७ ऑक्टोबर दिनविशेष - 7 October in History
७ ऑक्टोबर दिनविशेष - 7 October in History

हे पृष्ठ 7 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 7 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

ख्रिस्त पूर्व ३७६१: हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस

महात्मा गांधीं
महात्मा गांधीं

१९०५: पुण्यात विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी केलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्‍न होता.

१९१२: हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.

१९१९: महात्मा गांधींनी ’नवजीवन’ हे वृत्तपत्र सुरू केले.

१९१९: के. एल. एम. (KLM) या विमानकंपनीची स्थापना झाली.

१९३३: पाच छोट्या कंपन्यांचे एकत्रीकरण करुन ’एअर फ्रान्स’ ही कंपनी स्थापण्यात आली.

१९४९: जर्मन डेमॉक्रेटिक रिपब्लिक (पूर्व जर्मनी) ची स्थापना

१९५०: मदर टेरेसा यांनी कलकत्ता शहरात मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली होती.

१९५८: पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इस्कंदर मिर्झा यांनी पाकिस्तानचे संविधान निलंबित केलं होत आणू मार्शल लॉ लागू करण्यात आला होता.

१९७१: ओमानचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश

१९९६: फॉक्स न्यूज चॅनलचे प्रसारण सुरू होते.

२००१: सप्टेंबर ११ च्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला चढवला.

२००२: सलमान खान यांची वांद्रे पोलिसांत अटक.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८६६: कृष्णाजी केशव दामले तथा ’केशवसुत’ – मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे १३५ कविता आज उपलब्ध आहेत. त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. ’केशवसुतांची कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला. त्यांच्या ’तुतारी’, ’नवा शिपाई’, ’गोफण केली छान’ इ. कविता प्रसिद्ध आहेत. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९०५)

नील्स बोहर
नील्स बोहर

१८८५: नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९६२)

१९००: हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी (मृत्यू: २९ एप्रिल १९४५)

१९०७: प्रागजी डोस्सा – गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (मृत्यू: २० ऑगस्ट १९९७)

१९१४: बेगम अख्तर – गझल, दादरा आणि ठुमरी गायिका. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. (मृत्यू: ३० आक्टोबर १९७४)

१९१७: विनायक महादेव तथा ’वि. म.’ कुलकर्णी – कवी आणि बालकुमार-साहित्यिक (मृत्यू: १३ मे २०१० – पुणे)

व्लादिमीर पुति
व्लादिमीर पुति

१९२९: आयमॅक्स कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक ग्रॅमी फर्ग्युसन यांचा जन्म.

१९५२: व्लादिमीर पुतिन – रशियाचे ४ थे राष्ट्राध्यक्ष

१९५९: एक्स फैक्टर आणि ब्रिटन गॉट टेलेन्ट चे निर्माते शमौन कोवेल यांचा जन्म.

१९६०: आश्विनी भिडे-देशपांडे – शास्त्रीय गायिका

१९७८: जहीर खान – जलदगती गोलंदाज

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

गुरू गोविंद सिंग
गुरू गोविंद सिंग

१७०८: गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू (जन्म: २२ डिसेंबर १६६६)

१८४९: एडगर अ‍ॅलन पो – अमेरिकन (गूढ व भयकथांचा) लेखक व कवी (जन्म: १९ जानेवारी १८०९)

१९५१: फिलिप्स कंपनी चे सहसंस्थापक एंटोन फिलिप्स यांचे निधन. (जन्म: १४ मार्च १८७४)

१९६१: साली प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक व्यक्ती केदारेश्वर गुप्ता यांचे निधन.

भाऊसाहेब वर्तक
भाऊसाहेब वर्तक

१९७५: देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. – कन्नड कवी व विचारवंत (जन्म: १८ जानेवारी १८८९ – मुळबागल, कोलार, कर्नाटक)

१९९८: भाऊसाहेब वर्तक – महाराष्ट्राचे महसूलमंत्री, काँग्रेसचे नेते, पद्मश्री (जन्म: ? ? ????)

१९९९: उमाकांत निमराज ठोमरे – साहित्यिक, अनेकांना लिहिते करणारे, वाचकप्रिय ‘वीणा‘ या दर्जेदार मासिकाचे संपादक, बालसाहित्यकार (जन्म: १५ ऑगस्ट १९२९ – अहमदनगर)

२०११: अल्बेनिया देशाचे पहिले अध्यक्ष रमीझ अलिया यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १९२५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *