१६ फेब्रुवारी दिनविशेष - 16 February in History
१६ फेब्रुवारी दिनविशेष - 16 February in History

हे पृष्ठ 16 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that occurred on 16 February. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • लिथुएनियाचा स्वातंत्र्य दिन

महत्त्वाच्या घटना:

१६५९: पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे.

फिडेल कॅस्ट्रो
फिडेल कॅस्ट्रो

१७०४: औरंगजेबाने राजगड जिंकून त्याचे नाव नबीशाहगड असे ठेवले.

१९१८: लिथुएनियाने (रशिया व जर्मनीपासून) स्वातंत्र्य जाहीर केले.

१९५९: फिडेल कॅस्ट्रो क्यूबाच्या अध्यक्षपदी

१९६०: अमेरिकी अणुपाणबुडी ट्रायटन ने पाण्याखालून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास प्रस्थान केले.

१९६९: मिर्झा गालिब यांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्ताने डाक तिकीट जारी केल्या गेले.

१९८५: लेबनॉनमध्ये हिजबोल्ला या कट्टरपंथीय शिया मुस्लिम संघटनेची स्थापना.

१९८२: कोलकत्ता येथे जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.

२००८: प्रसिद्ध गायक नितीन मुकेश यांना मध्य प्रदेश सरकार कडून लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला.

२००८: बिहार च्या नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेचे उद्घाटन करण्यात आले आहेत.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१२२२: जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १२८२)

रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – भारतातील पहिले सिनिअर रँग्लर
रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – भारतातील पहिले सिनिअर रँग्लर

१७४५: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव पेशवे – मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा, १६ व्या वर्षी पेशवेपदावर विराजमान झालेला अत्यंत कर्तबगार पेशवा. पानिपतच्या युध्दानंतर विस्कटलेली मराठेशाहीची घडी त्यांनी बसविली. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १७७२)

१८२२: बोटांचे ठसे, रंगांधळेपणा आणि स्त्रियांच्या सौंदर्यावर संशोधन करणाऱ्या सर फ्रान्सिस गाल्टन यांचा जन्म.

१८७६: रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – भारतातील पहिले सिनिअर रँग्लर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबई राज्याचे शिक्षणमंत्री, भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्‍चायुक्त (मृत्यू: ६ मे १९६६)

वासिम जाफर – भारतीय क्रिकेटपटू
वासिम जाफर – भारतीय क्रिकेटपटू

१९०९: मॅकडोनाल्ड चे सहसंस्थास्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै १९९८)

१९२०: प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता आई.एस. जोहर यांचा जन्म.

१९३७: प्रसिद्ध चित्रकार गुलाम मोहम्मद शेख़ यांचा जन्म.

१९४१: उत्तर कोरिया चे माजी प्रशासक किंम जोंग इल यांचा जन्म.

१९४८: भारतीय चित्रपट कलाकार हैदर अली यांचा जन्म.

१९५४: मायकेल होल्डिंग – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू

१९६१: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध गायक शेखर सेन यांचा जन्म.

१९६४: बेबेटो – ब्राझीलचा फुटबॉलपटू

१९७७: प्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपट अभिनेता दर्शन थुगुडीपा यांचा जन्म.

१९७८: वासिम जाफर – भारतीय क्रिकेटपटू

१९९७: प्रसिद्ध कब्बडी प्लेयर परदीप नरवाल चा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

धुंडिराज गोविंद ऊर्फ ’दादासाहेब’ फाळके
धुंडिराज गोविंद ऊर्फ ’दादासाहेब’ फाळके

१९४४: धुंडिराज गोविंद ऊर्फ ’दादासाहेब’ फाळके – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक, छायाचित्रकार, दिग्दर्शक, संकलक, वेशभूषाकार, कलादिग्दर्शक इ. अनेक जबाबदार्‍या ते सांभाळत असत. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)

१९५६: मेघनाद साहा – खगोलभौतिकशास्त्रज्ञ व संसदसदस्य. तार्‍यांच्या वातावरणाचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करणारा सिद्धांत त्यांनी मांडला. भारताचे स्वत:चे राष्ट्रीय पंचांग त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आले. (जन्म: ६ आक्टोबर १८९३)

बेल्लारी शामण्णा केशवन
बेल्लारी शामण्णा केशवन

१९६८: नारायणराव सोपानराव बोरावके – कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार, पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यांत अनेक संस्था व उद्योग त्यांनी उभे केले. संशोधित फळांच्या उत्पादनास त्यांनी प्रोत्साहन दिले. १९३३ मध्ये त्यांना ’रावसाहेब’ तर १९४६ मध्ये त्यांना ‘रावबहादूर‘ हे किताब मिळाले. शेतीच्या आधुनिकीकरणावर त्यांनी भर दिला. (जन्म: १७ आक्टोबर १८९२)

१९९४: पं. निवृत्तीबुवा सरनाईक – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक (जन्म: ४ जुलै १९१२)

मेघनाद साहा
मेघनाद साहा

१९९६: आर. डी. आगा – उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक (जन्म: ? ? ????)

२०००: बेल्लारी शामण्णा केशवन – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, ’इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर’चे पहिले संचालक

२००१: रंजन साळवी – ‘पिंजरा’, ‘सवाल माझा ऐका’, ‘केला इशारा जाता जाता’ आदी मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक (जन्म: ? ? ????)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *