – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान (जन्म: ११ आक्टोबर १९०२)
१९९६: गोदावरी परुळेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून त्यांनी सनद मिळवली. तलासरी, डहाणू, शिरगाव या भागातील डोंगरदर्यांत फिरून वारल्यांच्या पिळवणुकीचे अनुभव त्यांनी ऐकले व आदिवासींमधे जागृतीचे कार्य केले. ’जेव्हा माणूस जागा होतो’ हे त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करुन देणारे आहे. (जन्म: १४ ऑगस्ट १९०७)
१९९८: इंदिराबाई हळबे ऊर्फ ’मावशी’ – देवरुख येथील ’मातृमंदिर’ संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा (जन्म: ? ? ????)
२०१२: नवल किशोर शर्मा – केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल (जन्म: ५ जुलै १९२५)
२०१२: वर्षा भोसले – पत्रकार व पार्श्वगायिका (जन्म: ?? १९५६)