मोतीलाल गंगाधर नेहरू
मोतीलाल गंगाधर नेहरू

हे पृष्ठ 6 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 6 February. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

महत्त्वाच्या घटना:

बीना दास
बीना दास

१९५२ : इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन झाले आणि एलिझाबेथ (दुसरी) गादीवर बसली. ती राणी बनल्याची बातमी तिला केनियातील झाडावरच्या एका हॉटेलमधे देण्यात आली.

१९४२ : दुसरे महायुद्ध – इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.

१९३२ : कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या.

१९३२ : ’प्रभात’चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९१८ : ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.

१६८५ : जेम्स (दुसरा) इंग्लंडचा राजा बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप
रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप

१९८३ : श्रीशांत – क्रिकेटपटू, सट्टेबाज व ’फिक्सर’

१९५२ : डॉ. रिक चार्ल्सवर्थ – ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि राजकारणी

१९१५ : रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्‍या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (मृत्यू: ११ डिसेंबर १९९८)

१९११ : रोनाल्ड रेगन – अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ जून २००४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

बॅ. विठ्ठलराव गाडगीळ
बॅ. विठ्ठलराव गाडगीळ

२००१ : बॅ. विठ्ठलराव गाडगीळ – केन्द्रीय नभोवाणी मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते (जन्म: ? ? ????)

१९९३ : आर्थर अ‍ॅश – अमेरिकन टेनिस खेळाडू (जन्म: १० जुलै १९४३)

१९७६ : ऋत्विक घटक – चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक (जन्म: ४ नोव्हेंबर १९२५)

१९५२ : जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा (जन्म: १४ डिसेंबर १८९५)

१९३९ : सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती, बालविवाह, कन्याविक्रय यांना बंदी घालणारे कायदे केले. विधवा विवाहाला संमती दिली. (जन्म: १० मार्च १८६३)

१९३१ : मोतीलाल गंगाधर नेहरू – भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित (जन्म: ६ मे १८६१)

१८०४ : जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ (जन्म: १३ मार्च १७३३)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published.