३१ मे दिनविशेष - 31 May in History
३१ मे दिनविशेष - 31 May in History

हे पृष्ठ 31 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 31st May. The students can refer them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.
जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.

जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.

स्वातंत्र्य दिन : दक्षिण आफ्रिका.

 

महत्त्वाच्या घटना:

चंगीझ खान
चंगीझ खान

१२२३: कालका नदीची लढाई : चंगीझ खान व पूर्व स्लाव्हिक सैन्यांमध्ये चकमक. मोंगोल सैन्याचा विजय.

१७२७: फ्रान्स, ब्रिटन आणि नेदरलँड्स या देशांनी पॅरिस करारावर स्वाक्षरी केल्या.

१७५९: अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया प्रांतात नाटकांवर बंदी.

१७७४: ब्रिटीश कालीन भारतात पहिल्या पोस्ट सेवा कार्यलयाची स्थापना करण्यात आली.

१७९०: अमेरिकेत १७९०चा कॉपीराईट कायदा लागू.

१८६७: मुंबई इथे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली.

१९१०: दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य.

१९१३: अमेरिकेच्या संविधानातील १३वा बदल संमत.

१९२१: अमेरिकेतील तल्सा शहरात वांशिक दंगे. ३९हून अधिक ठार.

१९२१: आधुनिक गुजराथीतील प्रसिद्ध कवी सुरेश हरिप्रसाद जोशी यांचा जन्म.

१९२४: सोवियेत संघाने बाह्य मोंगोलियावरील चीनचे आधिपत्य मान्य केले.

१९२७: फोर्ड मोटर कंपनीची मॉडेल टी प्रकारची शेवटची कार तयार झाली. या प्रकारच्या एकूण १,५०,०७,००३ कार तयार केल्या गेल्या.

१९३५: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्‍वेट्टा येथे झालेल्या ७.७ रिच्टर तीव्रतेच्या भूकंपात ५६,००० लोक ठार झाले.

१९४२: दुसरे महायुद्ध : जपानच्या पाणबुड्यांनी सिडनीवर हल्ला केला.

१९४२: दुसरे महायुद्ध : लुफ्तवाफेने इंग्लंडमधील कोव्हेन्ट्री गावावर बॉम्बफेक केली.

१९५२: जनरल ड्वाइट डी. आयझेनहॉवर अमेरिकन सैन्यातून निवृत्त.

१९५२: संगीत नाटक अकादमी ची स्थापना.

१९६१: दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक झाले.

१९६२: वेस्ट ईंडीझ संघाचे विघटन.

१९७०: पेरू मध्ये भूकंप. डोंगर कोसळून युंगे गाव नष्ट. ४७,००० ठार.

१९७४: यॉम किप्पुर युद्ध इस्रायेल व सिरीयामध्ये तह.

१९९०: नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर.

१९९२: प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दवे यांना १९९१ चा कबीर सन्मान मध्य प्रदेश सरकारकडून जाहीर.

२००५: वॉटरगेट कुभांड : डब्ल्यु. मार्क फेल्टने आपणच डीप थ्रोट नावाने ओळखला जाणारा गुप्त बातमीदार असल्याचे कबूल केले.

२०१०: भारतात मान्यता मिळालेल्या प्रत्येक खासगी शाळेत गरीब मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा कायदा करण्यात आला होता.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

पंकज रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू.
पंकज रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१४६९: मनुएल पहिला, पोर्तुगालचा राजा.

१५५७: फियोदोर पहिला, रशियाचा झार.

१५७७: मुघल शासक बादशाहा जहांगीर यांच्या पत्नी नूरजहाँ यांचा जन्मदिन.

१६४०: मिकाल विस्नियोवीकी, पोलंडचा राजा.

१६८३: सेल्सियस थर्मामीटरचे शोध लावणारे जीन पियरे क्रिस्टिन यांचे जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १७५५)

१७२५: महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १७९५)

१८४३: भारतातील प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी नाटककार बळवंत पांडुरंग किर्लोस्कर उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्मदिन.

१८५२: फ्रान्सिस्को मोरेनो, आर्जेन्टिनाचा शोधक.

१९१०: बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर २००१)

१९२३: रैनिये तिसरा, मोनॅकोचा राजा.

१९२८: पंकज रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९३०: क्लिंट ईस्टवूड, अमेरिकन अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.

१९३१: जॉन रॉबर्ट श्रीफर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

१९३५: जिम बॉल्जर, न्यू झीलँडचा पंतप्रधान.

१९३८: जॉन प्रेस्कॉट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१९४३: ज्यो नेमथ, अमेरिकन ‘फूटबॉल’पटू.

१९६६: रोशन महानामा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

४५५  ई .पुर्व: रोमन सम्राट पेट्रोनस मॅक्झिमस याला संतप्त जमावाने दगडांनी ठेचून ठार केले.

भाऊ दाजी लाड(रामकृष्ण विठ्ठल लाड), प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक.
भाऊ दाजी लाड(रामकृष्ण विठ्ठल लाड), प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक.

१४०८: आशिकागा योशिमित्सु, जपानी शोगन.

१४१०: मार्टिन पहिला, अरागॉनचा राजा.

१७४०: फ्रीडरीक पहिला, प्रशियाचा राजा.

१७९९: पिएर लेमॉनिये, फ्रेंच अंतरिक्षशास्त्रज्ञ.

१८७४: प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १८२२ – मांजरे, पेडणे, गोवा)

१९८८: प्रसिद्ध भारतीय समाजसुधारक व हिंदी भाषिक लेखक संतराम बी. ए. यांचे निधन.

१९८८: भारतीय राष्ट्रीय पक्षाचे राजकारणी व मध्यप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री व लेखक पं. द्वारका प्रसाद मिश्रा यांचे निधन.

१९१०: वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचे निधन. (जन्म: ३ फेब्रुवारी १८२१)

सुभाष गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू
सुभाष गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू

१९६२: एडॉल्फ आइकमन, नाझी अधिकारी.

१९७३: कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९०२ – गुंटकल, अनंतपूर, आंध्र प्रदेश)

१९९४: बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९२१ – वाराणसी)

२००२: सुभाष गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू, लेग स्पिनर गोलंदाज, त्रिनिदाद येथे.

२००३: प्रतिभासंपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १९१४)

२००९: केरळ साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय इंग्रजी भाषिक कवी तसचं, भारतातील केरळ राज्यातील मल्याळम भाषिक लेखिका कमला दास यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Join the Conversation

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *