६ ऑक्टोबर दिनविशेष - 6 October in History
६ ऑक्टोबर दिनविशेष - 6 October in History

हे पृष्ठ 6 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 6 October. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१९०८: ऑस्ट्रियाने बोस्‍निया व हेर्झेगोविना हे प्रांत बळकावले.

१९२७: ’वॉर्नर ब्रदर्स’चा ’जॅझ सिंगर’ हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.

१९४९: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.

१९६३: पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.

१९७३: इजिप्त व सीरीयाने मिळुन इस्त्राएलवर हल्‍ला केला.

इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत
इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत

१९७७: सोव्हियत संघाद्वारे निर्मित मिग २९ या लढाऊ विमानाचे देशांत पहिल्यांदा उड्डाण करण्यात आले.

१९८१: इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्या

१९८७: फिजी प्रजासताक बनले.

१९८९: मीरा साहेब फातिमा बिबी यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी नियुक्ती करण्यात आली. न्यायाधीशपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या मुस्लीम महिला होत्या.

२००७: जेसन लुइस याने वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

९५२: मध्ये झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे तसेच १९६२ मधे नांदेड येथे झालेल्या साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांचे ‘वेलांटी‘, ‘पहाटतारा‘, ‘शततारका‘, ‘रुद्रवीणा‘, ‘दोनुली‘, ‘मरणगंध’ इ. काव्यसंग्रह तसेच अनेक ललित, स्फुट व समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ’मावळते शब्द’ या कवितेला कवी केशवसुत पारितोषिक मिळाले. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९९१)

१६७९: मुघल शासक मुहम्मद अकबर यांचे पुत्र व मुघल वंशाचे १२ वे शासक बादशाहा नेक सियर यांचा जन्मदिन.

१७७९: माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन – स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांनी हिस्ट्री ऑफ इंडिया’ या दोन खंडात भारताचा इतिहास लिहिला. (मृत्यू: २० नोव्हेंबर १८५९)

१८६६: रेडिओटेलेफोनी चे संस्थोधक रेगिनाल्ड फेसेनडेन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै १९३२)

मेघनाद साहा
मेघनाद साहा

१८९३: मेघनाद साहा – खगोलभौतिकशास्त्रज्ञ व संसदसदस्य. तार्‍यांच्या वातावरणाचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करणारा सिद्धांत त्यांनी मांडला. भारताचे स्वत:चे राष्ट्रीय पंचांग त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आले. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९५६)

१९१२: डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०००)

टोनी ग्रेग
टोनी ग्रेग

१९१३: वामन रामराव तथा ’वा. रा.’ कांत – कवी. त्यांची ‘सखी शेजारिणी तू हसत रहा‘, ‘त्यातरुतळी विसरले गीत‘, ‘बगळ्यांची माळ फुले अजुन अंबरात‘, ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे‘ इ. भावगीते लोकप्रिय आहेत.

१९१४: थोर हेअरडल – नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक (मृत्यू: १८ एप्रिल २००२)

१९३०: रिची बेनो – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक

१९४३: डॉ. रत्‍नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक (मृत्यू: २० फेब्रुवारी २०१२)

विनोद खन्ना
विनोद खन्ना

१९४६: विनोद खन्ना – अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार

१९४६: टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक (मृत्यू: २९ डिसेंबर २०१२)

१९७२: सलील कुलकर्णी – संगीतकार

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६६१: गुरू हर राय – शिखांचे ७ वे गुरू (जन्म: २६ फेब्रुवारी १६३०)

व्ही. के. कृष्ण मेनन
व्ही. के. कृष्ण मेनन

१८९२: लॉर्ड टेनिसन – इंग्लिश कवी (जन्म: ६ ऑगस्ट १८०९)

१९५१: विल केलॉग – ’केलॉग्ज’ चा मालक (जन्म: ७ एप्रिल १८६०)

१९७४: व्ही. के. कृष्ण मेनन – भारताचे संरक्षणमंत्री व मुत्सद्दी (जन्म: ३ मे १८९६)

१९७९: महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू [१९६१-१९६४], टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू [१९४८], पद्मविभूषण, मराठी शुद्धलेखन महामंडळाचे अध्यक्ष, प्राचीन मराठी इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचे व्यासंगी (जन्म: ५ ऑगस्ट १८९०)

१९८१: अन्वर सादात – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २५ डिसेंबर १९१८)

१९८६: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित राजस्थान येथील भारतीय स्वातंत्र्य सेनानी व राजकारणी नेता व समाजसेवक गोकुलभाई भट्ट यांचे निधन.

एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य
एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य

२००७: बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री [कार्यकाल: २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३] (जन्म: १५ जानेवारी १९२१)

२००७: एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत (जन्म: ९ नोव्हेंबर १९३१)

२०१२: भारतीय स्वातंत्र्य सेनानी, समाजवादी राजकारणी आणि उत्तरप्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल बी. सत्य नारायण रेड्डी यांचे निधन.

२०१५: हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष अरपॅड गॉन्कझ यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १९२२)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *