९ नोव्हेंबर दिनविशेष - 9 November in History
९ नोव्हेंबर दिनविशेष - 9 November in History

हे पृष्ठ 9 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 9 November. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१५८०: स्पेन या देशाच्या सेनेने आयर्लंड देशावर आक्रमण केले होते.

१७९४: तत्कालीन रशियाच्या सेनेने पोलंडची राजधानी वारसा ताब्यात घेतली होती.

१९०६: आपल्या कार्यकालात देशाबाहेर जाणारे थिओडोर रुझव्हेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली.

१९२३: दिनचर्या नावाचे एक पत्र दतात्रय गणेशजी यांनी पुण्यात सुरु केले.

१९३७: जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला.

१९४७: भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.

१९४९: कोस्टारिका या देशाने संविधानाचा अंगीकार केला होता.

१९५३: कंबोडियाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९५४: दार्जीलिंग या थंड हवेच्या ठिकाणी हिमालय पर्वतारोहण संस्थेची स्थापना करण्यात आली होती.

१९६०: रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले. ’फोर्ड’ आडनाव नसणारे ते पहिलेच अध्यक्ष होते. मात्र जॉन केनेडी यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यामुळे एक महिन्यातच त्यांनी राजीनामा दिला.

१९६५: इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बर्‍याच भागाचा वीजपुरवठा १२ तास खंडित झाला.

१९६७: रोलिंग स्टोन मासिकांचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१९८८: मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.

साहित्यिक गंगाधर गाडगीळ
साहित्यिक गंगाधर गाडगीळ

१९८९: ब्रिटनने मृत्यू दंडाच्या शिक्षेवर पूर्णपणे बंदी घातली होती.

१९९७: साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चा जनस्थान पुरस्कार प्रदान

२०००: उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना

२०००: न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासोचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.

२०००: उत्तराखंड राज्याची निर्मिती.

२००१: पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आजच्याच दिवशी संयुक्त राष्ट्र या जागतिक संस्थेच्या महासभेला संबोधित केले होते.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

थिओडोर रुझव्हेल्ट
थिओडोर रुझव्हेल्ट

१४८३: मार्टिन ल्युथर यांचा जन्म झाला होता.

१८०१: आटवलेल्या दुधाचे शोधक गेल बोर्डन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १८७४)

१८६७: जैन तत्त्वज्ञानी, विद्वान, कवी श्रीमद राजचंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १९०१)

१८७७: सारे जहाँन से अच्छा चे पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते कवी मोहम्मद इक़्बाल यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९३८)

एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य, कायदेपंडित
एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य, कायदेपंडित

१८७७: सर मुहम्मद इक्‍बाल – पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते (मृत्यू: २१ एप्रिल १९३८)

१८८९: प्रसिध्द भारतीय पत्रकार इंद्र विद्यावाचस्पती यांचा जन्म झाला होता.

१९०४: पंचानन माहेश्वरी – सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ (मृत्यू: १८ मे १९६६)

कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक
कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक

१९१८: तायक्वोंडो मार्शल आर्ट चे निर्माते चोई हाँग हाय यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून २००२)

१९२४: पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक, गुरु व बंदिशकार (मृत्यू: १० जानेवारी २००२)

१९३१: एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत (मृत्यू: ६ आक्टोबर २००७)

पायल रोहतगी
पायल रोहतगी

१९३४: कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक. यांनी सुमारे ६०० हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील उच्‍च तापानाचा शोध त्यांच्या प्रयत्‍नामुळे लागला. (मृत्यू: २० डिसेंबर १९९६- सिअ‍ॅटल, वॉशिंग्टन, यु. एस. ए.)

१९३६: प्रसिध्द हिंदी कवी सुदाम पांडे यांचा जन्म झाला होता.

१९४४: भारतीय कोरिओग्राफर चितेश दास यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी २०१५)

१९८०: पायल रोहतगी – अभिनेत्री व मॉडेल

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९२२: फ्रांस येथील प्रसिध्द विदुषक रेमंड डेवोस यांचा जन्म झाला होता.

१९४०: नेव्हिल चेंबरलेन – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म: १८ मार्च १८६९)

१९४१: संस्कृत भाषेचे पंडित व विद्वान गंगानाथ झा यांचे निधन झाले होते.

१९५२: चेम वाइझमॅन – इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ नोव्हेंबर १८७४)

१९६२: महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्‍न (जन्म: १८ एप्रिल १८५८)

१९६७: नटवर्य बाबूराव पेंढारकर (जन्म: ? ? १८९७)

१९७०: चार्ल्स द गॉल – फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती (जन्म: २२ नोव्हेंबर १८९०)

के. आर. नारायणन
के. आर. नारायणन

१९७७: केशवराव भोळे – गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक. ’अमृतमंथन’, ’संत तुकाराम’, ’ कुंकू’, ’माझा मुलगा’,’ संत ज्ञानेश्वर’, ’संत सखू’ आदी बोलपटांतील गीतांच्या स्वररचना आणि संगीत दिग्दर्शन त्यांनी केले होते. ’एकलव्य’ या टोपणनावाने त्यांनी ’वसुंधरा’ या साप्ताहिकात अभिजात गायक-गायिकांविषयीचे लेख लिहिले. क्रिकेटवरही ते अभ्यासपूर्ण लेखन करत असत. (जन्म: २३ मे १८९६)

२०००: मिस वर्ल्ड स्पर्धेचे निर्माते एरिक मॉर्ले यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९१८)

२००३: मैथिली भाषेतील लेखक व कवी विनोद बिहारी वर्मा यांचे निधन.

२००५: फ्रांस या देशात आजच्याच दिवशी आणीबाणी घोषित करण्यात आली होती.

हर गोविंद खुराना
हर गोविंद खुराना

२००५: के. आर. नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती (जन्म: २७ आक्टोबर १९२०)

२०११: हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: ९ जानेवारी १९२२)

२०१३: प्रसिध्द राजस्थानी साहित्यकार विजयदान देथा यांचे निधन झाले होते.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *