जेनिफर लोपेझ
जेनिफर लोपेझ

हे पृष्ठ 24 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २४ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 24 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१५६७: स्कॉटलंडची राणी मेरी पदच्युत झाल्यामुळे १ वर्षाचा जेम्स (सहावा) स्कॉटलंडच्या राजेपदी विराजमान झाला.

लान्स आर्मस्ट्राँग
लान्स आर्मस्ट्राँग

१७०४: ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला, जो आजपर्यंत सोडलेला नाही.

१८२३: चिलीमधे गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.

१८७०: अमेरिकेमध्ये देशांतर्गत रेल्वे सेवा सुरु करण्यात आली.

१९३१: पिटसबर्ग, पेनसिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागुन ४८ लोक मृत्यूमुखी पडले.

१९३२: रामकृष्ण मिशन मठाची स्थापना करण्यात आली.

१९४३: दुसरे महायुद्ध – ऑपरेशन गोमोरा – दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले. हे हल्ले पुढील आठ दिवस सुरू होते. या हल्ल्यांना हॅम्बर्गचे हिरोशिमा असे म्हणण्यात येते.

१९६९: सफल मानवी चांद्रमोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.

१९७४: वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिर्चड निक्सनने स्वत:विरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.

१९९०: इराकने कुवेतच्या सीमेजवळ सैन्याची जमवाजमव करण्यास सुरूवात केली.

१९९१: अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा? अर्थसंकल्प संसदेत सादर केला.

१९९७: ख्यातनाम बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना पत्रकारिता, साहित्य व कला या क्षेत्रातील कामगिरीसाठी ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर

१९९७: माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सर्वोच्‍च नागरी सन्मान भारतरत्‍न प्रदान

१९९८: परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय

२०००: विप्रो आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेत चेन्नईच्या विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम हिने भारताच्याच पी. हरिकृष्णला बरोबरीत रोखल्यामुळे तिला अर्धा गुण मिळाला त्यामुळे तिच्या ग्रँडमास्टर या किताबावर शिक्‍कामोर्तब झाले व ती भारताची पहिला महिला ग्रॅंडमास्टर बनली.

२००१: जपानमधील टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत भारताच्या शिखा टंडनने फ्रीस्टाईल प्रकारात १०० मीटर अंतर ५९.९६ सेकंदात पार केले. ही शर्यत एक मिनिटापेक्षा कमी वेळात पूर्ण करणारी ती भारताची सर्वात लहान खेळाडू आहे.

२००४: इटली देशाने भारतीय पर्यटकांसाठी सात नवीन वीजा कॉल सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला.

२००५: लान्स आर्मस्ट्राँगने ’टूर-डी-फ्रान्स’ ही सायकल शर्यत सलग सातव्यांदा जिंकली.

रिर्चड निक्सन
रिर्चड निक्सन

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१७८६: फ्रेंच गणितज्ञ संशोधक जोसेफ निकोलेट यांचा जन्म.

१८०२: फ्रेंच लेखक अलेक्झांड्रे ड्युमास(Alexandre Dumas) यांचा जन्मदिन.

१८५१: जर्मन गणितज्ञ फ्रेडरिक शॉटकी यांचा जन्म.

१९११: गोविंदभाई श्रॉफ – हैदराबाद मुक्तिसंग्रामातील झुंजार स्वातंत्र्य सेनानी (मृत्यू: ? ? ????)

१९११: अमल ज्योती तथा ’पन्‍नालाल’ घोष – बासरीवादक व संगीतकार (मृत्यू: २० एप्रिल १९६०)

१९२४: प्रसिद्ध भारतीय गजल गायक व उर्दू शायर(कवी) नाज़िश प्रतापगढ़ी यांचा जन्मदिन.

१९२८: केशुभाई पटेल – गुजरातचे मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य

१९३७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक मनोज कुमार यांचा जन्म.

अझीम प्रेमजी
अझीम प्रेमजी

१९४५: अझीम प्रेमजी – दानशूर व्यक्ति आणि ’विप्रो’ (WIPRO) चे चेअरमन

१९४७: जहीर अब्बास – पाकिस्तानी फलंदाज

१९६९: जेनिफर लोपेझ – अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका

१९८५: पद्मश्री, पद्मभूषण, राजीव गांधी खेलरत्न, पुरस्कार विजेता उत्कृष्ट भारतीय बिलियर्ड्स आणि स्नूकर खेळाडू पंकज अडवाणी यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

अरुण कुमार चटर्जी तथा ’उत्तम कुमार
अरुण कुमार चटर्जी तथा ’उत्तम कुमार

११२९: शिराकावा – जपानी सम्राट (जन्म: ७ जुलै १०५३)

१९७०: भारतीय उद्योगपती पीटर दि नरोन्हा यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १८९७)

१९७४: सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (जन्म: २० आक्टोबर १८९१)

१९८०: अरुण कुमार चटर्जी तथा ’उत्तम कुमार’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते (जन्म: ३ सप्टेंबर १९२७)

१९८०: पीटर सेलर्स – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक (जन्म: ८ सप्टेंबर १९२५)

२०१२: सीटी स्कॅन चे शोधक रॉबर्ट लिडले यांचे निधन. (जन्म: २८ जुन १९२६)

२०१८: माजी ब्रिटीश अष्टपैलू क्रिकेटपटू जॉन मुरै (John Murray) यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *