१३ ऑगस्ट दिनविशेष - 13 August in History
१३ ऑगस्ट दिनविशेष - 13 August in History

हे पृष्ठ 13 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १३ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 13 August. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन (International Lefthanders Day)

महत्त्वाच्या घटना:

डॉ. विनायक कृष्ण गोकाक
डॉ. विनायक कृष्ण गोकाक

१६४२: क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.

१८९८: कार्ल गुस्ताव्ह विट याने 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.

१९१८: बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.

१९५४: रेडिओ पाकिस्तान वरुन ’कौमी तराना’ हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले.

१९६१: आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनची भिंत बांधण्यास सुरूवात झाली.

१९९१: कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

२००४: ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे ३०० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे ४ अब्ज लोकांनी हा उद्‍घाटन सोहळा पाहिला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

संदीपन चंदा
संदीपन चंदा

१८८८: जॉन लोगे बेअर्ड – स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक (मृत्यू: १४ जून १९४६)

१८९०: त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा ’बालकवी’ – १९०७ साली जळगाव येथे भरलेल्या पहिल्या कविसंमेलनात वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी केलेल्या कवितावाचनाने प्रभावित होऊन संमेलनाचे अध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना ’बालकवी’ ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. (मृत्यू: ५ मे १९१८)

१८९८: प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे – लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते (मृत्यू: १३ जून १९६९)

१८९९: सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक (मृत्यू: २९ एप्रिल १९८०)

१९०६: विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक (मृत्यू: ३० आक्टोबर १९९८)

१९२६: फिडेल कॅस्ट्रो – क्यूबाचे १५ वे राष्ट्राध्यक्ष

१९३६: वैजयंतीमाला बाली ऊर्फ ’वैजयंतीमाला ’ – चित्रपट अभिनेत्री

१९४५: भारतीय-इंग्लिश क्रिकेटर रॉबिन जॅकमन यांचा जन्म.

१९८३: संदीपन चंदा – भारताचा ९ वा ग्रँडमास्टर

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

गजानन जागीरदार
गजानन जागीरदार

१७९५: महाराणी अहिल्याबाई होळकर – देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. (जन्म: ३१ मे १७२५)

१८२६: स्टेथोस्कोप चे शोधक रेने लायेनेस्क यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १७८१)

१९१०: आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्‍या ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म. १९०७ मधे त्यांना ’ऑर्डर ऑफ मेरिट’ हा किताब बहाल करण्यात आला. ’नोटस ऑफ नर्सिंग’ हा त्यांचा ग्रंथ नावाजलेला आहे. (जन्म: १२ मे १८२०)

१९१७: एडवर्ड बकनर – आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९०७) मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: २० मे १८६०)

मॅडम भिकाजी रुस्तुम कामा
मॅडम भिकाजी रुस्तुम कामा

१९३६: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा – या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. १९०७ मधे जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून ’वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला. (जन्म: २४ सप्टेंबर १८६१)

१९४६: एच. जी. वेल्स – विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक (जन्म: २१ सप्टेंबर १८६६)

१९८०: पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक (जन्म: १२ एप्रिल १९१०)

१९८५: जे. विलार्ड मेरिऑट – मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक (जन्म: १७ सप्टेंबर १९००)

१९८८: गजानन जागीरदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे (FTII) पहिले संचालक

२०००: नाझिया हसन – पाकिस्तानी पॉप गायिका (जन्म: ३ एप्रिल १९६५)

२०१५: हिरो सायकल चे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १९२८)

२०१६: भारतीय हिंदू नेते प्रमुख स्वामी महाराज यांचे निधन. (जन्म: ७ डिसेंबर १९२१)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *