हे पृष्ठ 30 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ३० जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 30 January. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • कुष्ठरोग निवारण दिन

महत्त्वाच्या घटना:

तुषार अरूण गांधी
तुषार अरूण गांधी
पण्डित रविशंकर
पण्डित रविशंकर

१९९९: पण्डित रविशंकर यांना ’भारतरत्‍न’

१९९७: महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.

१९९४: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.

१९४८: नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ ’महात्मा’ गांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.

१९३३: अ‍ॅडॉल्फ हिटलरचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष (चॅन्सेलर) म्हणून शपथविधी झाला.

१६४९: इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याचा शिरच्छेद करण्यात आला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

डॉ. सतीश आळेकर
डॉ. सतीश आळेकर

१९४९: डॉ. सतीश आळेकर – नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते, ’थिएटर अ‍ॅकॅडमी’चे एक संस्

सी. सुब्रम्हण्यम
सी. सुब्रम्हण्यम

थापक,’ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे संचालक, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते

१९२९: रमेश देव – हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक

१९२७: ओलोफ पाल्मे – स्वीडनचे २६ वे पंतप्रधान (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९८६)

१९१७: वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ (मृत्यू: २७ जुलै २००७)

१९११: पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (मृत्यू: २८ जून १९८७)

१९१०: सी. सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल (मृत्यू: ७ नोव्हेंबर २०००)

१८८२: फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १२ एप्रिल १९४५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

गोविंदराव पटवर्धन – हार्मोनियम व ऑर्गन वादक
गोविंदराव पटवर्धन – हार्मोनियम व ऑर्गन वादक

२००४: रमेश अणावकर – गीतकार (जन्म: ? ? ????)

२०००: आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर – मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते (जन्म: ? ? ????)

१९९६: गोविंदराव पटवर्धन – हार्मोनियम व ऑर्गन वादक (जन्म: ? ? ????)

१९५१: फर्डिनांड पोर्श – ऑस्ट्रियन वाहन अभियंता (जन्म: ३ सप्टेंबर १८७५)

१९४८: महात्मा गांधी (जन्म: २ आक्टोबर १८६९)

१९४८: ऑर्व्हिल राईट – आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (जन्म: १९ ऑगस्ट १८७१)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.