१३ जून दिनविशेष - 13 June in History
१३ जून दिनविशेष - 13 June in History

हे पृष्ठ 13 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही 13 जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 13th June. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

बालमजुरी विरुद्ध जागतिक दिवस

बालमजुरी विरुद्ध जागतिक दिवस

महत्त्वाच्या घटना:

१४२०: जलालुद्दीन फिरोजशाह तुघलक दिल्लीच्या गादीवर विराजमान झाले.

१७३१: स्वीडिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली.

१८८१: यू. एस. एस. जीनेट आर्क्टिक समुद्रात नष्ट.

१८८६: कॅनडातील व्हॅनकूवर शहर आगीत बेचिराख.

१९२७: अमेरिकन ध्वज अमेरिकेत पहिल्यांदा सस्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या उजव्या हाताने प्रदर्शित केला गेला.

१९३४: अ‍ॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची इटलीतील व्हेनिस येथे भेट झाली.

१९४०: जालियान वाला बाग हत्याकांडाला कारणीभूत असलेले गव्हर्नर माईकल ओडवायर यांची हत्या करणारे भारतीय स्वातंत्र्यसेनानी उधमसिंग यांना लंडन मध्ये फाशी देण्यात आली.

१९४३: नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनीवरून टोकियो येथे पोहचले.

१९५६: पहिली युरोपियन चॅम्पियन कप फूटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.

१९७८: इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधुन माघार घेतली.

अ‍ॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची इटलीतील व्हेनिस येथे भेट झाली
अ‍ॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची इटलीतील व्हेनिस येथे भेट झाली

१९८३: पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.

१९९७: दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्यूमुखी पडले तर सुमारे १०० जण जखमी झाले.

२०००: स्पेनमधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुध्द खेळतांना ग्रॅडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला, तर तीन लढती अनिर्णित राखण्यात यश मिळविले. या लढती तीन तास सुरु होत्या.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८२२: जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८९४)

१८३१: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ जेम्सक्लार्क मॅक्सवेल यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर १८७९ – केम्ब्रिज, यु. के.)

गणेश दामोदर सावरकर
गणेश दामोदर सावरकर

१८७९कट्टर हिंदुत्त्ववादी आणि अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९४५)

१९०५: इंग्लंडचे क्रिकेटपटू कुमार श्री दुलीपसिंहजी यांचा जन्म., यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५९ – मुंबई)

१९०९: केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९९८)

१९२३: गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे २००१ – मुंबई)

१९३७: द इंडिपेंडंट चे सहसंस्थापक आंद्रेस व्हिटॅम स्मिथ यांचा जन्म.

१९४४: कोरियन राजकारणी व मुत्सद्दी तसचं, संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस बान की मून यांचा जन्मदिन.

१९६५: भारतीय क्रिकेटपटू मनिंदर सिंग यांचा जन्म.

१९८०: भारतीय साहित्यिक, कादंबरीकार, लघुकथा लेखक, पटकथा लेखक आणि समाजशास्त्रज्ञ इंदू मेनन यांचा जन्मदिन.

१९८८: प्रख्यात जागतिक अजिंक्यपद स्पर्धा पदक विजेता पहिली भारतीय आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पटू महिला श्वेता राठोरे यांचा जन्मदिन.

१९९४: पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय तिरंदाज खेळाडू दीपिका कुमारी यांचा जन्मदिन.

विनायक पांडुरंग करमरकर, प्रसिद्ध शिल्पकार
विनायक पांडुरंग करमरकर, प्रसिद्ध शिल्पकार

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९५०: भारतीय राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ दिवाण बहादूर सर गोपाठी यांचे निधन.

१९६१: के. एम. कृष्णन, भौतिकशास्त्रज्ञ.

१९६७भारतीय शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १८९१)

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

१९६९: विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी केशवकुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १८९८)

१९८०: दादू इंदुरीकर, वगसम्राट.

१९९०: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या पत्नी व पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेगम राणा लियाकत अली खान यांचे निधन.

१९९६: प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक व शास्त्रीय संगीताच्या किराणा घराण्याचे प्रशिक्षक पंडित प्राण नाथ यांचे निधन

२००८: भारतीय कामगार नेते, राजकारणी तसचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेता जे. चितरंजन यांचे निधन

२०१२: पाकिस्तानी गझल गायक मेहंदी हसन यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९२७)

२०१३: ड्यूईश इंक. कंपनी चे संस्थापक डेव्हिड ड्यूईश यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *