२८ जून दिनविशेष - 28 June in History
२८ जून दिनविशेष - 28 June in History

हे पृष्ठ 28 जून रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही २८ जून रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 28 June. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

इव्हान्डर होलिफिल्ड
इव्हान्डर होलिफिल्ड

१८३८: इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक झाला.

१८४६: अ‍ॅडॉल्फ सॅक्स याने पॅरिस, फ्रान्समधे ’सॅक्सोफोन’ या वाद्याचे पेटंट घेतले.

१९२६: गोटलिब डेमलर आणि कार्ल बेन्झ यांनी त्यांच्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण करून मर्सिडीज-बेंझची स्थापना केली.

१९७२: दुसर्‍या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ

१९७८: अमेरिकेतील सर्वोच्‍व न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.

१९८१: चीनने कैलाश मानसरोवर यात्रा करण्यासाठी सडक मार्ग उघडला.

१९८६: अविवाहित मुलींनाही प्रसूती रजा देण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला.

१९९४: विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी एकाच सामन्यात चार गोल करण्याची कामगिरी नऊ खेळाडूंनी केली होती.

१९९५: वाघांना शिकाऱ्यांपासून वाघांचा बचाव करण्यासाठी व त्यांना आश्रय देण्यासाठी मध्यप्रदेश राज्याला ‘टायगर्स स्टेट’ म्हणून घोषित करण्यात आलं.

१९९७: मुष्टियुद्धात इव्हान्डर होलिफिल्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माईक टायसनला निलंबित करुन होलिफिल्डला विजेता घोषित करण्यात आले.

१९९८: संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍कविषय्क सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्‍नास वर्षे पूर्ण झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

ओलेम सेलेन्को
ओलेम सेलेन्को

१४९१: हेन्‍री (आठवा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २८ जानेवारी १५४७)

१७१२: रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार (मृत्यू: २ जुलै १७७८)

१८८३: साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते आणि महात्मा गांधी काशी विद्यापीठाचे संस्थापक तसचं, हिंदी वृत्तपत्र “दैनिक आज” चे संस्थापक शिवप्रसाद गुप्त यांचा जन्मदिन.

१९२१: नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री (मृत्यू: २३ डिसेंबर २००४)

नरसिंह राव
नरसिंह राव

१९२८: बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०००)

१९३४: रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे वादग्रस्त कसोटीपटू (मृत्यू: १८ जुलै २००१)

१९३७: डॉ. गंगाधर पानतावणे – साहित्यिक व समीक्षक

डॉ. गंगाधर पानतावणे – साहित्यिक व समीक्षक
डॉ. गंगाधर पानतावणे – साहित्यिक व समीक्षक

१९७०: मुश्ताक अहमद – पाकिस्तानी क्रिकेटपटू व प्रशिक्षक

१९७६: पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित उत्कृष्ट भारतीय नेमबाज जसपाल राणा यांचा जन्मदिन.

१९९५: पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय पॅरालंपिक उंच उडी खेळाडू मरियप्पन थान्गावेलु यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१८३६: जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १६ मार्च १७५१)

१९९०: कवी प्रा. भालचंद खांडेकर यांचे निधन.

पं. गजाननबुवा जोशी
पं. गजाननबुवा जोशी

१९७२: प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक (जन्म: २९ जून १८९३)

१९८७: पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (जन्म: ३० जानेवारी१९११)

१९९९: रामचंद्र विठ्ठल तथा रामभाऊ निसळ – स्वातंत्र्यसैनिकांचे नेते व झुंजार पत्रकार (जन्म: ? ? ????)

२०००: विष्णू महेश्वर ऊर्फ ’व्ही. एम.’ तथा दादासाहेब जोग – उद्योजक (जन्म: ६ एप्रिल १९२७)

२००६: संत साहित्यकार, समीक्षक, वक्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन.

२००७: जपानच्या पूर्व पंतप्रधान कीची मियाजावा (Kichi Miyajwa) यांचे निधन.

२००९: भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक ए. के. लोहितदास यांचे निधन. (जन्म: ६ मे १९५५)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *