हे पृष्ठ 12 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.
या पृष्ठावर, आम्ही 12 जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.
On this page, we will list all historical events that occurred on 12th June. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.
जागतिक दिवस:
- बालकामगार विरोधी दिन (Anti-Child Labor Day)
- फिलिपाइन्सचा स्वातंत्र्य दिन
- आंतरराष्ट्रीय cachaça दिवस: cachaça नावाचे ब्राझिलियन-निर्मित पेय साजरा केला जातो. (International cachaça Day)
महत्त्वाच्या घटना:
१८१२: फ्रांस शासक नेपोलियन बोनापार्ट(Napoleon Bonaparte) यांनी रशियावर आक्रमण केले.
१८९६: जे.टी. हर्न प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारा पहिला खेळाडू झाला.
१८९८: फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
१९०५: नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.
१९१३: जॉन ब्रे या अमेरिकन माणसाने जगातील पहिली कार्टून फिल्म बनवली.
१९४०: दुसरे महायुद्ध – १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.
१९४२: अॅन फ्रॅंक यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.
१९४४: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.
१९६४: वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
१९७५: अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधीची निवडणूक रद्द ठरवली व त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली. या निर्णयामुळे इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली.
१९९३: पृथ्वी क्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी
१९९६: भारतीय पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिध्द केले.
१९९८: भारत व पाकिस्तान देशांनी आपआपल्या देशांत केलेल्या आण्विक चाचण्यांमुळे जी-८ च्या सदस्य देशांनी या देशांना कर्ज न देण्याचा निर्णय घेतला.
२००१: कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील ‘वूमन ग्रॅंडमास्टर’ बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.
२००२: जागतिक बालकामगार विरोधी दिनाला सुरुवात झाली.
२००७: साली कॅनडा देशांत होणाऱ्या जीव विज्ञान ऑलम्पियाड स्पर्धेत चार भारतीय विद्यार्ध्यांची नियुक्ती करण्यात आली.
२०१६: प्रसिद्ध भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी ऑस्ट्रेलिया देशांतील सिडनी या ठिकाणी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेचे विजेते पद पटकाविले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
४९९: आर्यभट्ट – भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: ? ? ५५०)
१८९४: बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम विश्वनाथ बापट यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९१)
१९१५: प्रसिद्ध भारतीय कन्नड लेखक, नाटककार, रंगमंच कलाकार, दिग्दर्शक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सी. के. नागराजा यांचा जन्मदिन.
१९१७: भालचंद्र दत्तात्रय खेर, मराठी लेखक
१९१९: हिंदू धर्मीय समर्थक व सनातन धर्मवादी नथुराम गोडसे यांचे छोटे बंधू गोपाल विनायक गोडसे यांचा जन्मदिन.
१९२२: मार्गेरिटा हॅक (इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि लोकप्रिय विज्ञान लेखिका, मृत्यू: २९ जून २०१३).
१९२४: जॉर्ज बुश, अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष.
१९२९: अॅन फ्रँक – जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी (मृत्यू: ?? मार्च १९४५)
१९५७: जावेद मियाँदाद – पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू व प्रशिक्षक
१९६६: ए. एफ. सी प्रो डिप्लोमा प्राप्त योग्य फुटबॉल प्रशिक्षक तसचं, ऐझवल एफ.सी. चे मुख्य प्रशिक्षक संतोष कश्यप यांचा जन्मदिन.
१९७२: लोकप्रिय महाराष्ट्रीयन मराठी हास्य विनोदी रंगमंच कलाकार व चित्रपट अभिनेता भालचंद्र कदम यांचा जन्मदिन.
१९८५: मोझीला फायरफॉक्स चे सहसंस्थापक ब्लॅक रॉस यांचा जन्म.
१९८५: पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट भारतीय हॉकी खेळाडू सबा अंजुम करीम यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९१२: फ्रेडरिक पासी – फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (जन्म: २० मे १८२२)
१९६४: मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८९२ – इस्लामपूर, सांगली)
१९७२: महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित आठ खंडांच्या ग्रंथाचे लिखाण करणारे महान लेखक डी.जी. तेंडूलकर यांचे निधन.
१९७५: दुर्गाप्रसाद धर, स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी व नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष.
१९७६: पद्मविभूषण पुरस्कार तसेच, संस्कृत साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय संस्कृत-तंत्र अभ्यासक, भारतीय शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ गोपीनाथ कविराज यांचे निधन.
१९७८: चिनी भाषेमधील कवी, लेखक आणि इतिहासकार गुओ मोरुओ यांचे निधन.
१९८१: प्र. बा. गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश (जन्म: १६ मार्च १९०१)
१९८३: नॉर्मा शिअरर – कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री (जन्म: १० ऑगस्ट १९०२)
२०००: मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेता पु.ल. देशपांडे यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)
२००१: शकुंतला बोरगावकर, विनोदी लेखिका.
२००३: ग्रेगरी पेक – हॉलीवूड अभिनेता (जन्म: ५ एप्रिल १९१६)
२०१५: भारतीय मूर्तिकार नेकचंद सैनी यांचे निधन. (पद्मश्री पुरस्कार सन्मानित चंडीगड येथील प्रसिद्ध रॉक गार्डनचे निर्माता व रचनाकार) (जन्म: १५ डिसेंबर १९२४)
२०१७: साली भारतीय साहित्यीय क्षेत्रांतील सर्वोत्कृष्ट नोबल पुरस्कार म्हणून समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेता तसचं, पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय तेलगु भाषिक लेखक व कवी सी. नारायणा रेड्डी यांचे निधन.
२०२०: पारसनाथ यादव (भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेत ७ वेळा आमदार, जन्म: १२ जानेवारी १९४९).
२०२०: आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलावी (उर्दू कवी, अभ्यासक आणि पत्रकार, जन्म: ७ जुलै १९२६).