ज्ञानेंद्रिये (Sensory Organs)
ज्ञानेंद्रिये (Sensory Organs)

ज्ञानेंद्रिये (Sensory Organs)

प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात- डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ

डोळे (Eyes):

८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होते.

पापणीची सतत उघडझाप चालू असते. त्याद्वारे अश्रू डोळ्यावर समप्रमाणात पसरविले जाऊन डोळा ओलसर राहतो.

अश्रू हे सोडियम क्लोराईड व सोडियम बाय कार्बोनेटचे मिश्रण असते. त्यामध्ये लायसोझाइम (Lysozyme) नावाचे विकर असते. जे ऍन्टीसेप्टीक म्हणून काम करते.

बुबुळ (Cornea):

नेत्रदानामध्ये डोळ्याचा हा भाग काढला जातो. मृत्यूनंतर तो चार तासाच्या आत काढणे गरजेचे असते.

बुबुळ रोपणास Keratoplasty असे म्हणतात. मानवी अवयवाचे पहिले यशस्वी रोपण (Transplantation) बुबुळाचे करण्यात आले होते. ते एक्वर्ड कौराड झिर्म (Edward Kourad Zirm) या शास्त्रज्ञाने 7 डिसेंबर 1905 रोजी केले होते.

दृष्टिपटल (Retina):

हा डोळ्याचा पडदा असून वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते. वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर उलटी (inverted & Reversed) पडत असते. मात्र, मेंदूमार्फत तिचे आकलन सुलट केले जाते.

दृष्टीसातत्य :

वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर १/१६ सेकंदासाठी राहत असते. त्याच्या आतच त्याच वस्तूची प्रतिमा पुन्हा पडल्यास त्या दोन प्रतिमांमधील फरक जाणवून येत नाही. याला दृष्टिसातत्य असे म्हणतात. त्यामुळेच सिनेमाच्या पडद्यावर हलणारी चित्रे पाहणे शक्य होते.

दृष्टिदोष (Defects Of Vision):

दृष्टिदोष हे प्रामुख्याने नेत्रभिंगातील संरचनात्मक दोषामुळे निर्माण होत असतात.

१) निकटदृष्टिता / हृस्वदृष्टी (Myopia/ Short-sightedness):

 • जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. तर लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.
 • डोळ्याचा आकार मोठा, लांबट व चपटा होतो, त्यामुळे वस्तूची प्रतिमा पडद्याच्या अलीकडेच पडते. प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्याच्या अलीकडेच काही अंतरावर होते. अर्थात, प्रकाशकिरण ज्यावेळी पडद्यावर पोहोचतात त्यावेळी ते विकेंद्रित झालेले असतात.
 • उपाय: अंतर्गोल भिंगाचा चष्मा

२) दूरदृष्टिता/ दीर्घदृष्टी (Hypermetropia/Longsightedness):

 • दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, तर जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.
 • डोळ्याचा आकार मोठा व उभट होतो. त्यामुळे प्रतिमा पडद्याच्या मागे पडते.
 • उपाय: बहिर्गोल भिंगाचा चष्मा

३) विष्मदृष्टी / अबिंदूकता (Astigmatism):

 • बुबुळाच्या किंवा भिंगाच्या किंवा दोघांच्या वक्रतेमध्ये कमी -जास्तपणा निर्माण झाल्यास हा दोष निर्माण होतो.
 • त्यामुळे वस्तूपासून येणाऱ्या प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्यावर एकाच ठिकाणी न होता दोन किंवा अधिक ठिकाणी होते. त्यामुळे वस्तू अस्पष्ट दिसतात.
 • हा दोष ह्रस्व व दीर्घदृष्टी या दोन्हींमध्ये आढळू शकतो.
 •  उपाय: दंडगोलाकार भिंगाचा चष्मा.

४) वृध्ददृष्टिता/ चाळीसी (Presbyopia):

 • वाढत्या वयामुळे होणार दोष
 • दूरदृष्टीतेचा एक प्रकार
 • समायोजी स्नायू दुर्बल बनल्याने भिंगाच्या समायोजन शक्तीमध्ये हळूहळू होणाऱ्या कमतरतेमुळे निर्माण होतो, त्यामुळे जवळच्या वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत.
 • उपाय: वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे

नेत्रयोग (Eye Disease):

१) रंग आंधळेपणा (Colour Blindness):

 • अनुवांशिक व बरा न होणारा रोग
 • सर्व रंग दिसतात. मात्र, त्यातील फरक जाणवून येत नाही.
 • विशेषतः लाल व हिरवा रंगातील फरक समजून येत नाही .
 • फक्त पुरुषांनाच होतो.

२) मोतीबिंदू (Cataract):

 • डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदलामुळे नेत्रभिंग धूसर किंवा अस्पष्ट बनतो, कमी प्रकाशात चांगले तर जास्त प्रकाशात कमी दिसते.
 • उपाय: भिंगारोपण, बहिरवर्क भिंगाचे रोपण केले जाते.
 • मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर कधी कधी नवीन बसविलेल्या भिंगाच्या मागे पुन्हा मोतीबिंदू तयार होते. यासाठी काही महिने ते काही वर्षे असा कालावधी असू शकतो. YAG लेसर वापरून हा द्वितीयक मोतीबिंदू काढता येतो.

३) काचबिंदू (Glaucoma):

 • हि व्यथा वयाच्या ४० ते ५० वर्षाच्या दरम्यान होते.
 • नेत्रजलाच्या निचऱ्यामध्ये बिघाड झाल्यास ते डोळ्यात साठू लागते. त्यामुळे डोळ्याच्या आतील दाब (अंतर्दाब) वाजवीपेक्षा जास्त वाढतो व डोळा टणक बनतो. त्यामुळे बुबुळ घासले गेल्याने काचेसारखे चकचकीत होते. म्हणून त्याला काचबिंदू असे म्हणतात.
 •  काचबिंदूची परिणीती आंधळेपणात होऊ शकते.
 • डोळ्याचा अंतर्दाब टोनोमीटरच्या साहाय्याने मोजला जातो.

४) शुष्कता (Xerophtalmia/xerosis):

 • व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे होतो.
 • डोळे कोरडे पडून पुढे रातांधळेपणा होऊ शकतो.

५) डोळे येणे (Conjuctivitis):

 • विषाणूच्या संसर्गामुळे होणारा रोग
 • डोळे लाल होऊन खूप लागतात व चिकट पाणी येते.

६) खुपरी (Trachoma):

 • संसर्गजन्य रोग, घाणेरडया वस्तीत, दूषित हवेत, दूर व धुळीत राहणाऱ्यांना होतो.
 • प्रथम पापण्यांचा आतील भाग खरखरीत होतो व नंतर त्यावर साबुदाणाच्या आकाराचे उंचवटे येतात.
 • डोळ्याच्या उघटझापीमुळे ते बुबुळावर घासले गेल्याने बुबुळावर फुले पडतात. त्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.

७) रांजणवाडी (Meibomian Cyst):

 • पापण्यांच्या केसांच्या मुळाशी असलेल्या सूक्ष्मस्रावक ग्रंथींमधून नेहमी एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर पडत असतो.
 • या ग्रंथी धूलिकण, केसातील कोंडा इत्यादी कारणांमुळे बंद झाल्यास द्रव बाहेर न पडल्याने सुजतात. त्यालाच रांजणवाडी असे म्हणतात.

डोळ्यांना रंगांची व प्रकाशाची जाण 

मानवी डोळ्यातील दृष्टिपटल अनेक प्रकाश -संवेदी (Lightsensitive) पेशींनी बनलेले असते. या पेशी दोन प्रकार / आकाराच्या असतात. दंडाकार व शंकाकार.

१) दंडाकार पेशी (Rod – Shaped) 

प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वितेची/ अंधुकतेची माहिती पुरवितात.

२) शंकाकार पेशी (Cone-Shaped)

प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात व प्रतिमेच्या रंगाची माहिती मेंदूस पुरवितात.

दंडाकार पेशी अंधुक प्रकाशाससुद्धा प्रतिसाद देतात परंतु शंकाकार पेशींना अंधुक संवेदना नसतात. या पेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच प्रतिसाद देतात. यामुळे रंगाची संवेदना किंवा जाण फक्त तेजस्वी प्रकाशातच होते.

डोळे तपासणीत वापरण्यात येणाऱ्या संज्ञा:
६/६ दृष्टी:६ मीटर अंतरावरून किमान ६ मिमी आकारापर्यंतची अक्षरे वाचता येतात. हि सामान्य दृष्टी आहे.
६/९ दृष्टी:६ मीटर अंतरावरून किमान ९ मिमी अकरापर्यंतची अक्षरे वाचता येतात.
६/१२ दृष्टी:६ मीटर अंतरावरून किमान १२ मिमी आकारापर्यंतची अक्षरे वाचता येतात.’
६/५ दृष्टी:हिला उत्तम दृष्टी असे समजले जाते.

 

इतर माहिती 
 • कान हे ऐकण्याचे इंद्रिय आहे. मात्र, त्याबरोबरच शरीराचा तोल सांभाळण्याचे महत्वाचे कार्य कानामार्फत केले जाते.
 • त्वचा हे स्पर्शाचे इंद्रिय असून शरीराचे तापमान नियंत्रित करणे हे त्याचे महत्वाचे कार्य आहे. त्वचेच्या वरील थरामधून मेलॅनिन नावाचा द्रव स्त्रवत असतो, जो अतिनील किरणांना अपारदर्शी असतो. त्यामुळे त्वचेचा कँसर होण्याचे टळते.
 • जिभेला पाच प्रक्रारच्या चवी कळतात. गोड, खारट, आंबट, कडू व तुरट. तिखट ही खरी चव नसून तो केवळ प्रतिसाद असतो.
 • जिभेच्या शेंडयावर गॉड चवीचे आकलन होते. तर, जिभेच्या सर्वात आतील भागावर कडू चवीचे आकलन होत असते.
 • जिभेचे व नाकाचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी जस्त या खनिजक्षाराची आवश्यकता असते.
 • मानवी दृष्टी त्रिमितीय असल्याने त्यास वस्तूच्या लांबी, रुंदी व उंचीचे योग्य ज्ञान होते.
 • मानवी शरीर कमी केसाळ असल्याने त्वचेतून उष्णतेचा ऱ्हास जलद होतो.
 • मानवाचे वासाचे ज्ञान कुत्रा, मांजर, हरीण यांच्या तुलनेने फारच कमी आहे. तसेच नाकातील चेतांची टोके बराच काळ एकाच वासाची संवेदना ग्रहण करीत राहिल्यास त्या विशिष्ट वासासाठी ती बधिर होतात.
 • मानवी डोळ्यांना विधुतचुंबकीय किरणांचा फारच थोडा भाग दिसू शकतो. मानव अतिनील किरण बघू शकत नाही. मात्र फलमाशी सारखे कीटक ते बघू शकतात.
 • पीट वायपर जातीचा साप इन्फ्रारेड किरण बघू शकतो, म्हणूनच तो गडद अंधारातही उंदरासारखे भक्ष्य टिपू शकतो.
 • मानवी डोळ्यातील दृष्टिपटलात फारच कमी दंडपेशी असल्याने त्याची रात्रीची दृष्टी कमकुवत आहे. मांजर, हरीण, घुबड यांसारख्या अनेक प्राण्याच्या डोळ्यात मात्र मोठया प्रमाणात दंडपेशी असल्याने त्यांची रात्रीची दृष्टी चांगली असते.
 • ससा, घोडा, गुरे ही आवाजाच्या दिशेने त्यांचा बाह्यकर्ण वळवू शकतात, मात्र मानव आपला बाह्यकर्ण हलवू शकत नसल्याने त्याला कमी ध्वनिलहरी संकलित करता येतात.

 

 

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *