७ जुलै दिनविशेष - 7 July in History
७ जुलै दिनविशेष - 7 July in History

हे पृष्ठ 7 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ७ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 7 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • World Chocolate Day
  • World Forgiveness Day

महत्त्वाच्या घटना:

१४५६: मृत्यूच्या २५ वर्षांनंतर जोन ऑफ आर्कला निर्दोष ठरवले.

बोरिस बेकर
बोरिस बेकर

१५४३: फ्रेन्च सैन्याने लक्झेंबर्गचा ताबा घेतला.

१७६३: बंगालचे नवाब मीर जाफर यांना पुन्हा बंगालच्या गादीवर बसविण्यात आलं.

१७९९: रणजितसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.

१८५४: कावसजी नानाभॉय दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली. मुंबई ही कापड उद्योगाची राजधानी असली तरी भारतातील पहिली कापडगिरणी मात्र भडोच येथे तर महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी नागपूरला सुरू झाली होती.

१८५४: बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिल स्थापना.

१८९६: मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमधे ऑगस्ते व लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.

१८९८: हवाई बेटांनी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले. मात्र, त्यांना अमेरिकेचे राज्य हा दर्जा मिळण्यासाठी पुढे ६० वर्षे वाट पाहावी लागली.

कावसजी नानाभॉय दावर
कावसजी नानाभॉय दावर

१९१०: इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे आणि खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली.

१९४१: दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याचे आइसलँडमधे आगमन झाले.

१९४८: दामोदर घाटी निगम ची स्थापना करण्यात आली.

१९४८: स्वतंत्र भारतातील पहिली बहुउद्देशीय परियोजना सुरु झाली.

१९७८: सॉलोमन बेटांना (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.

१९८५: विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.

१९९८: इन्डिपेन्डन्स चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्सच्या एकदिवसीय सामन्यातील १७ शतकांची बरोबरी केली. तसेच एकदिवसीय सामन्यातील ७००० धावांचा टप्पा पार केला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

पद्मा चव्हाण
पद्मा चव्हाण

१०५३: शिराकावा – जपानी सम्राट (मृत्यू: २४ जुलै ११२९)

१६५६: शीख धर्माचे आठवे गुरु गुरू हर क्रिशन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १६६४)

१८४८: ब्राझीलचा राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस यांचा जन्म.

१७५२: जोसेफ मॅरी जाकॉर्ड – जॅक्वार्ड लूमचे शोधक (निधन: ७ ऑगस्ट १९३४)

१८५४: पॅन-इस्लामिक चळवळीचे कार्यकर्ता व भारतीय क्रांतिकारक अब्दुल हाफिज मोहम्मद बराकतउल्ला यांचा जन्मदिन.

१८८३: प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार व भारतीय हिंदी, संस्कृत, प्राकृत आणि पाली भाषेचे लेखक व अभ्यासक चंद्र्धर शर्मा गुलेरी यांचा जन्मदिन.

१९००: भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि दक्षिण भारतातील राजकारणी काला वेंकट राव यांचा जन्मदिन.

१९१४: अनिल बिस्वास – प्रतिभासंपन्न संगीतकार (मृत्यू: ३१ मे २००३)

स्वरचंद्रिका’ पद्मजा फेणाणी
स्वरचंद्रिका’ पद्मजा फेणाणी

१९२३: प्रा. लक्ष्मण गणेश जोग – कथाकार, कादंबरीकार, समीक्षक (मृत्यू: ? ? ????)

१९२६: आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलावी – उर्दू कवी, अभ्यासक आणि पत्रकार (निधन: १२ जून २०२०)

१९३४: भारतीय राजकारणी व मध्यप्रदेश राज्याचे विधानसभा सदस्य राघवजी यांचा जन्मदिन

१९३८: भारतीय चित्रपट, दूरदर्शन मालिका व रंगमंच नायिका पदमा चव्हाण यांचा जन्मदिन.

१९४७: राजे ग्यानेंद्र – नेपाळ नरेश

१९४८: पद्मा चव्हाण – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री, स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना म्हणून ख्याती असलेल्या पद्मा चव्हाणांच्या नाटकांच्या जाहिरातींत त्यांच्या नावाआधी ‘मादक सौंदर्याचा अ‍ॅटम बॉम्ब’ असे छापले जात असे. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९६)

महेंद्रसिंग धोणी
महेंद्रसिंग धोणी

१९६२: ’स्वरचंद्रिका’ पद्मजा फेणाणी

१९७०: भारतीय क्रिकेटपटू मिस्टर पटेल यांचा जन्म.

१९७३: भारतीय गायक-गीतकार आणि दिग्दर्शक कैलाश खेर यांचा जन्म.

१९८१: भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

सर आर्थर कॉनन डॉइल
सर आर्थर कॉनन डॉइल

१३०७: एडवर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा (जन्म: १७ जून १२३९)

१५७२: पोलंडचा राजा सिगिस्मंड दुसरा ऑस्टस यांचे निधन.

१९३०: सर आर्थर कॉनन डॉइल – स्कॉटिश डॉक्टर व ’शेरलॉक होम्स’ या गुप्तहेरकथांचे लेखक (जन्म: २२ मे १८५९)

१९६५: इस्रायलचे दुसरे पंतप्रधान मोशे शॅरेट यांचे निधन.

१९८२: भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक बॉन महाराजा यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९०१)

१९९९: भारतातील सर्वोच्च शौर्य पराक्रम पुरस्कार परमवीर चक्र पुरस्कार सन्मानित माजी भारतीय सैन्य दल अधिकारी कॅप्टन विक्रम बत्रा यांचे निधन.

१९९९: भारतीय क्रिकेट खेळाडू एम. एल. जयसिंहा यांचे निधन.

२००७: प्रसिद्ध ब्रिटीश सैन्य अधिकारी मेजर आयन मेलविले कॅल्व्होकॉरेसी(Major Ion Melville Calvocoressi) यांचे निधन.

२०११: भारतीय हिंदी आणि मराठी चित्रपट व दूरदर्शन मालिका कलाकार रसिका जोशी यांचे निधन.

२०२१: प्रसिध्द अभिनेते दिलीप कुमार यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *