लालकृष्ण अडवाणी
लालकृष्ण अडवाणी

हे पृष्ठ 8 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 8 November. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

जी. बी. पटनायक
जी. बी. पटनायक

२००२ : जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

१९९६ : कवी व लेखक प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’ यांची विदर्भ साहित्य संघाच्या जीवनव्रती पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून निवड

१९६० : अटीतटीच्या लढतीत रिचर्ड निक्सन यांचा पराभव करुन जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष बनले.

प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’
प्रा. माणिक गोडघाटे ऊर्फ ’ग्रेस’

१९४७ : पंजाब अँड हरयाणा उच्‍च न्यायालयाची स्थापना

१९३९ : म्युनिक येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर प्राणघातक हल्ल्यातुन बचावला.

१८९५ : दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला.

१८८९ : मोंटाना हे अमेरिकेचे ४१ वे राज्य बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

ब्रेट ली
ब्रेट ली

१९७६ : ब्रेट ली – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज

१९२७ : लालकृष्ण अडवाणी – भारताचे उपपंतप्रधान, केन्द्रीय माहिती व नभोवाणी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते

१९१९ : पु. ल. देशपांडे तथा ’पु. ल.’ – आपल्या अलौकिक प्रतिभेने जगभरातील मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे आणि त्यांची अभिरुची संपन्न करणारे लेखक, नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, वादक आणि वक्ते (मृत्यू: २ जून २००० – पुणे)

कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे
कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे

१९१७ : कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे – कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित, देशातील कर्करोग संशोधनाची सुरुवात करण्याचे श्रेय डॉ. व्ही. आर. खानोलकर व डॉ. कमल रणदिवे यांना दिले जाते. (मृत्यू: ११ एप्रिल २०००)

१९०९ : नरहर वामन तथा ’नरुभाऊ’ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, निर्भिड पत्रकार व काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९८) नरुभाऊ लिमये

१८९३ : प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) – थायलँडचा राजा (मृत्यू: ३० मे १९४१)

१६५६ : एडमंड हॅले – हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १४ जानेवारी १७४२)

जॉन मिल्टन
जॉन मिल्टन

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६७४ : जॉन मिल्टन – कवी, विद्वान व मुत्सद्दी (जन्म: ९ डिसेंबर १६०८)

१२२६ : लुई (आठवा) – फ्रान्सचा राजा (जन्म: ५ सप्टेंबर ११८७)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.