सुनील मनोहर तथा ’सनी’ गावसकर
सुनील मनोहर तथा ’सनी’ गावसकर

हे पृष्ठ 10 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही १० जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 10 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

  • बहामाचा स्वातंत्र्यदिन

महत्त्वाच्या घटना:

वि. ग. भिडे

२००० : विज्ञानप्रसारासाठीच्या कार्याबद्दल नेहरू तारांगणातर्फे दिला जाणारा ’मनुभाई मेहता पुरस्कार’ शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर

२००० : नायजेरियात एका फुटलेल्या तेलवाहिनीत स्फोट होऊन गळणारे तेल गोळा करण्यासाठी आलेले २५० जण जळुन ठार झाले.

१९९५ : म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता

१९९२ : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘इन्सॅट २ ए’ या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण

१९९२ : आर्वी येथील ’विक्रम इनसॅट भू-केंद्र’ राष्ट्राला अर्पण

मुसोलिनी

१९९२ : मादक द्रव्यांच्या तस्करीबद्दल पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिएगा यांना फ्लोरिडात ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. नंतर ही शिक्षा कमी करुन ३० वर्षांची करण्यात आली.

१९७८ : मॉरिटानियात लष्करी उठाव झाला.

१९७८ : मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.

१९७३ : पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.

१९७३ : बहामाजला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९६२ : ’टेलस्टार-१’ हा पहिला अमेरिकन दळणवळण उपग्रह यशस्वीपणे अंतराळात प्रक्षेपित

१९४७ : ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट अ‍ॅटली यांच्या शिफारशीवरून मुहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.

१९४० : ‘बॅटल् ऑफ ब्रिटन’ या नावाने ओळखले जाणारे हवाईयुध्द सुरू. नाझी जर्मन विमानदलाने इंग्लंडवर प्रचंड मोठया संख्येने विमाने पाठवून बॉबफेक सुरू केली. इंग्लिश हवाईदलाने जर्मनांचा यशस्वी प्रतिकार केला.

१९२५ : अवतार मेहेरबाबा यांनी आपल्या मौनव्रताची सुरूवात केली. हे व्रत त्यांनी सलग ४४ वर्षे त्यांच्या मृत्यूपर्यंत पाळले.

१९२५ : ’तास’ या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना

१९२३ : मुसोलिनीने इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.

१८९० : वायोमिंग अमेरिकेचे ४४ वे राज्य बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

बेगम’ परवीन सुलताना

१९५० : ’बेगम’ परवीन सुलताना – पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका

१९४९ : सुनील मनोहर तथा ’सनी’ गावसकर – क्रिकेटपटू व समालोचक

१९४५ : व्हर्जिनिया वेड – इंग्लिश टेनिस खेळाडू

१९४३ : आर्थर अ‍ॅश – अमेरिकन टेनिस खेळाडू (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९९३)

१९४० : लॉर्ड मेघनाद देसाई – अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या ’हाऊस ऑफ लॉर्डस’चे सभासद

१९२३ : गुरूनाथ आबाजी तथा जी. ए. कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढकथालेखक (मृत्यू: ११ डिसेंबर १९८७)

१९१३ : पद्मा गोळे – कवयित्री (मृत्यू: १२ फेब्रुवारी १९९८)

१९०३ : रा. भि. जोशी – साहित्यिक (मृत्यू: ? ? ????)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

जयवंत कुलकर्णी

२००५ : जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक (जन्म: ३१ ऑगस्ट १९३१)

१९९५ : डॉ. रामकृष्ण विष्णू तथा ’दादासाहेब’ केळकर – ’गरिबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिराचे अध्यक्ष (जन्म: ? ? ????)

१९८९ : प्रभाकर ऊर्ध्वरेषे – साम्यवादी विचारवंत व साहित्यिक (जन्म: ? ? ????)

१९७१ : भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’ (जन्म: १८ डिसेंबर १८८७)

१९६९ : डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर – इतिहासकार (जन्म: ३० मे १८९४)

१५५९ : हेन्‍री (दुसरा) – फ्रान्सचा राजा (जन्म: ३१ मार्च १५१९)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *