३० मे दिनविशेष - 30 May in History
३० मे दिनविशेष - 30 May in History

हे पृष्ठ 30 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that have occurred on 30th May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१४३१: फ्रांसच्या रुआ शहरात जोन ऑफ आर्कला जाळून मृत्यूदंड.

१४९८: इटालियन सागरी खलासी कोलंबस आपल्या सहा जहाजांसोबत अमेरिकेच्या प्रवासाला निघाले.

१५५६: अकबराचा मुलगा सलीम व राणा प्रताप यांच्यामध्ये हळदीघाट येथे घनघोर लढाई झाली.

१५७४: हेन्‍री (तिसरा) फ्रान्सचा राजा बनला.

१६३५: प्रागचा तह.

१६३१: पहिले फ्रेंच वृत्तपत्र गॅझेट डी फ्रान्सचे प्रकाशन झाले.

१८१४: पॅरिसचा पहिला तह – नेपोलियन बोनापार्टला एल्बा येथे हद्दपारीची शिक्षा.

१८६६: मुस्लीम धर्मीय विद्वान मुहम्मद क़ासिम नानोत्वी यांनी उत्तरप्रदेश मधील देवबंद या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या मदरस्याची स्थापना केली.

१९२२: अमेरिकेतील वॉशिंगटन डीसी मध्ये लिंकन यांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार करण्यात आला.

१९३४: मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात.

१९४२: दुसरे महायुद्ध – इंग्लंडच्या १००० विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्बहल्ला केला.

१९७४: एअरबस ए-३०० विमानांची सेवा सुरू झाली.

१९७५: युरोपियन स्पेस एजंसीची स्थापना झाली.

१९८७: गोवा हे भारतातील २५ वे घटकराज्य मान्य करण्यात आले. गोव्याला भारतातील २६ वे घटक राज्य म्हणून मान्यता मिळाली. 30 मे 1987 रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आल्याने 30 मे हा दिवस गोवा राज्य स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो.

१९९३: पु. ल. देशपांडे यांना त्रिदल’ संस्थेच्या वतीने पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.

१९९८: अफगाणिस्तानमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.६ तीव्रतेचा भूकंप. ५,००० ठार.

२०१२: भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी पाचव्यांदा विश्व बुद्धिबळ पटू होण्याचा मान पटकावला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१०१०: रेनझॉँग, चिनी सम्राट.

१६७२: पीटर द ग्रेट, रशियाचा झार.

१८९४: डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर (इतिहासकार).

१८७९: कॉलिन ब्लाइथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८९५: मॉरिस टेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९०६: प्रसिद्ध भारतीय चित्रपट गीतकार, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि कथा लेखक पंडित मुखराम शर्मा यांचा जन्मदिन.

१९०९: जॉर्ज हेडली (वेस्ट ईंडीझचे क्रिकेट खेळाडू).

१९१६: दीनानाथ दलाल – (३० मे १९१६ – १५ जानेवारी १९७१) दीनानाथ दलाल हे वाङ्‍मयीन पुस्तकांतील बोधचित्रांकरता, मुखपृष्ठांकरता ख्यातनाम झालेले मराठी चित्रकार होते. यांचे मूळ नाव नृसिंह दामोदर दलाल-नाईक होते परंतु पुढे दीनानाथ दलाल या नावाने ते प्रसिद्धीस आले.

१९४०: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष तसचं, बंगाल क्रिकेट असोसिएशन चे माजी अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा जन्मदिन.

१९४९: इंग्लिश जलदगती गोलंदाज बॉब विलीस यांचा जन्म.

१९५०: परेश रावल (भारतीय अभिनेते).

१९५२: भारतीय औषध शास्त्रज्ञ, संगीतशास्त्रज्ञ, हार्मोनियम वादक आणि ज्योतिषशास्त्र सल्लागार विद्याधर ओक यांचा जन्मदिन.

१९५५: प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, विनोदकार आणि राजकारणी तसचं, भारतीय लोकसभेचे माजी सदस्य परेश रावल यांचा जन्मदिन.

१९५६: भारतीय वंशीय अमेरिकन जैविक अभियंता, साहित्य वैज्ञानिक आणि शैक्षणिक प्रशासक सुब्रा सुरेश यांचा जन्मदिन.

१९६४: भारतीय सेवानिवृत्त क्रिकेट पंच के. एन. राघवन यांचा जन्मदिन.

१९८०: देवेन्द्र बार्नहार्ट (अमेरिकन संगीतकार).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१४३१: फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणार्‍या जोन ऑफ आर्कला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले. ती द मेड ऑफ ऑर्लिन्स या टोपणनावानेही ओळखली जाते. (जन्म: ६ जानेवारी १४१२)

१५७४: फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचे निधन. (जन्म: २७ जून १५५०)

१६०६: शिखांचे पाचवे गुरु गुरु अर्जुन देव यांचे निधन.

१७४४: अलेक्झांडर पोप (इंग्लिश लेखक).

१७७८:  फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक व्होल्टेअर यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर १६९४)

१९१२: आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १८६७)

१९४१:  थायलँडचा राजा प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १८९३)

सावळाराम लक्ष्मण हळदणकर
सावळाराम लक्ष्मण हळदणकर

१९५०: देवदत्त रामकृष्ण भांडारकर, प्राच्यविद्या संशोधक.

१९५५:  साली भारतीय व्यापारी संघटनेचे नेते आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचे अनुयायी तसचं, लाला लाजपत राय यांच्यासमवेत ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेसची स्थापना करणारे महान स्वातंत्र्य सेनानी नारायण मल्हार जोशी यांचे निधन. (जन्म: ५ जून १८७९)

१९६०: बोरिस पास्तरनाक (रशियन लेखक).

१९६८: चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८८२)

१९८१: बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांची हत्या. (जन्म: १९ जानेवारी १९३६)

१९८९: शिख संतकवी दर्शनसिंहजी महाराज यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १९२१)

१९९१: प्रसिद्ध भारतीय राजकारणी तसचं, माजी भारतीय कॅबिनेट मंत्री आणि पश्चिम बंगाल व कर्नाटक राज्याचे माजी राज्यपाल उमा शंकर दीक्षित यांचे निधन.

२०००: साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय पुरोगामी साहित्यिक समिक्षक, भाषाविज्ञानी, कवी आणि विचारवंत रामविलास शर्मा यांचे निधन.

२००७: भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९२७)

२०१३: सर्वोत्कृष्ट बंगाली भाषिक चित्रपटा करिता राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, लेखक आणि गीतकार ऋतुपर्णो घोष यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *