६ मे दिनविशेष - 6 May in History
६ मे दिनविशेष - 6 May in History

हे पृष्ठ 6 मे रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

On this page, we will list all historical events that occurred on 6th May. The students can refer to them while preparing for all competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

१५२९: घाघरा येथील युद्धात मुघल सम्राट बाबर यांनी बंगाल आणि बिहारच्या शासकांचा पराभव केला.

१५३६: इंग्लंडचे राजा हेनरी अष्टम यांनी प्रत्येक गीरीजाघरात बाईबल हे धार्मिक पुस्तक ठेवण्यास सांगितले.

१५४२: सेंट फ्रान्सिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचला.

१६३२: शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.

१८१८: [वैशाख शु. १ शके १७४०] राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्‍नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली.

१८३५: अमेरिकन वर्तमानपत्र न्यूयॉर्क हेरॉल्ड चे प्रकाशण करण्यास सुरुवात झाली.

१८४०: एक पेनी किमतीचे ’पेनी ब्लॅक’ नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट इंग्लंडमध्ये विक्रीसाठी खुले झाले. हे तिकीट १ मे १८४० रोजी जारी झाले होते.

१८८९: पॅरिसमधील ’आयफेल टॉवर’चे उद्‍घाटन झाले.

१९१०: ब्रिटीश शासक एडवर्ड सप्तम यांच्या निधनानंतर त्यांची गाद्दी त्यांचे पुत्र जॉर्ज पंचम यांनी सांभाळली.

१९४४: पुणे येथील आगा खान पॅलेस मधून महात्मा गांधी यांची सुटका झाली.

१९४९: ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु झाले.

१९५४: रॉजर बॅनिस्टर हे १ मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.

१९८३: अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला.

१९९४: इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस मित्राँ यांच्या हस्ते इंग्लिश खाडीखालुन जाणार्‍या आणि इंग्लंड व फ्रान्स यांना जोडणार्‍या ’युरो टनेल’चे उद्‍घाटन झाले.

१९९७: ’बँक ऑफ इंग्लंड’ला स्वायत्तता देण्यात आली.

१९९९: महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांना तीस टक्‍के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. अस निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.

२००१: पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.

२००२: भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२०१५: सलमान खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपास दोषी ठरवून ५ वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच सलमान खान यांची हायकोर्टात अपील दाखल करून, जामिनावर सुटका.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८५६: सिग्मंड फ्रॉईड – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचा जनक (मृत्यू: २३ सप्टेंबर १९३९)

१८६१: मोतीलाल गंगाधर नेहरू – भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९३१)

१९२०: बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी. रानी – जुन्या पिढीतील संगीतकार व गायक (मृत्यू: २४ मे १९९३ – मुंबई)

१९४०: प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ अबन मिस्त्री यांचा जन्म.

१९४३: लेखिका वीणा चंद्रकांत गावाणकर यांचा जन्म.

१९५१: लीला सॅमसन भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका आणि लेखिका. संगीत नाटक अकादमी आणि फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा

१९५३: टोनी ब्लेअर – ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष

१९६४: अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय जलतरणपटू खजान सिंह यांचा जन्मदिन.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१५८९: रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट तानसेन – अकबराच्या दरबारातील एक नवरत्‍न (जन्म: ? ? १५०६)

१८६२: हेन्‍री थोरो – अमेरिकन लेखक व विचारवंत (जन्म: १२ जुलै १८१७)

१९२२: छत्रपती शाहू महाराज – सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक (जन्म: २६ जून १८७४)

१९४६: भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते, १९३१ मधे ’गांधी-आयर्विन’ कराराप्रमाणे त्यांनी बार्डोलीच्या शेतकर्‍यांची बाजू मांडली. १९३२ मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक वर्षाचा कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली होती. (जन्म: १३ आक्टोबर १८७७)

१९५२: मारिया माँटेसरी – इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ञ. पूर्वप्राथमिक शिक्षणाविषयीच्या त्यांच्या उपक्रमामुळे तशा शाळा ’माँटेसरी’ या नावाने ओळखल्या जातात. (जन्म: ३१ ऑगस्ट १८७०)

१९६६: रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – भारतातील पहिले सिनिअर रँग्लर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबई राज्याचे शिक्षणमंत्री, भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्‍चायुक्त (जन्म: १६ फेब्रुवारी १८७६)

१९९५: आचार्य गोविंदराव गोसावी – प्रवचनकार, संत वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ? ? ????)

१९९९: कृष्णाजी शंकर हिंगवे – पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य (जन्म: ? ? ????)

२००१: विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका मालतीबाई बेडेकर यांचे पुणे येथे निधन.

२००६ जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज टायटनिक च्या दुर्घटनेचे साक्षीदार अमेरिकन नागरिक लिलियन एस्प्लंट यांचे निधन.

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *