११ जुलै दिनविशेष - 11 July in History
११ जुलै दिनविशेष - 11 July in History

हे पृष्ठ 11 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.

या पृष्ठावर, आम्ही ११ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.

On this page, we will list all historical events that have occurred on 11 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams.

जागतिक दिवस:

जागतिक लोकसंख्या दिन
जागतिक लोकसंख्या दिन

जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day)

International Essential Oils Day

महत्त्वाच्या घटना:

१६५९: अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे राजगडवरुन निघून प्रतापगड येथे पोचले.

१८०१: फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉन याने ’पॉन’ धूमकेतूचा शोध लावला.

सर डोनाल्ड ब्रॅडमन
सर डोनाल्ड ब्रॅडमन

१८९३: कोकिची मिकीमोटो यांनी पहिला ’कल्चर्ड’ मोती मिळवला.

१९०८: लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा झाली.

१९१९: नेदरलँड – देशामध्ये आठ तासांचा दिवस आणि रविवार सुट्टी असा कामगारांसाठी कायदा लागू झाला.

१९२१: मंगोलियन पीपल्स रिपब्लिक – स्थापना.

१९३०: ऑस्ट्रेलियाचे सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकाच दिवसात विक्रमी नाबाद ३०९ धावा केल्या.

१९५०: पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधिचा (IMF) सदस्य बनला.

१९५५: अमेरिकेने आपल्या चलनावर ’देवावर आमचा विश्वास आहे’ (In God we trust) असे छापण्याचे ठरवले.

१९६२: पहिले ट्रान्सअटलांटिक उपग्रह दूरदर्शन प्रसारण झाले.

१९६२: प्रोजेक्ट अपोलो – नासाने चंद्रावर अंतराळवीरांना उतरवण्याचे आणि त्यांना पृथ्वीवर परत आणण्याची घोषणा केली.

किरण बेदी
किरण बेदी

१९७१: चिलितील तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

१९७७: मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर – यांना प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडमने सन्मानित करण्यात आले.

१९७९: अमेरिकेची ‘स्कायलॅब’ ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.

१९८९: जागतिक लोकसंख्या दिन सुरुवात.

१९९४: दिल्लीच्या पोलिस महानिरीक्षक (तुरुंग) किरण बेदी यांना ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर

२००१: आगरताळा ते ढाका या शहरांदरम्यान बससेवा सुरू झाली.

२००६: मुंबईत उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या स्फोटांत २०९ लोक ठार तर ७१४ लोक जखमी झाले.

२०१०: साली स्पेन देशाने नेदरलँड्स फुटबॉल संघाचा पराभव करून फुटबॉल विश्वचषक जिंकला.

२०२१: रिचर्ड ब्रॅन्सन – हे त्याच्या व्हर्जिन गॅलेक्टिक अंतराळयानाद्वारे अंतराळात जाणारे पहिले सामान्य नागरिक बनले.

शंकरराव खरात
शंकरराव खरात

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१८५७: भारतीय राजकारणी व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे अमरावती येथील अध्यक्ष सी. शंकरन नायर यांचा जन्मदिन.

१८८९: नारायण हरी आपटे – कादंबरीकार, चित्रपट कथालेखक. ’सुखाचा मूलमंत्र’, ’पहाटेपुर्वीचा काळोख’, ’उमज पडेल तर’, ’एकटी’ या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबर्‍या होत. ’कुंकू’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्या ’न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारलेला होता. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९७१ – कोरेगाव, जिल्हा सातारा)

सुरेश प्रभू
सुरेश प्रभू

१८९१: परशुराम कृष्णा गोडे – प्राच्यविद्या संशोधक. त्यांनी ४०० विषयांवर संशोधन करुन लिहीलेले निबंध ८ खंडात प्रसिद्ध झाले आहेत. (मृत्यू: २८ मे १९६१)

१९०२: भारतीय शीख राजकीय नेता व भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेता आणि भारताचे पहिले संरक्षण मंत्री सरदार बलदेव सिंह यांचा जन्मदिन.

१९२१: शंकरराव खरात – दलित साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ९ एप्रिल २००१)

१९२३: टुण टुण – भारतीय अभिनेत्री आणि कॉमेडियन (निधन: २४ नोव्हेंबर २००३)

१९२७: थिओडोर हेरॉल्ड मॅमन – लेसरचे निर्माते (निधन: ५ मे २००७)

१९३४: जियोर्जियो अरमानी कंपनीचे स्थापक जियोर्जियो अरमानी यांचा जन्म.

१९५३: सुरेश प्रभू – केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री, उद्योगमंत्री, ऊर्जामंत्री आणि अवजड उद्योग मंत्री

१९५६: भारतीय-अमेरिकन लेखक आणि शैक्षणिक अमिताव घोष यांचा जन्म.

१९६०: भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता कुमार गौरव यांचा जन्मदिन.

शांताराम नांदगावकर
शांताराम नांदगावकर

१९६७: भारतीय-अमेरिकन कादंबरीकार आणि लघु कथालेखक झुम्पा लाहिरी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१६३०: कलकत्ता शहरात आलेली पहिली विदेशी महिला बेगम रेजाबिबेह सुकिएस यांचे निधन.

१९१२: फ्रेंच नेत्र रोग विशेषज्ञ फर्डिनेंड मोनॉयर (Ferdinand Monoyer) यांचे निधन.

१९८९: सर लॉरेन्स ऑलिव्हिये – ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता (जन्म: २२ मे १९०७)

सुहास शिरवळकर
सुहास शिरवळकर

१९९४: रणांगणावरील असामान्य कामगिरीबद्दलचा ’परमवीर चक्र’ हा सर्वोच्‍च सन्मान मिळवणारे मेजर (निवृत्त) रामराव राघोबा राणे यांचे निधन. हा सन्मान मिळवणारे ’बॉम्बे सॅपर्स’चे आणि महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी होते. (जन्म: ? ? ????)

२००३: सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक (जन्म: १५ नोव्हेंबर १९४८)

२००३: पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी लेखक, नाटककार आणि अभिनेते भीष्म साहनी यांचे निधन.

२००९: शांताराम नांदगावकर – गीतकार (जन्म: १९ आक्टोबर १९३६)

पुढील वाचन

महिना वार दिनविशेष

MPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *